एक्स्प्लोर

Horoscope Today 10 June 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 10 June 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 10 June 2023 : आज शनिवार हा एक महत्त्वाचा दिवस आहे. कर्क, धनु राशीच्या लोकांनी आज काळजी घ्यावी. मेष आणि वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहील. तर, काही राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. मेष ते मीन राशीसाठी शनिवार कसा राहील, काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. आज तुम्हाला दिवसभर खूप उत्साही वाटेल. तुमची रखडलेली कामेही आज पूर्ण करू शकाल. तुम्हाला वरिष्ठ सदस्यांचा आशीर्वाद मिळेल. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे करा. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते तुम्हाला आज परत मिळतील. 

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच फलदायी असणार आहे. घरापासून दूर काम करणाऱ्या लोकांना आज आपल्या कुटुंबाची आठवण येईल. तुम्ही तुमचा काही वेळ मुलांसोबत घालवा, ज्यामुळे तुम्हाला खूप ताजेतवाने वाटेल. एकांतात वेळ घालवणं काही वेळेस चांगले आहे पण जर तुमच्या मनात असंख्य विचार सुरु असतील तर मात्र तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. यासाठी लोकांमध्ये मिसळा. अनुभवी व्यक्तींशी बोला. जे लोक समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढताना दिसेल. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या नम्र स्वभावाचे कौतुक होईल. बरेच लोक तुमची खूप प्रशंसा करू शकतात. मालमत्तेशी संबंधित व्यवहार पूर्ण होतील आणि त्याचा फायदा होईल. 

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. ग्रहांच्या जीवनात सुख-शांती राहील. सर्वजण मिळून एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा बेत आखतील. भावाच्या लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल. घरोघरी शुभ कार्यक्रम आयोजित केले जातील. या निमित्ताने नातेवाईकांची ये-जा सुरु असेल. जे युवक घरापासून दूर राहून स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांना कुटुंबाची आठवण येईल. अतिरिक्त पैसे रिअल इस्टेटमध्ये गुंतवले जाऊ शकतात. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांसह काही समस्या असतील, परंतु यामुळे तुमची मानसिक शांतता बिघडू देऊ नका.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतील. कामाच्या ठिकाणी उच्च अधिकार्‍यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज कोणाच्याही सांगण्याने कोणतीही गुंतवणूक करू नका. तुम्हाला उत्पन्नाच्या काही नवीन संधी मिळतील. कुटुंबाच्या भल्यासाठी जोडीदाराबरोबर काम करताना दिसाल. जवळच्या व्यक्तीशी झालेल्या वादामुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. हा वाद लवकर मिटवण्याचा प्रयत्न करा. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. 

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरु करु शकतात. व्यवसायाशी संबंधित प्रवासाची शक्यता आहे. नोकरदार लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल, त्यामुळे ते खूप आनंदी दिसतील. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहिल. संध्याकाळी तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असू शकते. परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी मेहनत करताना दिसतील ज्यामध्ये त्यांना यश देखील मिळेल.

कन्या 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात यश मिळाल्यानंतर व्यवसाय करणारे लोक खूप आनंदी दिसतील. मित्रांकडूनही लाभ मिळेल. मित्रांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. कुटुंबातील सदस्यांशी बोलताना तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवा. तुमच्या जोडीदाराची प्रगती पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. मुलांच्या शिक्षणावर जास्त खर्च होईल. मन:शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. समाजाच्या भल्यासाठी काम करणाऱ्यांना सन्मान मिळेल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. तुम्ही खूप दिवसांपासून काही काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता, ते आज पूर्ण होईल.

तूळ 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. नोकरदार लोकांना त्यांच्या नोकरीत बढतीची बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे ते खूप आनंदी दिसतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायाला पुढे नेण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून धनलाभ होण्याची शक्यता आहे, प्रवासाला जाण्याची शक्यता आहे, प्रवासातून नवीन लोकांशी संपर्क होईल. तुमची रखडलेली कामेही पूर्ण होतील. जर तुम्ही कोणतीही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. कुटुंबियांसोबत वेळ घालवा, पण बोलण्यावर नियंत्रण ठेवा. 

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरीत यशाचा आहे. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. शिक्षणात यश मिळेल. काही समस्येमुळे तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा येऊ शकतो, ज्यामुळे घरातील सदस्यही उदास दिसतील. एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची योजना करु शकता. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. अशा वेळी संयम राखा. जे विद्यार्थी परदेशातून शिक्षण घेण्यासाठी दीर्घकाळ प्रयत्न करत होते त्यांना यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी चांगला आहे. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. नोकरदार लोकांनाही नोकरीच्या बाबतीत चांगली बातमी ऐकायला मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. जोडीदाराच्या तब्येतीबद्दल थोडी चिंता जाणवेल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुमची प्रगती पाहून काही लोक तुमच्यावर नाराज दिसतील. घरातील ज्येष्ठांच्या चरणस्पर्श करुन आशीर्वाद घेतल्यास सर्व कामे पूर्ण होतील. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. राजकारणात यश मिळेल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. नोकरदार वर्गाला नोकरीमध्ये बढतीच्या संधी मिळतील. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. मानसिक शांतता लाभेल. व्यवसायातील कोणत्याही निर्णयाबाबत संभ्रमात राहू नका. यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांशी संवाद साधा. तसेच छोट्या व्यावसायिकांना आपल्या व्यवसायात भरपूर नफा मिळेल. विद्यार्थी एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जाऊ शकतात. मुलांच्या भविष्यासाठी पालक पैसे गुंतवतील. मुलाला चांगली नोकरी मिळाली तर खूप आनंद होईल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळू शकतो. संध्याकाळी तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आवडते काम करा. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. मित्रांच्या मदतीने उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील.

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात नवीन कामे सुरु करण्याची चांगली संधी आहे. नोकरी बदलण्याची संधी मिळू शकते, परंतु जुन्या नोकरीला चिकटून राहणे तुमच्यासाठी चांगले राहील. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्याबाबत तुम्हाला थोडी चिंता जाणवेल. आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. वरिष्ठ सदस्य तुमच्या व्यवसायात पैसे खर्च करतील. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. तुमच्या घरी नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. जे समाजाच्या सेवेसाठी काम करतात, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. विद्यार्थी परीक्षेची तयारी मनापासून करतील यामध्ये त्यांना शिक्षकांचे सहकार्य मिळेल. 

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणारे लोक आपली रखडलेली योजना पुन्हा सुरु करु शकता. कुटुंबात मतभेद होऊ शकतात. शैक्षणिक कार्यात अडचणी येऊ शकतात. मुलाच्या आरोग्याबाबत तुम्ही थोडी चिंता जाणवेल. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. घर, प्लॉट खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज नवीन पाहुण्यांचं घरी आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमात थोडा वेळ घालवा. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, या वेळेत तुमच्या आवडीची कामे करा. मित्रांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी प्राप्त होतील. राजकारणात यश मिळेल. रोजच्या दिनचर्येत योगासने आणि मॉर्निंग वॉकचा समावेश केल्यास तुमचे आरोग्य चांगले होईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 09 June 2023 : वृषभ, सिंह, तूळसह 'या' राशीच्या लोकांनी खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार

व्हिडीओ

Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report
Rural Area Students Studies : अभ्यासाचा भोंगा, मोबाईलला ठेंगा, सकाळ-संध्याकाळ फक्त अभ्यास Special Report
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
Share Market Holidays 2026 : पुढील वर्षी शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? NSE कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
2026 मध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून सुट्ट्यांची यादी जाहीर
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Embed widget