(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Vakri : शनीची उलट चाल 'या' 4 राशींवर पडणार भारी; पुढच्या 5 महिने सावधानीचे, पाण्यासारखा पैसा वाया जाणार
Shani Vakri 2024 : शनि 29 जूनला कुंभ राशीत वक्री स्थितीत जाईल, ज्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होईल. काही राशींसाठी शनीची ही चाल शुभ मानली जाते, तर काहींसाठी ही अशुभ मानली जाते.
Shani Vakri 2024 : शास्त्रानुसार, शनि (Shani) हा न्याय देवता आहे. शनीला ज्योतिषशास्त्रात दंडाधिकारी म्हणतात, कारण शनि कर्मानुसार व्यक्तीला फळ देतात. सर्व ग्रहांप्रमाणेच शनिदेवही ठराविक काळानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात आणि व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार शुभ-अशुभ फल देतात.
परंतु जेव्हा शनि एखाद्या राशीत वक्री (Shani Vakri 2024) स्थितीत असतो तेव्हा त्यांच्या जीवनात अशांतता येते. शनि सध्या कुंभ राशीत स्थित आहे आणि कुंभ राशीतच तो वक्री होईल, ज्याचा परिणाम अनेक राशींवर होणार आहे.
शनि वक्री 2024 वेळ
ज्योतिष शास्त्रानुसार 29 जून 2024 रोजी शनि कुंभ राशीत वक्री होईल. 29 जून रोजी 12 वाजून 35 मिनिटांनी शनि उलट चाल चालण्यास सुरुवात करेल. 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत शनि वक्री स्थितीत असेल. अशा स्थितीत, शनीच्या उलट चालीचा अनेक राशींवर मोठा प्रभाव पडू शकतो आणि काही राशींसाठी सुमारे 5 महिन्यांचा काळ अतिशय वेदनादायी असू शकतो. नेमक्या कोणत्या राशींना शनीच्या उलट चालीचा त्रास होईल? जाणून घेऊया.
शनीची उलट चाल 'या' राशींवर पडणार भारी
मेष रास (Aries)
शनीची उलटी चाल मेष राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते. या काळात तुमच्या कामात अडथळे येतील आणि आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता आहे. वाद वाढू शकतात, ज्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे शनि वक्री अवस्थेत असताना तुम्ही धीर धरा आणि मेहनत करून तुमचं काम करत राहा.
वृषभ रास (Taurus)
शनीच्या उलट्या चालीचा वृषभ राशीच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडेल. कारण शनि तुमच्या राशीच्या दहाव्या घरावर प्रभाव टाकेल. हा काळ आव्हानात्मक असेल. धन आणि व्यवसायात नुकसान होण्याचीही शक्यता आहे.
मकर रास (Capricorn)
शनि वक्री होऊन मकर राशीच्या लोकांच्या अडचणी वाढवणार आहे. विशेषत: यावेळी करिअर आणि व्यवसायाची काळजी घ्या. यावेळी तुमच्या इच्छेनुसार काम न मिळाल्याने तुम्हाला नैराश्य येऊ शकतं.
मीन रास (Pisces)
ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीच्या लोकांवर शनीच्या उलट चालीचा अशुभ प्रभाव पडेल. घरी, प्रिय व्यक्तींसोबत वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि तुम्हाला कामाच्या ठिकाणी समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :