Chandra Grahan 2024 : चंद्र ग्रहणाच्या वेळी चुकूनही 'या' चुका करु नका; भारतात चंद्रग्रहणाची वेळ आणि सूतक काळ काय असणार?
Chandra Grahan 2024 : धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहण दिसणं शुभ मानलं जात नाही. त्यामुळे या काळात काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
Chandra Grahan 2024 : या वर्षातील सर्वात शेवटचे आणि दुसरे चंद्रग्रहण (Chandra Grahan) भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमा तिथीला होणार आहे. या दिवशी पितृपक्षाचं पहिलं श्राद्ध देखील असणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहण दिसणं शुभ मानलं जात नाही. त्यामुळे या काळात काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
चंद्रग्रहण तिथी, वेळ आणि सूतक काळ
2024 वर्षातील चंद्र ग्रहण बुधवारी 18 सप्टेंबर 2024 रोजी असणार आहे. या ग्रहणाची सुरुवात भारतीय वेळेनुसार सकाळी 06 वाजून 11 मिनिटांनी होणार आहे. तर, सकाळी 10 वाजून 17 मिनिटांनी ग्रहण समाप्त होणार आहे. मात्र, असं असलं तरी हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही.
भारतात हे चंद्रग्रहण दिसत नसल्या कारणाने भारतात याचा सूतक काळ देखील नसणार आहे. मात्र, युरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अटलांटिका, उत्तर, पश्चिम आणि उत्तर अमेरिका यांसारख्या अनेक देशांत हे ग्रहण दिसणार आहे.
हिंदू धर्म आणि ज्योतिष शास्त्रानुसार, चंद्र ग्रहण दिसणं फार अशुभ मानलं जातं. यासाठी या काळात काही काम करणं अशुभ मानलं जातं. भारतात हे चंद्रग्रहण दिसत नसल्या कारणाने भारतात याचा सूतक काळ नसणार आहे. तसेच, कोणत्याही धार्मिक कार्याला प्रतिबंध नसणार आहे. मात्र, तरीही ग्रहणाच्या काळात काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण या दिवशी पितृपक्षाचं पहिलं श्राद्ध असणार आहे. तसेच, गर्भवती महिलांनी देखील याची काळी घेणं गरजेचं आहे.
ग्रहणाच्या वेळी राहू-केतूचा प्रभाव वाढतो
ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहणाच्या वेळी पृथ्वीवर राहू-केतूचा प्रभाव वाढतो. यासाठी या काळात शुभ कार्यासह इतर अनेक कार्य करण्यास नकार दिला जातो. तसेच, याकडे दुर्लक्ष केल्यास याचा विपरीत परिणाम सहन करावा लागतो. यासाठीच चंद्रग्रहणाच्या वेळी कोणते काम करणं टाळलं पाहिजे ते जाणून घेऊयात.
चंद्रग्रहणाच्या वेळी चुकूनही 'हे' काम करु नका
- चंद्र ग्रहणाच्या वेळी कोणतंही धार्मिक कार्य करु नये तसेच कोणत्याही देव-दैवतांच्या फोटोला स्पर्श करु नका.
- चंद्रग्रहणाच्या दिवशी पितृपक्षाचं पहिलं श्राद्ध असणार आहे. अशात ग्रहणाचा मोक्षकाळ समाप्त झाल्यानंतर पितरांचं पिंडदान, श्राद्ध किंवा तर्पण करावं.
- ग्रहणाच्या वेळी तुळशीला स्पर्श करु नका तसेच तुळशीचं पूजन करु नये किंवा तुळशीला जल अर्पण करु नये.
- ग्रहणाच्या वेळी भोजन करणे, बाहेर जाणे आणि सोनं खरेदी करु नये.
- गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या वेळी नकली गोष्टींचा देखील प्रयोग करता कामा नये. तसेच, अनोळखी ठिकाणी एकट्याने जाऊ नये.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :