Hartalika 2025: महिलांनो.. हरतालिका तृतीयेला 'या' रंगाची साडी नेसाच, सौभाग्याला धक्काही लागणार नाही! पैसा, संपत्ती, अखंड सौभाग्य मिळवाल
Hartalika 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, हरतालिका तृतीयेला तुमच्या राशीनुसार 'या' रंगाची साडी नेसा, यामुळे घरगुती कलह आणि कुंडली दोषांचा प्रभाव कमी होतो. त्याबद्दल जाणून घेऊया.

Hartalika 2025: हिंदू दिनदर्शिकेनुसार, यंदा हरतालिका तृतीया 26 ऑगस्ट 2025 रोजी साजरी केली जाईल. ही हरतालिका यंदा खूप खास आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी तुमच्या राशीनुसार साडी परिधान करणे देखील फायदेशीर आहे. यामुळे घरगुती कलह आणि कुंडली दोषांचा प्रभाव कमी होतो. तसेच अखंड सौभाग्याचा आशीर्वाद शिव-पार्वतीकडून मिळतो. त्याबद्दल जाणून घेऊया.
अखंड सौभाग्याचा आशीर्वाद, पतीची प्रगती..
हरतालिका तृतीया 26 ऑगस्ट 2025 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी महिला मातीपासून मूर्ती बनवून भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करतात. असे मानले जाते की, या दिवशी उपवास केल्याने अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो. यासोबतच पतीची प्रगती आणि आनंदी प्रेम जीवनाची शक्यता देखील वाढते. याशिवाय धार्मिक ग्रंथांमध्ये देखील या उपवासाचा महिमा सांगितला आहे. असे मानले जाते की, या दिवशी पूर्ण सोळा अलंकारांसह हरतालिका व्रत कथा पाठ करणे खूप फायदेशीर आहे. यामुळे प्रेम जीवनात विश्वास आणि परस्पर समजूतदारपणा वाढतो.
तुमच्या राशीनुसार हरतालिका तृतीयेच्या दिवशी 'या' रंगांच्या साड्या नेसा...
मेष - मेष राशीच्या महिला हरतालिका तृतीयेच्या दिवशी लाल रंगाची साडी नेसू शकतात. हा रंग तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो.
वृषभ - वृषभ राशीच्या महिलांनी पिवळ्या रंगाची साडी नेसावी. यामुळे नातेसंबंधांमध्ये गोडवा आणि प्रेम वाढते.
मिथुन - मिथुन राशीच्या महिला हिरव्या रंगाचे कपडे नेसू शकतात. यामुळे कुंडलीत बुधाची स्थिती मजबूत होते तसेच नातेसंबंध सुधारतात.
कर्क - कर्क राशीच्या महिला चांदीच्या रंगाची साडी नेसू शकतात. यामुळे मानसिक शांती मिळते.
सिंह - सिंह राशीच्या महिला हरतालिका तृतीयेच्या दिवशी लाल किंवा गुलाबी रंगाचे कपडे किंवा साडी नेसू शकतात. यामुळे नातेसंबंध सुधारतात.
कन्या - कन्या राशीच्या महिला या वर्षी निळ्या रंगाची साडी नेसू शकतात. यामुळे प्रेम जीवन आनंदी होते.
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या महिलांनी गुलाबी रंगाची साडी नेसावी, यामुळे जीवनात आनंद आणि समृद्धी राहते.
धनु - धनु राशीच्या महिलांनी हरतालिका तृतीयेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी नेसावी.
मकर - मकर राशीच्या महिला निळ्या रंगाची साडी नेसू शकतात. यामुळे नातेसंबंधांमध्ये प्रेम वाढते.
कुंभ - कुंभ राशीच्या महिला हरतालिका तृतीयेच्या दिवशी जांभळ्या रंगाची साडी नेसू शकतात.
मीन - मीन राशीच्या महिला हरतालिका तृतीयेच्या दिवशी गुलाबी रंगाची साडी नेसू शकतात. यामुळे नात्यांमध्ये प्रेम वाढते.
हेही वाचा :
Hartalika 2025: महिलांच्या मनातील मोठा प्रश्न! हरतालिकाच्या दिवशी मासिक पाळी असेल तर काय करावं? उपवास करावा की नाही? संपूर्ण माहिती वाचा..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















