एक्स्प्लोर

Nitin Gadkari : कृषी विकासदर 22 टक्क्यांवर आणायचाय, त्यासाठी कृषी संशोधनाची माहिती क्षेत्रीय भाषेमध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा : गडकरी

संशोधन करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांनी कृषी संशोधनाची माहिती क्षेत्रीय भाषेमध्ये शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावी असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी केलं

Nitin Gadkari : संशोधन करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांनी कृषी संशोधनाची माहिती क्षेत्रीय भाषेमध्ये शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावी असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी केलं. देशातील कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला सक्षम करण्यासाठी संशोधन महत्त्वाचे असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं. राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन वापर व्यवस्थापन संस्थांच्या ( National Bureau of Soil Survey and Land Use Planning) 46 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात  मुख्य अतिथी म्हणून गडकरी बोलत होते. तसेच कृषी विकासदर हा 22 टक्क्यांवर आणायचा असल्याचे देखील गडकरी म्हणाले.

पिकांच्या लागवडीसाठी योग्य मातीची निवड करणं गरजेचं
 
विदर्भात मोठ्या प्रमाणात संत्रा आणि कापसाचे क्षेत्र आहे. यावर संशोधन करणाऱ्या संशोधन संस्था तसेच मातीचे सर्वेक्षण करणारी राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन व्यवस्थापन संस्था यांनी आपल्या संशोधनाची माहिती क्षेत्रीय भाषेमध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. त्यासाठी चित्रफितीचा देखील वापर करावा असे आवाहन गडकरी यांनी केलं. संत्रा, सोयाबीन, कापूस यांच्या लागवडीसाठी योग्य मातीची निवड करणे गरजेचे असते. लागवड करण्यापूर्वी योग्य प्रकारचे बियाणांची निवड करणे गरजेचे आहे. तसेच कीटकनाशक, पाणी यांचा वापर करुन योग्य तंत्रज्ञानाद्वारे संशोधनाचा उपयोग समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी विविध संशोधन संस्थामध्ये समन्वय, संवाद आणि सहकार्य आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.

कृषी विकासदर हा 22 टक्क्यांवर आणायचाय, यासाठी संशोधन महत्त्वाचे

भारताला कृषी तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेत आत्मनिर्भर करण्यासाठी एनबीएसएलयुपी सारख्या संस्थांचे संशोधन महत्त्वाचे आहे. आपल्याला कृषीचा विकास दर हा 22 टक्क्यांवर आणायचा आहे. यासाठी  हे संशोधन कामात येईल असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. कृषी संशोधनामध्ये केंद्र शासनाच्या कार्यरत असणाऱ्या संस्थांनी परस्पर संवाद तसेच सहकार्याच्या माध्यमातून सर्व हितधारकांना सोबत घेणे आवश्यक आहे. केंद्रीय लिंबूवर्गीय फळे संशोधन संस्थेने नागपूर शहर जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील नर्सरी सोबत जॉइंट व्हेंचर करून संत्र्याच्या कलमांची लागवड केल्यास  शेतकऱ्यांना माफक दरात कलम उपलब्ध होऊन संत्रा पिकाची  उत्पादकता वाढेल, असे त्यांनी सुचवले. आपल्या देशामध्ये ऊस, सोयाबीन, कापूस या क्षेत्रांमध्ये दर एकरी उत्पादन हे इतर देशांच्या तुलनेत कमी असल्याचे गडकरी म्हणाले.

राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन व्यवस्थापन संस्थेचा 46 व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी वैज्ञानिकांचा सत्कार देखील गडकरींच्या हस्ते करण्यात आला. एनबीएसएलयुपी चे संचालक डॉ.बी.एस. द्विवेदी यांनी संस्थेच्या कामाचा आढावा यावेळी मांडला.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 13 January 2025   Top 100  06AM SuperfastABP Majha Marathi News Headlines 630AM  Headlines 630 AM 13 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सWorking HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget