Laxman Hake : मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Laxman Hake on CM Eknath Shinde : मराठा तितुका मेळवावा नाही, मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, असे मुख्यमंत्र्यांचं आणि प्रत्येक पक्षाचं धोरण असल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
![Laxman Hake : मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल Laxman Hake slams CM Eknath Shinde over Maratha Reservation and OBC Reservation Jalna Maharashtra Marathi News Laxman Hake : मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/20/48a17b431b3ee8a8fb7ba56775e668891726815266746923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जालना : महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न पडला आहे की, सत्तेत कोण आहे आणि विरोधात कोण आहे. प्रत्येक पक्ष मंत्रिमंडळात गेलाय. मात्र, ओबीसी आणि दलित बांधव जिथल्या तिथेच आहेत. मराठा तितुका मेळवावा नाही, मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, असे मुख्यमंत्र्यांचं (CM Eknath Shinde) आणि प्रत्येक पक्षाचं धोरण असल्याची टीका ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केली आहे.
लक्ष्मण हाके म्हणाले की, आमच्या प्रमुख मागण्या, आमची मागची कोणतीही मागणी सरकारने पूर्ण केलेली नाही. आता गॅझेटचे नवीनच फॅड सुरू झाले आहे. गॅझेटमुळे जीआर काढण्याचा अधिकार मंत्र्यांना आहे का? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांकडून हवे आहे. स्टेट बॅकवर्ड कमिशन शिफारस घेतल्याशिवाय गॅझेट लागू करता येणार नाही. महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो लोकसभेच्या निवडणुका या प्रश्नावरून पार पडल्यात आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये यांना हेच करायचं आहे, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
लक्ष्मण जरांगेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न पडला आहे की, सत्तेत कोण आहे आणि विरोधात कोण आहे. प्रत्येक पक्ष मंत्रिमंडळात गेलाय. मात्र, ओबीसी आणि दलित बांधव जिथल्या तिथेच आहेत. मराठा तितुका मेळवावा नाही, मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, असे मुख्यमंत्र्यांचं आणि प्रत्येक पक्षाचं धोरण आहे, अशी बोचरी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे. मराठा बांधवांवर गरिबीची परिस्थिती आली म्हणजे सामाजिक न्यायाचं आरक्षण त्याला जबाबदार आहे. हे माझ्या मराठा बांधवांना कोणी सांगितलं? हे महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी सांगावं. या गोष्टीला अशोक चव्हाण, स्वर्गीय शंकरराव चव्हाण जबाबदार आहेत. या गोष्टीला पृथ्वीराज चव्हाण जबाबदार आहेत. शरद पवार एक हजार टक्के जबाबदार आहेत, याबद्दल जरांगे बोलत नाहीत, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
जरांगेंच्या व्यासपीठावर गेलेल्या लोकांना ओबीसींनी मतदान का करायचं?
आमचं आरक्षण वाचवण्याचे उपोषण आहे. कुणाला शिव्या देण्याचं नाही. आता निवडणुका पक्ष पार्ट्यावर होणार नाहीत. या निवडणुका ओबीसी वर्सेस मराठा होतील. सामाजिक न्यायासाठी जी माणसं उभी राहतील त्या त्या माणसाला ओबीसी बांधव समर्थन देतील. जरांगेंच्या व्यासपीठावर गेलेल्या लोकांना ओबीसींनी मतदान का करायचं? मग उद्धव ठाकरे असो, शरद पवार असो, तानाजी सावंत असो, पृथ्वीराज चव्हाण असो की अशोक चव्हाण असो, असा हल्लाबोल लक्ष्मण हाके यांनी यावेळी केला.
जरांगे पाटील कोणाचे समर्थक आहेत?
एकनाथराव कान उघडे ठेवून ऐका. रिझर्वेशन म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही. आम्हाला कोणाचे तरी समर्थक म्हटले गेले, छगन भुजबळ यांचे समर्थक म्हटले. आता रोहित पवार म्हणत आहेत की, लक्ष्मण हाके देवेंद्र फडणवीस यांची भाषा बोलत आहेत. आम्ही सगळ्यांचे समर्थक आहोत हे काय आतंकवादी आहेत का? हे पण महाराष्ट्राचेच आहेत, आम्ही समर्थक आहोत. पण, जरांगे पाटील कोणाचे समर्थक आहेत? हे त्यांनी सांगावं, असेही लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)