(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Horoscope Today 07th March 2023 : मेष, कन्या, मीन राशीच्या लोकांचे भाग्य उजळतील; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Horoscope Today 07th March 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे. आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 07th March 2023 : आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या यासह सर्व राशींसाठी आजचा दिवस शुभ ठरणार आहे. इतर कोणत्या राशींसाठी आजचा दिवस खास ठरणार आहे? यासाठी आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष
मेष राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाल्यास, आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. जे लोक भागीदारीत व्यवसाय करत आहेत, त्यांना आज खूप फायदा होईल. आजच्या दिवशी ते आपली सर्व कामे पूर्ण करण्यात यशस्वी होतील. नोकरीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, तुमच्या नोकरीत परिवर्तन होण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित प्रवासाचीही शक्यता आहे. प्रवासासाठी खूप फायदा होईल. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला मित्रांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल.
वृषभ
वृषभ राशीसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. जर व्यावसायिक लोकांबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही तुमच्या राहिलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकाल. विद्यार्थ्यांबद्दल बोलायचे झाल्यास, विद्यार्थी क्रीडा स्पर्धेची तयारी करताना दिसतील, यामध्ये ते जिंकूदेखील शकतील. शिक्षकांचं सहकार्य मिळेल. आजच्या दिवशी तुमचा सन्मान आणि आदर वाढेल. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना रोजगार मिळेल, असे संकेत आहेत. संतती सुखात वाढ होईल. तुमच्या मुलांमुळे तुम्हाला अभिमान वाटेल.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाल्यास, आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. कुटुंबात मांगलिक कार्यक्रम आयोजित होतील, सर्वांचं येणं-जाणं राहील. यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यातला गोडवा कायम ठेवावा लागेल. बदलत्या हवामानामुळे तुमच्या तब्येतीत चढ-उतार दिसतील. आरोग्याबाबत जागरुक राहा. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. विद्यार्थी मोठ्या मनाने अभ्यास करताना दिसतील. स्पर्धेची तयारी करणाऱ्यांनी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. शिक्षकांचं सहकार्य मिळेल. राजकारणात यश मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही कुटुंबाच्या कल्याणासाठी काम करताना दिसाल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. जर तुम्ही काही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला त्याचा फायदाही होईल.
सिंह
सिंह राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे. नोकरीत बदलाचे संकेत दिसतायत. ज्यामध्ये तुमचे उत्पन्न आणि पद देखील वाढेल.आरोग्याची काळजी घ्या. बदलत्या हवामानामुळे तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनक्रमात काही बदल केले तर ते तुमच्यासाठी चांगले ठरेल. वैवाहिक जीवनात काही लोकांच्या हस्तक्षेपामुळे काही समस्या निर्माण होतील, परंतु तुम्ही तुमच्या समजुतीने सर्व काही ठीक करू शकाल.
कन्या
कन्या राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा जाणार आहे. नोकरीत वरिष्ठांकडून लाभ मिळू शकतो. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. परंतु सध्या तुमच्या जुन्या नोकरीला धरून राहणे चांगले होईल. विद्यार्थ्यांसाठीही परिक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस असणार आहे.
तूळ
तूळ राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आनंददायी असणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल, त्यामुळे ते खूप आनंदी दिसतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमची रखडलेली कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही केलेल्या प्रयत्नात यश मिळेल. तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील करू शकता. घरातील सर्व लोक एकत्र काम करताना दिसणार आहेत. वरिष्ठ सदस्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला आर्थिक लाभ होईल. आरोग्य देखील सुधारेल.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. तुमचे मित्र तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात मदत करतील. उत्पन्नात वाढ होईल. तुमची नकारात्मक वृत्ती तुमची प्रगती थांबवू शकते. कौटुंबिक संबंधात थोडा तणाव देखील दिसून येईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. सहकाऱ्यांसोबत काम करताना बोलण्यात गोडवा ठेवा. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. इच्छित विषयाचा अभ्यास केल्यानंतर विद्यार्थी खूप आनंदी दिसतील.
धनु
धनु राशीच्या लोकांबद्दल बोलायचे तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. अधिकार्यांशी बोलताना वाणीत गोडवा ठेवा, तरच तुमचे चांगले होईल. तुमचा आनंद इतरांसोबत शेअर केल्याने तुमचे आरोग्यही सुधारेल. कुटुंबात नवीन अतिथीचे आगमन होईल, त्यामुळे आनंदी वातावरण राहील. उद्या तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून काही वेळ तुमच्या मुलांसोबत घालवाल, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल.
मकर
मकर राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. तुम्हाला सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल, नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. तुम्ही उद्या कुटुंबातील सदस्यांसोबत घालवाल, जिथे तुम्हाला तुमच्या बोलण्यातला गोडवा ठेवावा लागेल. पैशांवरून कुटुंबात वाद होऊ शकतो. तुमच्यावर कुटुंबाप्रती अधिक जबाबदाऱ्या येऊ शकतात, त्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ दिसाल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरीत कोणताही निर्णय घेताना संभ्रमात राहाल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळेल.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमची सर्व कामे पूर्ण होताना दिसतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तुम्ही आईबरोबर धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल, जिथे तुम्ही थोडा वेळ घालवाल, तुमच्या मनाला शांती मिळेल. कौटुंबिक सदस्यांसोबत फिरण्याची योजना आखाल. व्यावसायिक समस्यांबाबत जागरूक राहा. कामाच्या ठिकाणी जास्त बोलणे टाळावे, अन्यथा तुमच्या प्रतिमेवर वाईट परिणाम होईल. तुमच्या जोडीदारासोबत एकांतात वेळ घालवण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ मिळेल.
मीन
मीन राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस चांगला जाणार आहे. जर नोकरदार लोकांबद्दल बोलायचे झाल्यास नोकरीशी संबंधित काही मोठे काम पूर्ण होईल. ऑफिसच्या कामात व्यस्त राहाल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना वेळ देऊ शकणार नाही. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये उत्पन्न जास्त असेल. तुम्ही तुमच्या पदातही वाढ पाहाल. मुलांकडून सुख प्राप्त होईल. तब्येत सुधारेल. देवावरील श्रद्धा वाढेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)