एक्स्प्लोर

Astrology : आज मालव्य राजयोगासह जुळून आले अनेक शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींना मिळणार बंपर लाभ, लक्ष्मीच्या कृपेने होणार धनप्राप्ती

Panchang 31 May 2024 : आज शुक्रवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी, राजयोगांनी संपन्न झाला आहे, याचा 5 राशींना सर्वाधिक लाभ होणार आहे. या 5 राशींवर आज लक्ष्मीची कृपा राहील, त्यांची आज बंपर कमाई होईल. आजच्या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology 31 May 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज शुक्रवार, 31 मे रोजी शुक्र आपल्या स्वराशीत वृषभ राशीत असेल, ज्यामुळे मालव्य राजयोग तयार होत आहे, तर चंद्र कुंभ राशीनंतर मीन राशीत जात आहे. तसेच आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी असून या दिवशी मालव्य राजयोगासह शुक्रादित्य योग, प्रीति योग आणि शतभिषा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने असल्याने आजचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा लाभ मिळेल. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचा असणार आहे. मेष राशीचे लोक आज सर्वांच्या कल्याणाचा विचार करतील आणि एखादा मित्र तुम्हाला खूप दिवसांनी भेटू शकेल. जे लोक भागीदारीत व्यवसाय करतात त्यांना चांगला नफा मिळेल आणि त्यांच्या भागीदारांशी चांगले संबंध राहतील. नोकरदार लोकांचा दिवस प्रगतीचा असेल, त्यांना उत्पन्न वाढवण्याच्या अनेक संधी मिळतील. तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम अडकलं असेल तर नशिबाच्या साथीने ते पूर्ण होईल आणि तुम्ही इतरांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असाल. तुम्ही कौटुंबिक बाबींमध्ये नम्रता ठेवाल आणि भाऊ-बहिणींमध्ये सुरू असलेले मतभेद संवादातून सोडवाल.

कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा असेल. कर्क राशीच्या लोकांमध्ये आज चांगली ऊर्जा आणि आत्मविश्वास असेल, ज्याचा तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात फायदा होईल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांच्या इच्छा आज पूर्ण होतील आणि तुम्ही तुमच्या क्षेत्रात यशाची शिखरं गाठू शकाल. परदेश दौऱ्यावर जाण्याचा विचार करणाऱ्यांना आज चांगली संधी येऊ शकते. या राशीचे लोक जे अविवाहित आहेत ते त्यांच्या आयुष्याची सुरुवात नवीन जोडीदारासोबत करतील आणि त्याच्यासोबत मनापासून आनंदी राहतील. जे आधीपासून रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांचं नातं पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल आणि प्रियकरात आणि त्यांच्यात परस्पर समजही वाढेल. नोकरदार लोक आणि व्यावसायिक त्यांच्या क्षेत्रात नवीन संपर्क निर्माण करतील, ज्यामुळे भविष्यात चांगला फायदा मिळू शकेल. कुटुंबातील सर्व सदस्यांशी संबंध चांगले राहतील.

कन्या रास (Virgo)

आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी विशेष फलदायी असणार आहे. कन्या राशीचे लोक आज कोणत्याही त्रासाशिवाय पैसे कमावताना दिसतील. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी खूप वाढ आणि प्रगती दिसेल. आज व्यावसायिकांना मोठा नफा कमावण्याची संधी मिळेल आणि ते इतर व्यवसायातही गुंतवणूक करू शकतात. दिवसातील काही वेळ तुम्ही तुमच्या पालकांची सेवा करण्यात घालवाल, ज्यामुळे मानसिक शांती मिळेल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत थंड ठिकाणी जाण्याचा विचारही कराल. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना त्या दिशेने यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी तुमच्या मुलांच्या भविष्याशी संबंधित काही योजना करण्याबद्दल बोलू शकता. सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडतील, त्यामुळे सन्मान वाढेल.

धनु रास (Sagittarius)

आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. तुमचे मित्र आज तुम्हाला एखादी समस्या सोडवण्यासाठी मदत करतील आणि तुमची अनेक प्रभावशाली लोकांशीही भेट होईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील आणि आज तुम्हाला विविध स्त्रोतांकडून पैसेही मिळतील. नोकरदार लोकांना आज नवीन प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उत्पन्नात वाढ होईल आणि तुमचा प्रभावही वाढेल. आज व्यवसायिक आपला व्यवसाय वाढवण्याची योजना आखतील, ज्यामुळे भविष्यात चांगला नफा मिळेल आणि तुमची प्रतिष्ठा देखील सर्वत्र वाढेल. तुमच्या कुटुंबाप्रती तुमचे प्रेम आणि आपुलकी कायम राहील आणि तुम्ही धार्मिक कार्यातही उत्साहाने सहभागी व्हाल. जर तुम्ही आधी गुंतवणूक केली असेल तर आज तुम्हाला चांगला परतावा मिळेल आणि प्रॉपर्टी खरेदी करण्याचं तुमचं स्वप्नही पूर्ण होईल.

कुंभ रास (Aquarius)

आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम देईल. कुंभ राशीच्या लोकांना आज त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने अनेक उत्तम संधी मिळतील आणि ते त्यांच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडू शकतील. कामाच्या ठिकाणी कोणताही निर्णय बुद्धिमत्तेच्या आधारे घेणं तुमच्यासाठी चांगलं राहील. व्यावसायिक लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल, कारण त्यांना व्यवसायाशी संबंधित काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. गुंतवणूक करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल आणि त्यांचा बँक बॅलन्सही वाढेल. आध्यात्मिक क्षेत्रातील आवड जागृत होईल. कौटुंबिक वातावरण आनंद, शांती आणि समृद्धीचं असेल आणि तुम्हाला घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वादही मिळेल. वैवाहिक जीवनात काही वाद चालू असतील तर ते आज संपुष्टात येतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Vakri : शनीची उलट चाल 'या' 4 राशींवर पडणार भारी; पुढच्या 5 महिने सावधानीचे, पाण्यासारखा पैसा वाया जाणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar : शिवसेना भाजपपासून वेगळी करण्यासाठी 2014 च्या पाठिंब्याचं वक्तव्यTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 8 AM : 13 नोव्हेंबर  2024: ABP MajhaPM Narendra Modi : महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांसोबत पंतप्रधान मोदींचा संवादTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  1 PM : 16 नोव्हेंबर  2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
×
Embed widget