(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandra Grahan: चंद्र ग्रहणामुळे यंदा होळीच्या रंगाचा होणार भंग; जाणून घ्या, वर्षातील पहिल्या ग्रहणाबाबतची इंतभूत माहिती
Holi And Chandra Grahan: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 25 मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण सर्व राशीवर परिणाम करणार आहे. परंतु काही राशीच्या लोकांवर या चंद्रग्रहणाचा विशेष प्रभाव असू शकतो.
Holi And Chandra Grahan: चंद्रग्रहण (Chandra Grahan) ही अतिशय महत्त्वाची खगोलशास्त्रीय घटना आहेत पण हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रातही त्या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. उलट धर्मात चंद्रग्रहणाचा ( Eclipse 2024) काळ शुभ कार्यासाठी अशुभ मानला जातो. या कारणास्तव चंद्रग्रहणा दरम्यान ना पूजाविधी केले जातात किंवा मंदिरांचे दरवाजे उघडले जात नाहीत. अशी अनेक कामे आहेत जी ग्रहण काळात करण्यास मनाई आहे. या वर्षात एकूण चार ग्रहणे होणार आहेत. या चार ग्रहणांपैकी दोन चंद्रग्रहण आणि दोन सूर्यग्रहण आहेत. या वर्षातील पहिले ग्रहण हे या महिन्यातील 25 मार्चला होणर आहे.
25 मार्च रोजी चंद्रग्रहण होईल तेव्हा चंद्र कन्या राशीत असेल जेथे राहू आधीच उपस्थित असेल.ज्या दिवशी चंद्रग्रहण होणार आहे त्या दिवशी धूलिवंदन आहे. पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला म्हणजेच सोमवार 25 मार्च 2024 रोजी चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण कन्या राशीत होणार आहे. वर्षातील पहिले चंद्रग्रहण सकाळी 10.23 पासून सुरू होईल आणि दुपारी 3.02 पर्यंत असणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक कालावधी वैध राहणार नाही.
वर्षातील पहिले चंद्रग्रहण कुठे दिसणार? (First Chandra Grahan)
भारताव्यतिरिक्त हे चंद्रग्रहण अमेरिका, जपान, रशियाचा काही भाग, आयर्लंड, इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल, इटली, जर्मनी, फ्रान्स, हॉलंड, बेल्जियम, दक्षिण नॉर्वे आणि स्वित्झर्लंडमध्ये दिसणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजी कॅलेंडरनुसार 2024 साली चार ग्रहण होतील. सोमवार, 25 मार्च रोजी पहिले चंद्रग्रहण होणार आहे. दुसरे चंद्रग्रहण बुधवार, 18 सप्टेंबर रोजी होणार आहे. याशिवाय सोमवार, 8 एप्रिल रोजी पहिले सूर्यग्रहण आणि बुधवार 2 ऑक्टोबर रोजी दुसरे सूर्यग्रहण होणार आहे.
होळी - 24 मार्चला होळी आहे. 25 मार्च रोजी धूलिवंदन आहे.
होळीवर चंद्रग्रहणाचे सावट
पंचागानुसार होळी 24 मार्चला असणार आहे. तर 25 मार्चला धूलिवंदन आहे. 25 मार्चला सकाळी 10.30 ते दुपारी 3.02 पर्यंत असणार आहे. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा 24 मार्च रोजी रात्री 09. 57 वाजता सुरू होईल आणि 25 मार्च रोजी रात्री 12.32 वाजता समाप्त होणार आहे. 25 मार्च रोजी चंद्रग्रहणाच्या सावटाखाली होळीचा सण साजरा केला जाणार आहे.
25 मार्चला वर्षातील पहिले चंद्रग्रहण
या वर्षातील पहिले चंद्रग्रहण हे 25 मार्चला होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. याचा सुतक कालावधी वैध नसणार आहे. यंदाचे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे सुतक कालावधीही ग्राह्य धरला जाणार नाही. त्यामळे ग्रहणाचा होळी आणि धूलिवंदानावर कोणताही परिणाम होणार आहे.
राशींवर चंद्रग्रहणाचा प्रभाव
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 25 मार्च रोजी होणारे चंद्रग्रहण सर्व राशीवर परिणाम करणार आहे. परंतु काही राशीच्या लोकांवर या चंद्रग्रहणाचा विशेष प्रभाव असू शकतो. चंद्रग्रहणामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते आणि चांगले आर्थिक लाभ होऊ शकतात. मिथुन, सिंह, मकर आणि धनु राशीच्या लोकांवर या चंद्रग्रहणाचा शुभ प्रभाव असणार आहे.
एप्रिलमध्ये पहिले सूर्यग्रहण
वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणानंतर एप्रिलमध्ये चैत्र अमावस्येला वर्षातील पहिले सूर्यग्रहण आहे. हे पश्चिम आशिया, दक्षिण-पश्चिम युरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अटलांटिक महासागर, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव येथे दिसणार आहे .
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :