एक्स्प्लोर

Astrology : आज बुधादित्य योगासह बनले अनेक शुभ योग; वृषभसह 'या' 5 राशींचं नशीब पालटणार, अनपेक्षित धनलाभाचे संकेत, राशीनुसार करा 'हे' उपाय

Panchang 27 March 2024 : आज, म्हणजेच 27 मार्च रोजी हर्षन योग, बुद्धादित्य योगासह अनेक फायदेशीर योग तयार होत आहेत, ज्यामुळे आजचा दिवस वृषभ, कर्कसह 5 राशींसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरणार आहे. आज तुम्हाला नोकरी-व्यवसायातून आर्थिक लाभ मिळू शकतो.

Astrology Today 27 March 2024 : आजचा दिवस ग्रहांच्या स्थितीमुळे फार महत्त्वाचा मानला जातो. आज, बुधवार, 27 मार्चला चंद्र तूळ राशीत प्रवेश करत आहे. आज चंद्र आणि मंगळ एकमेकांपासून नवव्या आणि पाचव्या घरात असल्यामुळे नवपंचम राजयोग देखील तयार होत आहे. तसेच आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची दुसरी तिथी असून या दिवशी हर्षन योग, बुधादित्य योग आणि चित्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे, त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा फायदा होणार आहे. या भाग्यवान 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. आज आर्थिक बाबतीत तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. आज उत्पन्नाचे काही नवीन स्रोत निर्माण होतील. आज तुम्हाला एखाद्या शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. नोकरदार लोकांना आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार काम मिळाल्याने आनंद होईल. तुमच्या सहकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील. तुमच्या कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याचे संकेत आहेत. आज तुमचं कौटुंबिक वातावरण चांगलं राहील.

बुधवारचा उपाय : आर्थिक प्रगतीसाठी बुधवारी एका हिरव्या कपड्यात 7 कवड्या आणि मूठभर हिरवी मूग डाळ बांधून मंदिराच्या पायरीवर ठेवा.

कर्क रास (Cancer)

आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. कर्क राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. बाप्पाच्या कृपेने तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील सर्व समस्या दूर होतील. आज तुमची काही नवीन लोकांशी मैत्री होईल, त्यांच्या मदतीने तुमची काही प्रलंबित कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक केल्यास भविष्यात तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तुमच्या कुटुंबात सुख-समृद्धी राहील आणि जोडीदाराशी संबंध अनुकूल राहतील. आज तुमचं आरोग्य चांगलं राहील आणि तुमचे भावा-बहिणींसोबतचे संबंधही चांगले राहतील. नातेवाईकांशी सुरू असलेले वाद मिटतील.

बुधवारचा उपाय : तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी सात बुधवारी गणपतीला मूगाचे लाडू अर्पण करा, यामुळे कुंडलीत बुधाची स्थितीही मजबूत होते.

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. तूळ राशीच्या लोकांना आज पैसे कमावण्याच्या संधी मिळतील आणि तुमचा बँक बॅलन्स चांगला राहील.  व्यावसायिकांना आज चांगला नफा मिळू शकेल. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनाविषयी बोलायचं झाल्यास, तुमचे तुमच्या जोडीदारासोबत चांगले संबंध राहतील आणि तुम्ही बाहेर कुठेतरी तीर्थयात्रेला जाण्याचाही विचार कराल. बाप्पाच्या कृपेने तुमच्या मान-सन्मानात आणि संपत्तीत चांगली वाढ होईल. आज तुम्हाला भेटवस्तू म्हणून काहीतरी मौल्यवान मिळेल आणि तुमची मुलं तुमच्या अपेक्षा पूर्ण करतील, ज्यामुळे तुमचं मन आनंदी राहील.

बुधवारचा उपाय : अडथळे आणि रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी नपुंसकांना हिरवे कपडे दान करा आणि हिरवा मूग बुधवारी मंदिरात किंवा गरजूंना दान करा.

कुंभ रास (Aquarius)

आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. आज तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित कोणत्याही बाबतीत विजय मिळू शकेल. पैशाची बचत करून तुमचं भविष्य सुरक्षित करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरी करणारे लोक बॉससमोर आपल्या भावना व्यक्त करू शकतात. जर बरेच दिवस तुमच्या सासरच्या लोकांसोबत तुमचे संबंध चांगले नसतील, तर आज तेही सुधारतील. अध्यात्मिक गोष्टींमध्ये तुमची रुची वाढेल आणि तुम्ही काही धार्मिक कार्यातही सक्रिय सहभाग घ्याल. भाऊ-बहिणींसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्या गरजा पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगलं यश मिळेल आणि तुमची एकाग्रता वाढेल.

बुधवारचा उपाय : आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळवण्यासाठी गणपती बाप्पाला सिंदूर अर्पण करा आणि एका हिरव्या कपड्यात मूठभर हिरवा मूग बांधून तलावात सोडा.

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक परिणाम देणारा असेल. मीन राशीच्या लोकांची देवाप्रती श्रद्धा अधिक दृढ होईल. आज श्रीगणेशाच्या कृपेने तुम्हाला अनेक समस्यांपासून मुक्ती मिळेल. जर तुम्ही भागीदारीत कोणतेही काम सुरू केलं असेल तर आज त्यात तुम्हाला चांगला नफा मिळेल. तुमचे तुमच्या जोडीदारासोबत चांगले संबंध राहतील. तुम्ही मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लॅन बनवाल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली संधी मिळू शकते, तुम्ही एखादा नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकता.

बुधवारचा उपाय : नोकरी-व्यवसायात प्रगतीसाठी तूपात साखर मिसळून गायीला खाऊ घाला.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Numerology : प्रचंड हुशार आणि चतुर असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जिथे जातात तिथे होतं यांचं कौतुक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | 6.30 AM | 12 Jan 2025 | एबीपी माझा हेडलाईन्स | Maharashtra PoliticsVile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
Embed widget