एक्स्प्लोर

Share Market Record : मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा

शेअर मार्केटमधून (Share Market) एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. आजही शेअर मार्केटमध्ये तेजी कायम असून, आज नवीन विक्रम (Record) झाला आहे.

Share Market Record: शेअर मार्केटमधून (Share Market) एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. आजही शेअर मार्केटमध्ये तेजी कायम असून, आज नवीन विक्रम (Record) झाला आहे. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी नवा सार्वकालिक उच्चांक नोंदवला आहे. इतिहासात प्रथमच बीएसई सेन्सेक्सने (sensex) 84 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. 

आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. देशांतर्गत शेअर बाजाराने शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी नवा सार्वकालिक उच्चांक गाठला. अल्पावधीतच बाजारात जबरदस्त तेजीची नोंद झाली आहे. BSE सेन्सेक्सने इतिहासात प्रथमच 84 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सेन्सेक्सने प्रथमच 84,100 चा टप्पा ओलांडून नवा विक्रम रचला आहे. याआधी गुरुवारीही सेन्सेक्सने विक्रमी उच्चांक गाठला होता. सेन्सेक्सशिवाय निफ्टीनेही विक्रमी उच्चांक गाठला आहे. निफ्टी नवीन शिखरावर आहे आणि प्रथमच 25,650 च्या पुढे गेला आहे.

बाजार अचानक वधारला

सकाळी 9:15 वाजता सेन्सेक्स 350 अंकांनी तर निफ्टी जवळपास 100 अंकांनी वर होता. काही मिनिटांनंतर, सकाळी 9:20 वाजता, सेन्सेक्स 175 अंकांवर आला होता आणि 83,370 अंकांच्या जवळ व्यवहार करत होता. त्यानंतर व्यापारादरम्यान, बाजाराने चांगले पुनरागमन केले आणि 900 अंकांनी उडी मारून नवीन विक्रमी उच्चांक केला. सकाळी 11 वाजता सेन्सेक्सने 900 हून अधिक अंकांच्या नेत्रदीपक वाढीसह 84159 चा टप्पा ओलांडला. इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्स 84 हजारांवर पोहोचला आहे. तसेच निफ्टी 25,663.45 अंकांची उच्च पातळी गाठल्यानंतर 11 वाजता सुमारे 225 अंकांच्या वाढीसह 25,645 अंकांवर व्यवहार करत होता.

गुंतवणूकदारांनी कमावले 4 लाख कोटी 

बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांनाही मोठा नफा झाला आहे. काल BSE लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 4,65,47,277 कोटी रुपये होते, ते आज 4 लाख कोटी रुपयांनी वाढून 4,69,33,988 कोटी रुपये झाले आहे.

कालही विक्रमी नोंद 

गुरुवारीही देशांतर्गत बाजाराने नवीन उच्चांक गाठला होता. कालच्या व्यवहारात, सेन्सेक्सने 83,773.61 अंकांची नवीन सार्वकालिक उच्च पातळी गाठली आणि निफ्टीने 25,611.95 अंकांची नवीन सार्वकालिक उच्च पातळी गाठली. नंतर प्रॉफिट बुकींगमुळे मार्केट थोडे खाली आले. व्यवहार संपल्यानंतर सेन्सेक्स 236.57 अंकांच्या वाढीसह 83,184.80 अंकांवर आणि निफ्टी50 38.25 अंकांच्या वाढीसह 25,415.95 अंकांवर बंद झाला.

या शेअर्समध्ये वाढ

अनेक कंपन्यांचे शेअर्स सध्या तेजीत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात कोचीन शिपयार्डचे शेअर 10 टक्क्यांनी वाढून 1841 रुपयांवर पोहोचले आहेत. IIFL फायनान्स 10 टक्क्यांनी वाढून 541 रुपये झाला. RITES चे शेअर्स 8 टक्के, BSE चे शेअर्स 9 टक्के, Mazagon Dock चे शेअर्स 7 टक्के, Cacrotech Dev चे शेअर्स 5 टक्के, Mahindra & Mahindra चे शेअर्स 4 टक्के, Zomato 4 टक्के आणि JSW स्टीलचे शेअर्स 3.75 टक्क्यांनी वाढले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

शेअर मार्केटमध्ये विक्रम! इतिहासात प्रथमच सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर, निफ्टीनं गाठला 25500 चा उच्चांक

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget