Horoscope Today 10 December 2025: आजचा बुधवार 6 राशींसाठी भाग्यशाली! श्रीविठ्ठलाच्या कृपेने धनलाभाचे मोठे संकेत, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 10 December 2025: आजचा बुधवार 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 10 December 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 10 डिसेंबर 2025, आजचा वार बुधवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान विठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज सगळीकडे धडाडी दाखवाल आणि लोकांना मनाप्रमाणे वागवून घ्याल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज कोणत्या वेळी काय करायला पाहिजे याची जाण येईल, पाहिजे तिथे बोलण्यामुळे कामावर परिणाम होऊन काम लवकर होईल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज अंगात असलेल्या कौशल्याला प्रयत्नांची जोड दिल्यास यश तुमचेच आहे
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज कामामुळे आज अजिबात विश्रांती मिळणार नाही, महिलांनी संघर्ष टाळावेत
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज आर्थिक नियोजन करण्यात तुमचा हात कोणी पकडणार नाही, दूरच्या प्रवासाचे योग येतील
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज आज थोडे अस्वस्थ राहाल, गरज सरो आणि वैद्य मरो या म्हणीप्रमाणे वागून चालणार नाही.
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज परदेशातले व्यवहार सुरळीत होतील, तेथे छोटी ट्रिप करावीशी वाटेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज कलाकार, खेळाडू प्रसिद्धीच्या झोतात येतील, घरामध्ये पूर्वी ठरलेला एखादा शुभ समारंभ पार पडेल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज व्यवसायातील काम नेहमीप्रमाणे चालू राहून, त्यात येणारे तांत्रिक अडथळे दूर होतील, महिलांना पाहुणचार करावा लागेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज तुमच्या सतत बदलणारा मूड आजूबाजूचे वातावरण आनंदी करू शकणार नाही, नोकरीनिमित्त परदेशी जाण्याचे योग्य येतील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील, खूप दिवसांनी एक वेगळाच उत्साह मनात संचारेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज तुमच्या उत्तम कल्पनाशक्तीचा उपयोग तुमच्या जवळच्या लोकांना होईल, तुमचे कर्तृत्व उठून दिसेल.
हेही वाचा
2026 Year Numerology: 2026 वर्ष म्हणजे 'या' जन्मतारखांसाठी 'गोल्डन Year'! यंदा हे सूर्याचं वर्ष, पैसा, नोकरी, प्रेम भरभरून, अंकशास्त्रात म्हटलंय...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















