Guru Gochar : 2025 पर्यंत 'या' 3 राशी राहतील टेन्शन फ्री; लवकरच गुरु ग्रह चालणार वक्री चाल
Guru Gochar 2024 : गुरु ग्रह 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजून 01 मिनिटांनी वृषभ राशीत वक्री होणार आहे. तर, 4 फेब्रुवारी 2025 च्या दुपारी 01 वाजून 46 मिनिटांनी उलटी चाल चालणार आहेत.
Guru Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, धन-संपत्तीचा कारक देवगुरु बृहस्पतीला (Guru Gochar) नवग्रहांमध्ये अत्यंत शुभ ग्रह मानला जातो. तुमच्या जन्म कुंडलीत जर गुरुची स्थिती शुभ असेल तर तुम्हाला आयुष्यात सुख-सुविधा प्राप्त होऊ शकतात. समाजात तुम्हाला मान-प्रतिष्ठा मिळू शकते. सध्या गुरु ग्रह शुक्रच्या वृषभ राशीत (Taurus Horoscope) प्रवेश करणार आहे. तर, 2025 मध्ये 14 मे रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे.
गुरु ग्रह कधी होणार वक्री
गुरु ग्रह 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजून 01 मिनिटांनी वृषभ राशीत वक्री होणार आहे. तर, 4 फेब्रुवारी 2025 च्या दुपारी 01 वाजून 46 मिनिटांनी उलटी चाल चालणार आहेत. गुरुची वक्री चाल काही राशींच्या लोकांसाठी शुभकारक ठरणार आहे. याचा कोणत्या राशींना (Zodiac Signs) लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
गुरु ग्रह मिथुन राशीच्या दहाव्या चरणात वक्री होणार आहे. त्यामुळे गुरु ग्रहाच्या उलट्या चालीने मिथुन राशीच्या लोकांना चांगलाच लाभ होणार आहे. या काळात तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील. या काळात धन-संपत्ती कमावण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. या काळात तुम्ही मोठा निर्णय देखील घेऊ शकता.
कर्क रास (Cancer Horoscope)
गुरु ग्रह कर्क राशीच्या अकराव्या चरणात वक्री होणार आहे. यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडून येताना दिसतील. तसेच, या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक कार्यात तुमची जास्त रुची वाढेल. कुटुंबीयांबरोबर तुमचा चांगला वेळ जाईल. तसेच, तुमच्या व्यवसायात देखील तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या सहाव्या चरणात गुरु ग्रहाची वक्री होणार आहे. या राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाची उलटी चाल फार लाभदायक ठरणार आहे. गुरु ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या धन-संपत्तीत चांगली वाढ होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. जे तरुण रोजगाराच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल. तुमची तब्येत चांगली असणार आहे. मित्रांचा सहवास लाभेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :