Guru Gochar 2024: तब्बल 12 वर्षांनंतर सुख-समद्धीचा कारक गुरू वृषभ राशीत होणार मार्गी; 'या' 3 राशींचं उजळणार भाग्य, आर्थिक स्थिती सुधारणार
Jupiter Transit In Taurus : गुरुला पुन्हा एका राशीत परत येण्यासाठी सुमारे 12 वर्षे लागतात. यावेळी गुरु 12 वर्षांनी वृषभ राशीत प्रवेश करत आहे. गुरु ग्रहाच्या संक्रमणामुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो.
![Guru Gochar 2024: तब्बल 12 वर्षांनंतर सुख-समद्धीचा कारक गुरू वृषभ राशीत होणार मार्गी; 'या' 3 राशींचं उजळणार भाग्य, आर्थिक स्थिती सुधारणार Guru Gochar 2024 jupiter transit in taurus positive impact on these zodiac signs Guru Gochar 2024: तब्बल 12 वर्षांनंतर सुख-समद्धीचा कारक गुरू वृषभ राशीत होणार मार्गी; 'या' 3 राशींचं उजळणार भाग्य, आर्थिक स्थिती सुधारणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/03/0e058f7477516e760f2547cdc343264e1704260626902343_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Guru Gochar 2024 : धन आणि सुखाचा कारक असलेला देव गुरू बृहस्पति विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलत राहतो. बृहस्पतिच्या राशी बदलामुळे 12 राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे तरी परिणाम होतच असतो. ज्योतिषशास्त्रानुसार, यावेळी गुरू स्वतःच्या राशीत, म्हणजेच मेष राशीत फिरत आहे. मे महिन्यात गुरू आपली राशी बदलेल आणि वृषभ राशीत जाईल. गुरू (Jupiter) हा संतती, सुख, सौभाग्य आणि विवाहाचा कारक मानला जातो.
मे महिन्यात वृषभ राशीत होणारा गुरुचा प्रवेश अनेक राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करेल. 12 वर्षांनंतर गुरू वृषभ राशीत येत असल्यामुळे काही राशींना बंपर लाभ मिळू शकतो. गुरुच्या मार्गक्रमणामुळे कोणत्या राशींना फायदा होईल ते जाणून घेऊया.
वृषभ रास (Gemini)
गुरू या राशीच्या चढत्या घरात प्रवेश करेल. अशा स्थितीत वृषभ राशीच्या लोकांना सुख आणि सौभाग्य लाभेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. इच्छा-आकांक्षा वाढतील. यासोबतच तुम्हाला काही नवीन काम सुरू करायचे असेल तर या काळात ते करणे फायदेशीर ठरू शकते. वैवाहिक जीवनातील समस्याही सहज सुटतील. गुरू तुमच्या अकराव्या घराचा स्वामी असल्याने आर्थिक लाभ होण्याचीही दाट शक्यता आहे. मे महिन्यानंतर तुम्ही कुटुंबियांसोबत किंवा जवळच्या व्यक्तींसोबत तीर्थयात्रेला जाऊ शकता. अध्यात्माकडे थोडासा कल राहील. केतू स्थित असलेल्याच पाचव्या घरात गुरु ग्रह राहील, त्यामुळे या काळात मुलांकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते.
सिंह रास (Leo)
या राशीमध्ये गुरु हा पाचव्या आणि आठव्या घराचा स्वामी आहे आणि तो मे महिन्यात दहाव्या घरात प्रवेश करत आहे. गुरू ग्रहाचं हे संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी अनुकूल सिद्ध होऊ शकते. कामाच्या ठिकाणी सर्व काही तुमच्या अनुकूल असेल. नवीन नोकरीचा शोध पूर्ण होऊ शकतो. थोडी उलथापालथ होईल, पण यश नक्कीच मिळू शकते. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करू शकतात. वरिष्ठांकडून मान-सन्मान मिळू शकतो. यासह, तुम्हाला गुप्त धन, मालमत्ता किंवा काही वारसा हक्क मिळू शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. या काळात तुम्ही काही चांगली मालमत्ता देखील खरेदी करू शकता.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या नवव्या घरात गुरू प्रवेश करेल, यामुळे तुम्हाला काही गोष्टींचा भरपूर फायदा होईल, तर काही गोष्टींबाबत तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल. तुम्ही तीर्थयात्रेलाही जाऊ शकता. नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदीची शक्यता जास्त आहे. परदेशात जाण्याची दाट शक्यता आहे. उच्च शिक्षणासाठीही हा काळ अनुकूल ठरेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे पूर्ण फळ मिळू शकते. तुमच्या जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. भावा-बहिणींशी चांगले संबंध प्रस्थापित होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani : 2024 मध्ये शनीची 'या' 4 राशींवर असणार विशेष कृपा; नोकरी-व्यवसायात मिळणार सफलता
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)