विषारी मातीचा गंभीर प्रश्न : जड धातूंमुळे 1.4 अब्ज लोकांना आरोग्याचा धोका, अहवालात धक्कादायक खुलासा
Toxic soil crisis : हे प्रदूषण अन्नसुरक्षा, परिसंस्थेचे आरोग्य आणि सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करते. कारण यामुळे पिकांचे उत्पादन घटते आणि विषारी धातू अन्नसाखळीत मिसळतात

Toxic soil crisis : जगभरात सुमारे 1.4 अब्ज लोक अशा भागांमध्ये राहतात, जिथे माती अत्यंत विषारी धातूंनी (जसे की आर्सेनिक, कॅडमियम, कोबाल्ट, क्रोमियम, कॉपर, निकेल आणि शिसं) प्रदूषित झालेली आहे, असे "Science" या मासिकात नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालात म्हटले आहे.
या अहवालाचे नेतृत्व डेयी हो (Deyi Hou) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले असून, त्यांनी 1,493 प्रादेशिक अभ्यासांतील जवळपास 8 लाख मातीच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. यामध्ये आधुनिक मशीन लर्निंगचा वापर करून जागतिक प्रदूषणाचे नकाशे तयार करण्यात आले. या अभ्यासानुसार, जगातील सुमारे 14 ते 17 टक्के शेतीयोग्य जमीन अंदाजे 242 दशलक्ष हेक्टर ही किमान एका विषारी धातूच्या पातळीत सुरक्षिततेच्या मर्यादेपेक्षा अधिक प्रदूषित असल्याचे दिसून आले आहे.
परिणाम आणि धोके
- या जमिनीतील प्रदूषणामुळे अन्नसुरक्षा, परिसंस्था आरोग्य आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात येते.
- पीक उत्पादनात घट येते आणि अन्न साखळीत विषारी धातूंचा समावेश होतो, ज्यामुळे किडनीचे विकार, कर्करोग, न्यूरोलॉजिकल समस्या आणि वाढीमध्ये अडथळे होण्याचा धोका वाढतो.
- एक अतिशय महत्त्वाचा शोध म्हणजे "मेटल-समृद्ध पट्टा" (metal-enriched corridor) जो खालच्या अक्षांशातील युरेशिया भागात आढळतो.
- हा उच्च-धोका असलेला भाग नैसर्गिक घटक (धातूंनी समृद्ध खडक, ज्वालामुखी क्रिया) आणि मानवी हस्तक्षेप (खनिज उत्खनन, औद्योगिकीकरण, सिंचन) यांचा एकत्र परिणाम आहे.
- हवामान आणि भूप्रदेश यांचाही धातूंच्या साठवणुकीवर प्रभाव आहे.
- कॅडमियम हा सर्वाधिक आढळणारा आणि धोकादायक प्रदूषक ठरला असून दक्षिण आणि पूर्व आशिया, मध्यपूर्व आणि आफ्रिकेतील भागांत तो मोठ्या प्रमाणात आढळतो.
तत्काळ उपायांची गरज
- जमिनीतील या विषारी धातू दशकानुदशके टिकून राहतात, त्यामुळे अन्न आणि पाण्याद्वारे दीर्घकाळ विषारी संपर्क होण्याची शक्यता असते.
- तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या धातूंना वाढती मागणी असल्यामुळे मातीतील प्रदूषण भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे.
- अभ्यासकांनी कडक पर्यावरणीय नियमावली, सुधारित मृदा परीक्षण, शाश्वत शेती पद्धती आणि जनजागृती मोहीमेची मागणी केली आहे.
दरम्यान, हा अहवाल दाखवतो की, मातीतील विषारी धातूंचे प्रदूषण हे एक मोठे, पण दुर्लक्षित जागतिक संकट बनले आहे. ज्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर तातडीने उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
नोकरी सोडून शेतीत ठेवलं पाऊल, वर्षाला कमवतोय 18 लाखांचा नफा, नोकरी सोडलेल्या इंजिनिअरची यशोगाथा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
























