(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aries Horoscope Today 23rd March 2023 : मेष राशीच्या लोकांच्या नात्यात गोडवा राहील; नातेसंबंध जपण्यासाठी आजचा दिवस खास
Aries Horoscope Today 23rd March 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) नोकरदार लोकांनी आपल्या जुन्या नोकरीला चिकटून राहणे चांगले.
Aries Horoscope Today 23rd March 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. जे नोकरदार (Employees) वर्ग आहेत, त्यांनी दिलेली कामे वेळेत पूर्ण करावीत. वरिष्ठही तुम्हाला मदत करतील. तुमची क्षमता ओळखा. पालकांच्या (Parents) मदतीने तुम्ही आर्थिक संकटातून बाहेर पडू शकाल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून (Life Partner) काही चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचा उत्साह द्विगुणित होईल. तुम्ही ऑफिसमधून घरी परत येऊन तुमचे आवडते काम करू शकता, यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. कामाचा अतिरेक तुम्हाला उद्या मानसिक त्रास देऊ शकतो. यासाठी, संध्याकाळी थोडा वेळ ध्यान करा. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. उच्च शिक्षणासाठी (Higher Education) काळ चांगला आहे.
वैवाहिक नात्यात गोडवा राहील
मेष राशीच्या (Aries Horoscope) नोकरदार लोकांनी आपल्या जुन्या नोकरीला चिकटून राहणे चांगले. आर्थिक स्थितीही हळूहळू सुधारताना दिसेल. आज तुमच्या वैवाहिक नात्यात गोडवा राहिल. पती-पत्नीच्या नात्यातील जवळीक वाढताना दिसेल. आज समाजाशी संबंधित कामात मान-सन्मान मिळेल. आज तुम्हाला नोकरीत बढतीच्या संधीही मिळतील. तुमचे मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही एकांतात वेळ घालवणं गरजेचं आहे. गृहस्थ जीवनात सुख-शांती नांदेल. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी काम करताना दिसाल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह खरेदी आणि पिकनिकला जाण्याची शक्यता आहे.
इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करणे टाळा. व्यावसायिकदृष्ट्या कोणतेही निर्णय घेताना संयम राखा. खर्च कमी करा. कौटुंबिक वादविवाद टाळा. मानसिक चिडचिड कमी करा. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या.
मेष राशीसाठी आजचे आरोग्य
गॅस्ट्रिकच्या समस्येमुळे पोट खराब होऊ शकते. मसालेदार पदार्थ खाणे टाळा. दिवसा दह्याचं सेवन करणे फायदेशीर ठरेल.
मेष राशीसाठी आजचे उपाय
नारायण कवच पठण केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :