एक्स्प्लोर

Garud Puran: 'महिलांवर वाईट नजर टाकाल तर याद राखा...तुमचाही हिशोब होतोय!' गरुडपुराणात महिलांवरील विविध अत्याचारासाठी 'या' भयानक शिक्षा

Garud Puran: गरुड पुराणात महिलांवरील अत्याचार आणि गुन्हे करणाऱ्यांसाठी अतिशय भयानक शिक्षा सांगण्यात आल्या आहेत. शिक्षा पूर्ण करून पुढचा जन्म कोणाचा मिळतो? हे देखील सांगण्यात आलंय

Garud Puran: आजकाल आपण महिला अत्याचाराशी संबंधित अशा अनेक बातम्या ऐकतो, वाचतो.. ज्यामुळे आपल्या अंगावर काटा येतो. अशा या वाढत्या घटनांमुळे महिलांचं घराबाहेर निघणं मुश्कील होऊन बसतं. महिलांवर अत्याचार करणारे नराधम कदाचित कायद्याच्या कचाट्यातून वाचतीलही...पण गरुडपुराणानुसार मोठं पाप करणाऱ्यांच्या श्रेणीत त्याच्या नावाची नोंद आधीच करण्यात आलीय. गरुड पुराणात महिलांवरील अत्याचार आणि गुन्हे करणाऱ्यांसाठी अतिशय धोकादायक शिक्षा सांगण्यात आल्या आहेत. जे पुरुष स्त्रियांवर लैंगिक अत्याचार करतात किंवा त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहतात त्यांना त्यांच्या वाईट कृत्यांबद्दल नरकात गेल्यावर सर्व प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतात. जाणून घ्या...

महिलांवरील अत्याचार आणि गुन्हे करणाऱ्यांसाठी अतिशय धोकादायक शिक्षा 

गरुडपुराणानुसार, यमराजाचे दूत पापी लोकांच्या आत्म्यांना त्यांच्या मृत्यूनंतर यमराजाच्या दरबारात कसे आणतात याचे वर्णन पुराणात आहे. याशिवाय यमराज मानवांना त्यांच्या कर्मानुसार कोणती शिक्षा देतात हे देखील सांगितले आहे. आज आम्ही तुम्हाला महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना नरकात कोणत्या शिक्षा भोगाव्या लागतात ते सांगत आहोत. जे महिलांचे लैंगिक शोषण करतात, त्यांना मारहाण करतात, या गुन्ह्यासाठी यमराजाचे दूत आरोपींना काय शिक्षा देतात?शिक्षा पूर्ण करून पुढील जन्म कोणाचा मिळतो. हेही गरुड पुराणात सांगितले आहे.

परस्त्रीकडे पाहणाऱ्या पुरुषाला 'ही' कठोर शिक्षा 

गरुड पुराणात सांगितले आहे की, जे लोक स्त्रियांवर अत्याचार करतात, ते मृत्यूनंतर नरकात पोहोचतात तेव्हा यमदूत त्यांना उकळत्या तेलात टाकतात. अशा लोकांवर यमदूत गरम वितळलेले लोखंड ओततात. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आणि महिलांविरुद्धचे गुन्हे करणाऱ्यांना काय शिक्षा भोगावी लागते? ते समजून घेऊया..जे पुरुष इतर स्त्रियांकडे पाहतात किंवा त्यांचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या आत्म्यांना नरकात जावे लागते आणि लोखंडी खांबाला आलिंगन द्यावे लागते. मग ज्या आत्म्याने घोर पाप केले. या शिक्षेमुळे आत्म्याचे संपूर्ण शरीर जळून जाते आणि पुढच्या जन्मी त्याला कोल्हा किंवा लांडग्याचा जन्म घ्यावा लागतो.

कुमारीका किंवा अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांना शिक्षा

गरुडपुराणानुसार जे चारित्र्यहीन पुरुष कुमारिका किंवा तरुणीशी शारीरिक संबंध ठेवण्याचे अपवित्र कृत्य करतात, त्यांना पुढील जन्मी अजगराची योनी मिळते. नरकात जाताना यमदूम त्यांना यमराजांसमोर हजर करतो. मग अशा पाप्यांना यमराज कठोरात कठोर शिक्षा देतात. नरकात गेल्यावर यमदूत अशा आत्म्यांना उकळत्या तेलात टाकतात, तळून घेतात आणि शारीरिक छळ करतात, असे गरुड पुराणात सांगितले आहे.

स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्यांना ही शिक्षा

गरुड पुराणात अशा पापी लोकांसाठी शिक्षा सांगितली आहे जे स्त्रियांना गर्भधारणा करून गर्भातच मुलींना मारण्याचे पाप करतात. अशा लोकांना भ्रूणहत्येचे दोषी मानले जाते. असे पुरुष पुढच्या जन्मी नपुंसक होतात. नरकात यमदूत अशा पापी माणसांना जंगली प्राण्यांप्रमाणे वागवतात आणि त्यांना कठोर शिक्षा देतात, जेणेकरून पुढच्या जन्मी असे पाप करण्याची त्यांची हिंमत होऊ नये.

मित्राच्या पत्नीशी संबंध ठेवणाऱ्यांना ही शिक्षा

गरुडपुराणानुसार, आपल्या मित्राचा विश्वासघात करून आपल्या पत्नीशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा पुरुषांना यमराज नरकात अत्यंत धोकादायक शिक्षा देतात. असे लोक अनेक वर्षे नरक यातना सहन करून गाढवाच्या योनीत जन्म घेतात आणि त्यांना पुन्हा पृथ्वीवर पाठवले जाते.

गुरूच्या पत्नीवर वाईट नजर टाकणाऱ्याला ही शिक्षा मिळते

गरुडपुराणानुसार, असे चारित्र्यहीन पुरुष जे आपल्या मातेसमान गुरूच्या पत्नीवर वाईट नजर टाकतात त्यांचे यमराज पुढील जन्मी सरड्याच्या जन्मात रूपांतरित करतात. जे वासनेने पीडित होऊन गुरूच्या पत्नीच्या सन्मानाचा अपमान करतात, त्यांना नरकात नग्न करून लोखंडी सळ्यांनी जाळले जाते. अनैसर्गिक कृत्य करणाऱ्यांना नरकात जाऊन डुक्कर व्हावे लागते. अनेक वर्षे यमदूताने दिलेल्या यातना सहन केल्यानंतर त्याला बैलाची योनी मिळते.

हेही वाचा>>>

Garud Puran: हिंदू धर्मात महिला स्मशानभूमीत का जात नाहीत? अनेकांना माहित नाही त्यामागचे कारण, गरुड पुराणात काय म्हटलंय?

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 September 2026 : आज सोमवारच्या दिवशी 6 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी खिशाला लागणार कात्री, आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 6 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी खिशाला लागणार कात्री, आजचे राशीभविष्य
Horoscope Today 15 September 2026 : आज ऋषी पंचमीचा दिवस 7 राशींसाठी शुभकारक; हातात घेतलेल्या कार्यात मिळेल यश, वाचा आजचे राशीभविष्य
आज ऋषी पंचमीचा दिवस 7 राशींसाठी शुभकारक; हातात घेतलेल्या कार्यात मिळेल यश, वाचा आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : उद्या 15 सप्टेंबरचा दिवस 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर; हातात घेतलेलं काम निर्विघ्न पार पडणार, वाचा लकी राशी
उद्या 15 सप्टेंबरचा दिवस 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर; हातात घेतलेलं काम निर्विघ्न पार पडणार, वाचा लकी राशी
Parivartan Yog 2026 : बुध-गुरु ग्रहाचा परिवर्तन योग; 31 ऑक्टोबरपर्यंत 4 राशी होणार मालामाल, हातात खेळणार पैसाच पैसा
बुध-गुरु ग्रहाचा परिवर्तन योग; 31 ऑक्टोबरपर्यंत 4 राशी होणार मालामाल, हातात खेळणार पैसाच पैसा

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: घरात घुसला, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेला जखमी केले; पुढे जे केलं, सगळे हादरले, बारामतीमधील थरकाप उडवणारी घटना
घरात घुसला, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेला जखमी केले; पुढे जे केलं, सगळे हादरले, बारामतीमधील थरकाप उडवणारी घटना
Ganesh Chaturthi 2026: ओम नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नमः.... मोरया, मोरया... पुण्यातील 'दगडूशेठ' गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती
ओम नमस्ते गणपतये... ओम गं गणपतये नमः....; पुण्यातील 'दगडूशेठ' गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती
UPI Payment Charges Update Marathi News: UPI पेमेंटद्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या व्यावहारावर शुल्क आकारले जाणार?; केंद्र सरकारची अधिसूचना जारी
UPI पेमेंटद्वारे 2000 रुपयांपेक्षा जास्त रक्कमेच्या व्यावहारावर शुल्क आकारले जाणार?; केंद्र सरकारची अधिसूचना जारी
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
Embed widget