Astrology : आज शुक्र प्रदोष व्रतादिवशी जुळून आले मोठे शुभ योग; मेषसह 5 राशींचं नशीब लखलखणार, अचानक धनलाभाचे संकेत
Panchang 13 December 2024 : आज शुक्रवारचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी शिव योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
Astrology Panchang 13 December 2024 : आज शुक्रवार, 13 डिसेंबर रोजी चंद्र मेष राशीनंतर वृषभ राशीत जाणार आहे. तसेच आज मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असून या तिथीला शुक्र प्रदोष तिथी व्रत पाळलं जाईल. शुक्र प्रदोषावर शिवयोग, सिद्ध योग आणि भरणी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries Horoscope Today)
आजचा म्हणजेच शुक्र प्रदोष व्रताचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ असणार आहे. मेष राशीचे लोक धार्मिक कार्यात सक्रिय भाग घेतील. सामाजिक क्षेत्रातील लोकप्रियता वाढल्याने तुमचं सोशल सर्कल वाढेल, यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल आणि प्रत्येक काम योग्य वेळी करू शकाल. नोकरदार लोक त्यांचं ध्येय साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करतील, मनापासून काम करतील. त्याचबरोबर व्यापारी आज व्यावसायिक कामात थोडं अधिक लक्ष देतील. जोदीदाराशी जवळीक वाढेल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. कर्क राशीचे लोक आज त्यांच्या बोलण्या-वागण्यात सौम्य राहतील, ज्यामुळे सर्वत्र आदर मिळेल. सरकारी नोकरीची तयारी करणारे विद्यार्थी यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करतील, शिक्षक आणि वडिलांचं पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरी करणारे आज त्यांच्या करिअरमध्ये चांगलं यश मिळवतील, मेहनत आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर तुमची कामं पूर्ण कराल आणि कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळेल. कोणतंही नवीन कार्य सुरू करायचं असल्यास शुक्र प्रदोष व्रताचा दिवस अनुकूल राहील. संध्याकाळी कुटुंबियांसोबत मज्जा कराल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळेल. लव्ह लाईफबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात समाधानी दिसाल आणि तुमचं नातं प्रेम आणि सुसंवादाने परिपूर्ण असेल. जर तुम्हाला जमीन किंवा घर घ्यायचं असेल तर तुमची इच्छा आज महादेवाच्या कृपेने पूर्ण होऊ शकते. आज तुमचे कामातील सहकारी चांगले वागतील आणि तुमच्या कामात तुम्हाला सहकार्यही करतील, ज्यामुळे तुमच्यामध्ये मजबूत बंध निर्माण होईल. भावंडांसोबत काही मतभेद असल्यास ते आज संपुष्टात येतील आणि तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी ऐकू येईल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी खूप फलदायी असणार आहे. मकर राशीच्या लोकांना आज वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते किंवा अचानक पैसे मिळू शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आज आपण वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात आधीच असलेल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल आणि त्यात यशस्वीही व्हाल. आज काही नातेवाईक घरी येतील. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा होण्याची शक्यता आहे. कोणत्याही समस्येवर तुम्ही वडिलांचा सल्ला घेतल्यास तुमची समस्या बऱ्याच प्रमाणात दूर होईल. आज तुम्ही मित्रांसोबत संध्याकाळ घालवाल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांसाठी शुक्र प्रदोष व्रत फलदायी ठरणार आहे. आज मीन राशीचे लोक पैशांमुळे प्रलंबित राहिलेली कामं पूर्ण करतील. कुटुंबातील सदस्यांसाठी ऑनलाइन शॉपिंग देखील करू शकतात. आज व्यावसायिकांना व्यवसायात चांगली वाढ दिसेल. विद्यार्थ्यांचा अभ्यासात अधिक रस निर्माण होईल आणि नवीन गोष्टी शिकून त्यांना आनंद मिळेल. जर तुम्ही एखाद्याला दीर्घकाळ पैसे दिले असतील तर ते तुम्हाला आज परत मिळतील, ज्यामुळे तुमचं मन आनंदी होईल. तुमच्या मालमत्तेशी संबंधित काही वाद असतील तर ते आज मिटू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: