एक्स्प्लोर

Horoscope Today 04 August 2023 : वृषभ, तूळसह 'या' राशीच्या लोकांनी खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं; जाणून घ्या सर्व राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 04 August 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 04 August 2023 : आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मिथुन राशीच्या लोकांना समाजाचं भलं करण्याची संधी मिळेल. तर, कुंभ राशीच्या लोकांना व्यवसायाला पुढे नेण्यात यश मिळेल. मेष ते मीन राशीसाठी आजचा शुक्रवार कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुम्ही जे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता ते तुमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होईल. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्हाला खूप आनंद होईल. घरात पाहुण्यांच्या आगमनाने तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. घरोघरी पूजा, पाठही आयोजित केले जातील. जे घरापासून दूर काम करतायत त्यांना आपल्या कुटुंबीयांची आठवण येईल. प्रॉपर्टी डीलिंगचे काम करणाऱ्यांना चांगली डील मिळाल्याने खूप आनंद होईल. 

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायात नवीन योजना राबवतील. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात तुमचे मित्रही तुम्हाला मदत करतील. आज तुम्हाला स्वत:ला वेळ द्यायला आवडेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र काही धार्मिक स्थळाला भेट देण्याचा विचार करतील. जे लोक घरबसल्या ऑनलाईन काम करतायत त्यांना बऱ्यापैकी फायदा होणार आहे. आज शेजाऱ्यांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या काही नवीन संधीही मिळतील. 

मिथुन 

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. कुटुंबातील सदस्यांचे तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या आरोग्यात पूर्वीपेक्षा चांगली सुधारणा पाहायला मिळेल. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतायत त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून काही वेळ तुमच्या मुलांबरोबर घालवा, ज्यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल. काही लोकांना आज आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. 

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदारांना नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. तुम्ही केलेल्या कामामुळे उच्च अधिकारी खूप खूश होतील. आज कोणाच्याही सांगण्यावरून गुंतवणूक करू नका, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या रागावर आज नियंत्रण ठेवा. राजकारणात चांगली संधी आहे.

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. मुलांच्या मानसन्मानात वाढ होईल. घरातील वडीलधाऱ्यांकडून काही कामे तुमच्यावर सोपवली जातील, जी तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. वडिलांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. संध्याकाळी, तुमचे घर पाहुण्यांनी भरलेले असेल. कार्यक्षेत्रात कामाचा ताण जास्त असेल पण तुम्ही आत्मविश्वासाने सगळी कामे वेळेत पूर्ण कराल. 

कन्या 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असेल. आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. आज तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवण्याच्या अनेक संधी मिळतील. जोडीदारालाही नोकरीत बढतीची संधी मिळेल. घरी पूजा, पाठ यांसारख्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतील. मालमत्तेतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करू नका. 

तूळ 

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही करत असलेले प्रयत्न यशस्वी होतील. मित्रांच्या मदतीने तुम्हाला नवीन संपर्क मिळतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. आज तुमच्या भावाच्या मदतीने तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घेतल्यास सर्व कामे पूर्ण होतील. अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल केले तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. 

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. कुटुंबातील सदस्यांसह निवांत आणि प्रसन्न दिवसाचा आनंद घ्या. आज कोणत्याही समाज कार्यात स्वत:ला गुंतवून घेऊ नका. घरोघरी शुभ कार्यक्रम आयोजित केले जातील. घरात पाहुण्यांची ये-जा सुरु असेल अशा वेळी तुम्ही तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवा. आज तुम्ही तुमची रखडलेली कामेही पूर्ण करू शकता. कामाच्या ठिकाणी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. 

धनु 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच फलदायी असणार आहे. जे लोक भागीदारीत व्यवसाय करतायत, त्यांना उद्या खूप फायदा होईल. पालकांकडून काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जातील, ज्या तुम्ही निश्चितपणे पार पाडणं गरजेचं आहे. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही इतरांना प्रभावीत करू शकाल. आज कोणाच्याही सांगण्यावरून कोणतीही गुंतवणूक करू नका, अन्यथा नुकसान होऊ शकतं. काही सर्जनशील कामात स्वतःला गुंतवून घ्या. मालमत्तेशी संबंधित व्यवहार पूर्ण होतील आणि फायदा होईल. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. आज तुम्ही तुमच्या दिनचर्येत काही बदल करा, ज्यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल. आज एखाद्या मित्राच्या मदतीने तुम्हाला काही उत्पन्नाच्या संधीही मिळू शकतात. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून काही वेळ तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी देखील काढा. त्यांच्याबरोबर काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा, ज्यामुळे तुमच्या मनाला खूप शांती मिळेल. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. तुमचे आरोग्य चांगले राहील. 

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. आज तुम्हाला सरकारी क्षेत्रातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र काम करताना दिसतील. आज तुम्हाला कोणाच्या सल्ल्याने कोणतीही गुंतवणूक करण्याची गरज नाही. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. अविवाहित लोकांच्या लग्नाची चर्चा होऊ शकते. वरिष्ठांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा. नोकरीत उच्च अधिकार्‍यांकडून बढतीची संधी मिळेल. 

मीन 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुमच्या आरोग्यात पूर्वीपेक्षा चांगली सुधारणा असेल. आत्मविश्वासात वाढ होईल. कार्यक्षेत्रात तुम्ही केलेल्या कामामुळे सर्वजण खूश होतील. आज तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबीयांबरोबर एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना कराल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. तुम्हाला जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आज विनाकारण पैसे खर्च करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि पैसा वाचवा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 03 August 2023 : मेष, कर्क, मीनसह 'या' राशींच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget