एक्स्प्लोर

Horoscope Today 10 September 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 10 September 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 10 September 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस थोडा त्रासदायक ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुमचा ऑफिसमध्ये कोणाशी तरी वाद होऊ शकतो. पण तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जोरावर या वादातून बाहेर पडू शकता.

व्यवसाय (Business) - व्यावसायिक लोकांबद्दल सांगायचं तर, व्यावसायिकांसाठी आजचा काळ कठीण असेल. आज तुम्हाला व्यवसायात मंदीचा सामना करावा लागू शकतो.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झाल्यास, आज तुम्हाला एकटं वाटू शकतं, तुम्हाला एकटेपणा जाणवू नये म्हणून आज तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, तुम्हाला काही गंभीर आजारांमुळे खूप त्रास सहन करावा लागू शकतो, त्यामुळे तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये संतुलन ठेवा.

वृषभ (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुमच्या नोकरीत यश मिळवण्यासाठी तुम्ही खूप मेहनत केली पाहिजे, तरच तुम्हाला यश मिळेल आणि तुमचा पगारही वाढू शकेल. आज तुम्ही शॉर्टकट मारणं टाळा, अन्यथा तुमचं काही नुकसान होऊ शकतं.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिकांनी नियमांचं पालन करुन काम करावं, सर्व कायदे लक्षात घेऊन व्यवसाय वाढवावा.

विद्यार्थी (Student) - तरुणांना सोशल मीडियावर त्यांचे जुने मित्र भेटू शकतात, अचानक हे मित्र तुमच्या नजरेत आल्याने तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि तुम्ही त्यांच्याशी बोलाल. काल तुम्ही घरातल्या एखाद्या व्यक्तीचा अपमान केला असेल तर आज माफी मागा.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं तर, तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे, अन्यथा एक छोटीशी चूक देखील तुम्हाला महागात पडू शकते. तुम्हाला कानाशी संबंधित समस्या जाणवू शकतात.

मिथुन (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस थोडी सावधगिरी बाळगण्याचा आहे. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, जे लोक महत्त्वाचा डेटा हाताळतात त्यांना आज काळजी घ्यावी लागेल, तुम्हाला तुमचा सर्व डेटा सुरक्षितपणे ठेवावा लागेल. तुम्ही नोकरीत काही अडचणी आल्यास त्वरित वरिष्ठांशी बोला.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, जर व्यावसायिकांचं एखादं काम ठप्प झालं असेल तर ते खूप चिंतेत असतील. परंतु थोडे हात-पाय हलवले तर तुमचं काम पुन्हा सुरू होऊ शकतं, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल.

विद्यार्थी (Student) - तरुणांनी आज गरजूंच्या मदतीसाठी पुढे आलं पाहिजे, तुम्हाला त्यांचे खूप आशीर्वाद लाभतील. आज तुमच्या घरातील वातावरण खूप सकारात्मक असेल. तुम्हाला जास्तीत जास्त वेळ तुमच्या घरी घालवायला आवडेल.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज संधिरोगाशी संबंधित आजारामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही रात्री उशिरा जेऊ नये, अन्यथा तुमचं पोट खराब होऊ शकतं आणि तुमचा त्रास आणखी वाढू शकतो.

कर्क (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे निभावाल, कारण काम चुकलं तर तुमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होऊ शकतात. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर नाराज होऊ शकतात आणि तुमचे विरोधक याचा फायदा घेऊ शकतात. 

व्यवसाय (Business) - जर आपण व्यावसायिक लोकांबद्दल बोललो तर, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं विकणं टाळावं लागेल, अन्यथा तुम्ही एखाद्या संकटात सापडू शकतात. तुम्ही काही बिनबुडाच्या आरोपातही अडकू शकता. 

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्ही मोठ्यांचा आदर केला पाहिजे, त्यांना उलटं बोलू नका. आज जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला दिला पाहिजे.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, आज पचायला हलकं अन्न खा, नाहीतर तुमचं पोट खराब होऊ शकतं, त्यामुळे सहज पचणारं अन्न खावं. 

सिंह (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, आज तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कामासाठी काही ट्रेनिंग घेण्याचा विचार करू शकता, ट्रेनिंगसाठी तुमचा वेळ चांगला असेल.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांबद्दल बोलायचं तर, व्यापाऱ्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांशी चांगलं वागावं लागेल, कारण त्यांना देखील तुमच्याकडून चांगल्या शब्दांच्या अपेक्षा असतात. चांगले संबंध ठेवल्यास ते चांगलं काम करतील आणि तुमचा व्यवसाय नफ्यात राहील.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागेल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार नाही, तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. आज तुम्ही भविष्यातील योजनांवर खूप विचाक करू शकता. 

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुम्हाला शारीरिक समस्यांमुळे त्रास होऊ शकतो. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका, अन्यथा तुमचे जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात, ज्यामुळे तुम्ही खूप चिंतेत असाल.

कन्या (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, आज तुम्ही मोठ्या कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यू देऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि तिथे नोकरीही मिळू शकते, यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज व्यावसायिकांनी आपल्या पैशाच्या व्यवहाराबाबत थोडं सावध राहिलं तर बरं होईल, कारण पैशाच्या बाबतीत कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. आज एखादा ग्राहक पैशांबाबत तुमची फसवणूक करू शकतो.

विद्यार्थी (Student) - तरुणांनी आज प्रतिकूल परिस्थितीसाठी स्वतःला तयार केलं पाहिजे, कारण जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसार होत नाही. तुमच्या सभ्यतेचा आणि तुमच्या चांगल्या वागणुकीचा कोणीही फायदा घेऊ शकतं.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुमच्यावर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर आरोग्याची काळजी घ्या, जास्त वजन उचलू नका. खूप थंड अन्न खाणं टाळलं तर तुमचं आरोग्य चांगलं राहील. तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये संतुलन राखलं पाहिजे. 

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचा वेग वाढवा. सामाजिक स्तरावर तुम्हाला एखाद्या मोठ्या कंपनीचं सहकार्य मिळू शकतं.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज व्यवसायात चांगले परिणाम मिळतील, पण काही ठिकाणी स्पर्धेलाही सामोरं जावं लागेल. चांगला नफा मिळवण्यासाठी व्यावसायिकांना ग्राहकांशी चांगले संबंध ठेवावे लागतील, फक्त चांगले संपर्कच मोठा नफा मिळवण्यास मदत करतील.

विद्यार्थी (Student) - तरुणांनी आपल्या वडिलांना न आवडणाऱ्या गोष्टींवर मौन बाळगण्याचा प्रयत्न करावा, कारण आज तुमचे त्यांच्याशी काही वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे.विद्यार्थी प्रेमप्रकरणात अडकून त्यांचं करिअर बरबाद करू शकतात.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, अगदी थोडीशी समस्या असल्यास, डॉक्टरकडे जा. सांधेदुखीच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस खूप चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, सर्वार्थ सिद्धी योग तयार झाल्याने आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कॉर्पोरेट कंपनीतील लोकांचे वरिष्ठांशी संबंध सुधारतील आणि तुमची कार्यशैली लक्षात घेता तुम्हाला मोठं पद मिळू शकतं, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांनी आज कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा, तरच त्यांना व्यवसायातून अपेक्षित नफा मिळू शकेल.

विद्यार्थी (Student) - आज तरुण खूप उत्साहाने आणि आनंदाने जगतील. ज्या तरुणांचा अभ्यास काही कारणांमुळे होत नव्हता, त्यांनी तो पुन्हा सुरू करण्याची वेळ आली आहे.

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. तुम्हाला जास्त मानसिक ताण घेण्याची गरज नाही.

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, सर्वार्थ सिद्धी योगाच्या निर्मितीमुळे तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी फायदा होईल. पदोन्नती मिळू शकते. प्रेझेंटेशन द्यायचं असेल तर त्याची तयारी पूर्ण ठेवावी.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, व्यवसायात चांगली कमाई आणि मेहनतीमुळे आर्थिक समस्या दूर होतील. वडिलोपार्जित व्यवसायात गुंतवणूक करणं टाळा आणि बचतीवर लक्ष केंद्रित करा, असं केल्याने चांगली वेळ आल्यावर तुम्हाला दुप्पट फायदा मिळेल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थी आतापासूनच कॅम्पस प्लेसमेंटची तयारी सुरू करतील. मन हलकं करण्यासाठी मित्रांसोबत गप्पागोष्टी करा.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, वजन कमी करण्यासाठी जंक फूड सोडून द्या आणि निरोगी खाण्यावर लक्ष केंद्रित करा.

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, तुम्हाला चांगले पॅकेज मिळाल्यास मार्केटिंग आणि मॅनेजमेंट टीम तुम्हाला तुमच्या कंपनीतून राजीनामा देण्यास भाग पाडतील. नोकरीमध्ये एखाद्याला बढती मिळाल्यास तुम्ही नाराज व्हाल. 

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुमचा दिवस खूप चांगला जाईल, तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, तुम्ही अभ्यासात लक्ष दिलं पाहिजे, तरच भविष्य सुरक्षित होईल. 

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुमची दिनचर्या वेळोवेळी विस्कळीत होत असेल तर तुम्ही ती सुधरण्याचा प्रयत्न करा.

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, कामाच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता तपासण्यासाठी तुम्हाला काही नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी दिवस खूप व्यस्त असणार आहे.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, तुमच्या राशीत शुभ असा सर्वार्थ सिद्धी योग तयार झाल्यामुळे इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक व्यवसायातील लोकांचं जुनं अडकलेलं बिल सुटू शकतं. व्यावसायिकांसाठी दिवस शुभ राहील, मोठी ऑर्डर मिळाल्याने त्यांना अधिक फायदा होईल.

तरुण (Youth) - नवीन पिढीला आळशीपणाने गुरफटणाऱ्या ग्रहांनी घेरल्याने त्यांना अत्यावश्यक कामं सोडून इतर सर्व कामं करण्यात रस वाटेल. विद्यार्थ्यांना फक्त त्यांच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावं लागेल.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, तुमची तब्येत काही काळापासून बरी होत नसेल तर आता त्यात सुधारणा होऊ शकते.

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, नोकरदारांनी संधी सोडू नये, तुम्हाला वरिष्ठांच्या नजरेत झळकण्याची संधी मिळेल.

व्यवसाय (Business) - व्यवसायात चांगली कमाई केल्याने आर्थिक समस्या दूर होतील. जर तुम्ही नवीन ठिकाणी आउटलेट उघडण्याचा विचार करत असाल तर ते सकाळी 7.00 ते 9.00 आणि सकाळी 5.15 ते 6.15 दरम्यान हे काम करणं चांगलं राहील.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, विद्यार्थ्यांनी रात्री ऐवजी ब्रह्म मुहूर्तावर अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा, सकाळी केलेला अभ्यास बराच काळ लक्षात राहतो.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, तब्येतीत सुधारणा तुमच्यात एक आत्मविश्वास आणेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Numerology : प्रचंड हट्टी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हवी ती गोष्ट मिळवूनच राहतात, त्याशिवाय मिळत नाही यांना शांती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Numerology: साक्षात कुबेराचं वर्चस्व असलेल्या 'या' जन्मतारखा, सर्वात पॉवरफुल! आयुष्यात सर्वकाही दुप्पटच मिळतं, मोठी संधी मिळाली की सोडू नका, अंकशास्त्र
साक्षात कुबेराचं वर्चस्व असलेल्या 'या' जन्मतारखा, सर्वात पॉवरफुल! आयुष्यात सर्वकाही दुप्पटच मिळतं, मोठी संधी मिळाली की सोडू नका, अंकशास्त्र
Horoscope Today 16 May 2026: आज शनि जयंतीचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? ग्रहांचे मागोमाग योगायोग, शनिदेवांची कृपा कोणावर? 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आज शनि जयंतीचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? ग्रहांचे मागोमाग योगायोग, शनिदेवांची कृपा कोणावर? 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Shani Jayanti 2026: शनिपूजा करताना 90% लोक 'ही' चूक करतात! आज शनि जयंतीच्या दिवशी चुकूनही करू नका, अन्यथा शनिचा कोप...ज्योतिषशास्त्र..
शनिपूजा करताना 90% लोक 'ही' चूक करतात! आज शनि जयंतीच्या दिवशी चुकूनही करू नका, अन्यथा शनिचा कोप...ज्योतिषशास्त्र..
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस..5 राशींच्या संपत्तीचा वेग डबल, पैसा दुप्पट! पॉवरफुल गजलक्ष्मी राजयोग बनतोय, पैसा, नोकरी, प्रेम फर्स्ट क्लास...कोण मालामाल?
पुढचे 7 दिवस..5 राशींच्या संपत्तीचा वेग डबल, पैसा दुप्पट! पॉवरफुल गजलक्ष्मी राजयोग बनतोय, पैसा, नोकरी, प्रेम फर्स्ट क्लास...कोण मालामाल?

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Prateek Yadav Death: प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
प्रतिक यादवांच्या शरीरावरील त्या सहा जखमांनी गूढ वाढवलं, नैसर्गिक मृत्यू की घातपात? चर्चांना उधाण
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
'तर तुम्ही सगळे म्या पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेब तुम्हाला सुट्टी नाही, आठ महिने दिले, आता मी आणखी वेळ देऊ शकत नाही' जरांगे पाटलांनी पुन्हा रणशिंग फुंकलं
Ahilyanagar Leopard News: समोर प्रत्यक्ष काळ उभा असताना 'ती' वाघीण बनली; संगमनेरमधील आजीबाईंनी बिबट्याला घरात कोंडले
समोर प्रत्यक्ष काळ उभा असताना 'ती' वाघीण बनली; संगमनेरमधील आजीबाईंनी बिबट्याला घरात कोंडले
NEET Scam: NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड प्राध्यापक कुलकर्णी केमिस्ट्रीचा पेपर, नाशिकचा शुभम खैरनार बायोलॉजीचा पेपर फोडायचा; 28 वर्ष प्राध्यापक राहिल्यानंतर पेपर फोडीचा गोरखधंदा
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड प्राध्यापक कुलकर्णी केमिस्ट्रीचा पेपर, नाशिकचा शुभम खैरनार बायोलॉजीचा पेपर फोडायचा; 28 वर्ष प्राध्यापक राहिल्यानंतर पेपर फोडीचा गोरखधंदा
पश्चिम बंगालमध्ये हैदोस सुरूच; आता लाऊड स्पीकरचा आवाज कमी करायला सांगितला म्हणून पोलीस स्टेशन फोडलं; केली. पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
पश्चिम बंगालमध्ये हैदोस सुरूच; आता लाऊड स्पीकरचा आवाज कमी करायला सांगितला म्हणून पोलीस स्टेशन फोडलं; केली. पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
Rohit Pawar on NCP: राष्ट्रवादी काँग्रेसच्या बँक खात्यातून कोणीतरी घरभाडं अन् ब्युटी पार्लरचे पैसे दिले, अजितदादांना समजल्यावर संतापले, रोहित पवारांचा सनसनाटी आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बँक खात्यातून कोणीतरी घरभाडं अन् ब्युटी पार्लरचे पैसे दिले, अजितदादांना समजल्यावर संतापले, रोहित पवारांचा सनसनाटी आरोप
CSK Playoffs Scenarios : MS धोनी नाही, मुख्य बॉलरही बाहेर, सर्व काही विरोधात गेले तरी मराठमोळा ऋतुराज नडला; CSK अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचू शकते? वाचा समीकरण
MS धोनी नाही, मुख्य बॉलरही बाहेर, सर्व काही विरोधात गेले तरी मराठमोळा ऋतुराज नडला; CSK अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचू शकते? वाचा समीकरण
Embed widget