Onino news : राहाता बाजार समितीत 'लूज कांदा' खरेदी, क्विंटलमागे शेतकऱ्यांचे 100 रुपये वाचणार
आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला राहाता बाजार समितीनं आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. राहाता बाजार समितीनं गोणी ऐवजी लूज कांदा खरेदी सुरु केली आहे.
Onino news : सध्या राज्यातील कांदा (Onino) उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण कांद्याला खूप कमी दर मिळत आहे. कांद्याला कमी दर मिळत असल्यामुळं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघणे कठीण झालं आहे. त्यामुळं आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला राहाता बाजार समितीनं आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. राहाता बाजार समितीनं गोणी ऐवजी लूज कांदा खरेदी सुरु केली आहे. त्यामुळं क्विंटलमागे शेतकऱ्यांचा 100 त 110 रुपये गोणीचा खर्च आता वाचणार आहे. भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
एकीकडं कांद्याच्या भावात सतत घसरण होत असताना बळीराजा संकटात सापडला आहे. पीक खर्च सुद्धा मिळत नसल्यानं आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी गोणी ऐवजी लूज कांदा खरेदी सुरु केली आहे. राहाता बाजार समितीने ही खरेदी सुरु केली आहे. कांद्याचे भाव सतत कमी होत असताना बळीराजाच्या आर्थिक संकटात भर पडली आहे. कांद्याला भाव नसताना सुद्धा कांदा विक्रीसाठी गोणीत भरुन आणावा लागत होता. त्यासाठी एक गोणीचा खर्च 40 रुपये प्रमाणे येत होता. मात्र, लूज कांदा खरेदीच्या निर्णयामुळं बळीराजाला मदत होणार आहे.
राहाता बाजार समितीनं लूज कांदा खरेदीचा निर्णय घेतल्याने बळीराजाला आधार मिळाला आहे. यामुळं क्विंटलमागे 100 ते 110 रुपये खर्च वाचणार आहेत. सरसकट कांदा विक्री होणार असल्यानं भावही चांगला मिळणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. एकिकडे भाव मिळत नसल्याने बळीराजाला मदत व्हावी व खर्च वाचवा यासाठी कांदा लूज खरेदी सुरु केली असल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राहाता बाजार समितीने सुरु केलेल्या उपक्रमामुळे बळीराजाला थोडा का होईना आधार मिळणार आहे. त्यामुळं राज्यातील इतर बाजार समित्यांनी असा उपक्रम सुरु केल्यास तो बळीराजाला मदत करणारा असेल असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
राज्यामध्ये कांदा साठवणूक करण्यासाठी स्टोरेजची सुविधा अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे भाव मिळत नसताना तो कांदा साठवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडे कोणताही पर्याय उपलब्ध नाही. याचाच फायदा अडते घेत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक केली जाते. यामुळे काही वेळा शेतकऱ्यांना 50 पैशांनीही कांदा विक्री करावी लागते. बहुतांशवेळी उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे.
महत्वाच्या बातम्या: