(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Swabhimani Shetkari Sanghatana : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा, अतिवृष्टी झालेल्या सर्वच मंडळात पंचनामे सुरु
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं तत्काळ मदत करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली होती. त्यानंतर तत्काळ बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या सर्वच मंडळात पंचनामे सुरु झाले आहेत.
Swabhimani Shetkari Sanghatana : राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळं नदी नाल्यांना पूर आल्यान, जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच काही ठिकाणी शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं तत्काळ मदत करावी. शेतकऱ्यांचा जर राग अनावर झाला तर लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरणेही मुश्किल होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं (Swabhimani Shetkari Sanghatana) दिला होता. त्यानंतर तत्काळ बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात अतिवृष्टी झालेल्या सर्वच मंडळात अधिकाऱ्यांनी पंचनामे सुरु केले आहेत.
अतिवृष्टीमुळं विदर्भातील शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं तत्काळ मदत करावी. शेतकऱ्यांचा जर राग अनावर झाला तर लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरणेही मुश्किल होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला होता. त्यानंतर याची प्रशासनानं तत्काळ दखल घेत बुलढाणा जिल्ह्यातील नुतसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरु केले आहेत. सर्वच मंडळात प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी पंचनामा करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, आता पंचनामे सुरु झाले असले तरी जिल्ह्यातील शेतकरी मदत केव्हा मिळणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
काय म्हणाले होते रविकांत तुपकर
अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे तातडीनं पंचनामे करावे, तसेच त्यांना तत्काळ मदत करावी अशी मागणी रविकांत तुककर यांनी केली होती. हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी असी मागणी ही त्यांनी केली होती. राज्यातील बऱ्याच भागात शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यांची संपूर्ण पिकं पाण्याखाली गेली आहे. त्यामुळं तत्काळ मदत करण्याची मागमी शेतकरी करत आहे. आज जी परिस्थिती महाराष्ट्रातील विदर्भातील शेतकऱ्यांवर आली आहे, एवढी वाईट परिस्थिती शेतकऱ्यांवर कधीच आली नव्हती असे तुपकर म्हणाले होते.या काळात सरकार मदत करणार नाही तर मग कोण मदत करणार? असा सवाल देखील तुपकर यांनी उपस्थित केला होता. जसे श्रीलंकेतील राष्ट्रपतीच्या घराचा ताबा लोकांनी घेतला, तसेच शेतकऱ्यांना जर राग आला तर लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर फिरणे अवघड होईल. आमचा संयम सुटत चालला असल्याचे तुपकर म्हणाले होते. त्यामुळं तत्काळ पंचनामे करुन हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: