एक्स्प्लोर

Horoscope Today 23rd March 2023 : आज 'या' राशीच्या लोकांना शुभ लाभ होतील, तुमच्या नशिबाचे तारे काय म्हणतात? राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 23rd March 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 23rd March 2023 : आज गुरुवार हा एक महत्त्वाचा दिवस आहे. आज, मेष राशीच्या लोकांना कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वृषभ राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळेल. मिथुन राशीच्या लोकांना कुटुंबासोबत राहण्याची संधी मिळेल. कर्क, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. तर, काही राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मेष ते मीन राशीसाठी गुरुवार कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशीबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. 

मेष 

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. जे नोकरदार वर्ग आहेत, त्यांनी दिलेली कामे वेळेत पूर्ण करावीत. वरिष्ठही तुम्हाला मदत करतील. तुमची क्षमता ओळखा. पालकांच्या मदतीने तुम्ही आर्थिक संकटातून बाहेर पडू शकाल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचा उत्साह द्विगुणित होईल.  तुम्ही ऑफिसमधून घरी परत येऊन तुमचे आवडते काम करू शकता, यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. कामाचा अतिरेक तुम्हाला उद्या मानसिक त्रास देऊ शकतो. यासाठी, संध्याकाळी थोडा वेळ ध्यान करा. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस  तुमच्यासाठी खूप चांगला आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा आणि पैसे कसे वाचवायचे ते शिका, जे तुमच्या भविष्यात खूप उपयुक्त ठरेल. नोकरीमध्ये प्रगती झाल्यानंतर नोकरदार लोक आनंदी दिसतील. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळेल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना आणखी काम करण्याची संधी मिळेल. कुटुंबात शुभ कार्याचे कार्यक्रम आयोजित केले जातील. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकतील. तुमचे वडीलही तुमच्या व्यवसायात काही पैसे खर्च करतील. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला भेटवस्तू मिळेल. तुमचे प्रेम जीवन चांगले होईल.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल खूप उत्सुक असाल. व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी व्हाल. मुलांशी खूप कठोरपणाने वागू नका. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. मुलांवर रागावल्याने तुमच्या नातेसंबंधात एक भिंत तयार होऊ शकते. राजकारणात यश मिळेल. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. जे लोक स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांना अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. 

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आहे. विद्यार्थ्यांचं अभ्यासाकडे लक्ष विचलित होईल. त्यामुळे परीक्षेत याचा परिणाम दिसून येऊ शकतो. तुमचा वेळ वाया घालवणाऱ्या तुमच्या मित्रांपासून दूर राहा. आजचा दिवस कुटुंबियांसोबत घालवा. तुम्हाला तुमच्या बोलण्यातला गोडवा कायम ठेवावा लागेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. अविवाहित लोकांसाठी, त्यांच्या नातेवाईकांद्वारे चांगली स्थळं येतील. घरापासून दूर अभ्यास करणाऱ्यांना त्यांच्या कुटुंबाची उणीव भासू शकते. 

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुम्ही खूप उत्साही असाल. कामातही तुमचा वेग जाणवेल. अतिरिक्त पैसे रिअल इस्टेटमध्ये गुंतवले जाऊ शकतात. घरात एकोपा राखण्यासाठी एकत्र काम करा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. घरामध्ये पूजा, पाठ इत्यादींचे आयोजन केले जाईल, ज्यामध्ये सर्व परिचित, नातेवाईकांचे येणे-जाणे चालू राहील. सर्व लोक एकत्र धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखतील, जिथे सर्व लोक खूप आनंदी दिसतील. तुमचे प्रेम जीवन चांगले होईल. विद्यार्थी स्पर्धेच्या तयारीसाठी कठोर परिश्रम करताना दिसतील, ज्यामध्ये त्यांना यश मिळेल. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. तब्येतीत सुधारणा होईल. कोणत्याही कामाला जाताना घरातील ज्येष्ठांचा आशिर्वाद घ्या.  

कन्या 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. कामापेक्षा आरोग्याला प्राधान्य द्या. खाण्यापिण्याची काळजी घ्या. जास्त दगदग करू नका. आर्थिक बाजू मजबूत होण्याची सर्व शक्यता आहे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे दिले असतील तर तुम्हाला ते परत मिळतील अशी अपेक्षा आहे. भावा-बहिणींचेही सहकार्य मिळेल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचे वैवाहिक जीवन चांगले होईल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. मित्रांच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळतील. राजकारणात यश मिळेल. व्यवसाय करणारे लोक आपला व्यवसाय पुढे नेण्यात यशस्वी होतील. 

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायाला पुढे नेण्यात यश मिळेल. आज तुमचे रखडलेले पैसे परत मिळवण्यासाठी मित्र तुम्हाला मदत करतील. जर तुम्ही याआधी कोणतीही गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदाही मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही केलेल्या प्रयत्नात यश मिळेल. विद्यार्थी एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जाऊ शकतात. भावा-बहिणींच्या सहकार्याने तुम्हाला आर्थिक लाभ होईल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील.

वृश्चिक 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. हा दिवस मौजमजेचा आणि तुमचे आवडते काम करण्यासाठी आहे, ज्यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह खरेदी आणि पिकनिकला जाण्याचा प्लॅन करू शकता. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळेल. जे प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतात, त्यांना चांगली डील मिळू शकते. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यामुळे तणाव आणि चिंता होऊ शकते. आज तुमचे मित्र तुम्हाला तुमच्या घरी भेटायला येतील, त्यांना भेटून सर्वजण खूप आनंदी दिसतील. कुटुंबीयांसह धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल, मनाला शांती मिळेल.

धनु 

आपण धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. मित्र आणि कुटुंबियांसोबत मजेत वेळ जाईल. राजकारणात यश मिळेल. नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. उद्या तुमच्या कुटुंबाच्या अधिक जबाबदाऱ्या सोपवल्या जातील, ज्या तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडाल. लहान मुले तुमच्याकडून काही मागण्या करतील, ज्या तुम्ही नक्कीच पूर्ण कराल. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी मेहनत करताना दिसतील. जे लोक स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांना जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. आज आरोग्याशी संबंधित छोट्या तक्रारी तुम्हाला अस्वस्थ करू शकतात. प्रेमाच्या दृष्टिकोनातून, आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला आहे. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. भावाच्या लग्नात येणारे अडथळे दूर होतील. घरात मंगल कार्याचे आयोजन करण्यात येईल. 

कुंभ 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असणार आहे. आज तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी असतील. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र काम करताना दिसणार आहेत. घरोघरी भजन, कीर्तनाचे आयोजन केले जाईल. आज तुम्हाला कुटुंबाच्या भल्यासाठी महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल, ज्यामुळे काही लोक नाराज होतील. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्ही यापूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा पूर्ण लाभ तुम्हाला मिळेल. भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमात थोडा वेळ घालवा. कुटुंबातील एखादा सदस्य आजारी पडल्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही पहिल्या नजरेतच एखाद्याच्या प्रेमात पडू शकता. त्यामुळे जरा सांभाळून राहा. तुमची प्रलंबित कामे आज पूर्ण होतील. सकारात्मक विचार ठेवा. 

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. पैशांची योग्य बचत कराल. आज तुम्हाला दूरच्या नातेवाईकांकडून शुभवार्ता ऐकायला मिळू शकते ज्यामुळे घरचं वातावरण आनंदी राहील. तसेच, आज तुमची सगळी कामे अपेक्षेपेक्षा वेळेत पूर्ण होतील. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. तुमची सर्व कामे होतील. आपल्या मुलाला चांगली नोकरी मिळाल्याबद्दल पालकांना खूप आनंद होईल. तसेच, आज तुम्हाला नवीन वाहन घेण्याचा देखील चांगला योग आहे. घर, प्लॉट, दुकान इत्यादी खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरीत बढतीची संधी मिळेल. व्यवसाय करणारे लोक नवीन व्यक्तींच्या संपर्कात येतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 22nd March 2023 : आजचा बुधवार 'या' 6 राशींसाठी लाभदायक! जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या लोकांचं आजचं राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Sambhajiraje Chhatrapati :स्मारकासाठी कोर्टातून स्थगिती मिळवणाऱ्या वकिलांना शोधावंABP Majha Headlines :  5 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदीABP Majha Headlines :  4 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Mumbai fire: रॉकेलचा कॅन अन् पेटत्या दिव्यामुळे गुप्ता कुटुंबीयांचा घात झाला, आग झटक्यात पसरली अन् 7 जण मृत्युमुखी
पेटत्या दिव्यामुळे गुप्ता कुटुंबीयांचा घात झाला, आग झटक्यात घरभर पसरली अन् 7 जण मृत्युमुखी
Nanded : सोयाबीनच्या शेंगा खाल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा, 12 वर्षीय मुलीचा मृत्यू 
सोयाबीनच्या शेंगा खाल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा, 12 वर्षीय मुलीचा मृत्यू 
Embed widget