एक्स्प्लोर

Solapur News : सौर कृषीपंप योजनेबाबत मोठी अपडेट, महावितरणकडून शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची सूचना

Solar Pumps Scheme : शेतकऱ्यांच्या शेतातील सोलारबाबत एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. सोलार बसविण्यासाठी शेतकऱ्यांनी कोटेशन व्यतिरिक्त कुठलीही रक्कम कोणालाच देऊ नये, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

सोलापूर: शेतकऱ्यांच्या शेतातील सोलारबाबत एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. सोलार बसविण्यासाठी शेतकऱ्यांकडून खड्डे खोदून घेणे, वाहतुकीसाठी पैसे मागणे तसेच त्यांना सिमेंट, वाळू आणण्यास सांगणे आदी प्रकारच्या तक्रारी काही भागातून महावितरणकडे येत आहेत. त्या सर्व तक्रारींची महावितरण दखल घेण्यात आली असुन, शेतकऱ्यांनीही कोटेशन व्यतिरिक्त रक्कम कोणाला देऊ नये, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

कोटेशन व्यतिरिक्त रक्कम कोणाला देऊ नये,महावितरणचे आवाहन

शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी महावितरणतर्फे ‘मागेल त्याला सौर कृषीपंप योजना’ (Magel Tyala Saur Krushi Pump Yojana) सुरु आहे. तर यापूर्वी केंद्रसरकारच्या ‘कुसुम-बी’ योजनेतून (Solar Pumps and PM KUSUM Scheme) सौर पंप आस्थापीत केले आहेत. अनुसुचित जाती व जमातीमधील शेतकऱ्यांना 95 टक्के तर इतर वर्गवारीतील शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानातून सौर पंप मिळतात. त्यासाठी तीन अश्वशक्तीला (एचपी) अनुसुचित जाती व जमातीकरिता 11486 रुपये, इतरांकरिता 22,971  रुपये, पाच अश्वशक्तीसाठी अनुक्रमे 16, 038  रुपये व 32,075 रुपये आणि 7.5 अश्वशक्तीला 22, 465 रुपये व 44, 929  रुपये भरावे लागतात. भरलेल्या रकमेतून सोलारपंप आस्थापित करण्यापासून त्याचे कार्यान्वयन, देखभाल दुरुस्ती आदींचा समावेश केलेला आहे. त्यामुळे कोटेशनच्या रकमे व्यतिरिक्त कोणतेही आगाऊ शुल्क घेतले जात नाही.

इथे करा तक्रार, नियमानुसार होईल कठोर कारवाई 

शेतकऱ्यांनीही अशी आगाऊ रक्कम कोणाला देऊ नये अथवा साहित्य आणून देऊ नये. त्यासाठी कोणी पैशाची मागणी करत असेल तर नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. तिथे तक्रारीची दखल न घेतल्यास सोलापूर मंडल कार्यालयातील नोडल अधिकारी तथा उपकार्यकारी अभियंता कय्युम मुलाणी यांच्या ९०२९११४६८० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करावी. आलेल्या सर्व तक्रारींची महावितरणकडून चौकशी केली जाईल. तसेच सोलार कंपनीचा दोष आढळून आल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.

टाटा पॉवरने राज्यातील 230 पेक्षा हून अधिक सार्वजनिक संस्थांमध्ये सौरऊर्जा प्रणाली 

 महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये सौरऊर्जेचा वापर वाढवण्याच्या उपक्रमाला पाठिंबा म्हणून , टाटा पॉवरने राज्यातील 230 पेक्षा हून अधिक सार्वजनिक संस्थांमध्ये सौरऊर्जा प्रणाली यशस्वीरित्या बसविली आहे. ज्यामुळे सुमारे 107  मेगावॅट स्वच्छ ऊर्जा क्षमता  निर्माण झाली आहे. या सौर ऊर्जा स्थापनेमध्ये  प्रमुख जिल्ह्यांमधील 100 रुग्णालये (3.6 मेगावॅट), 64 शाळा (2 मेगावॅट) आणि 72  सरकारी आणि संस्थात्मक इमारती (100 मेगावॅट) समाविष्ट आहेत. या प्रकल्पांमुळे अंदाजे 1.3 लाख टन कार्बन डायऑक्साइड (CO₂) उत्सर्जनात घट झाली आहे, जी कि 20 लाख झाडे लावल्याच्या परिणामाशी समतुल्य आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pandharpur News: विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर; पुढील वर्षीच्या विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 26 डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी होणार सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर; पुढील वर्षीच्या विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 26 डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी होणार सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव जागावाटपाचा फॉर्म्युला, ठाकरे गट 140-150, मनसे 60-70, पण शरद पवार सोबत आल्यास गणित कसं बदलणार?
राज-उद्धव जागावाटपाचा फॉर्म्युला, ठाकरे गट 140-150, मनसे 60-70, पण शरद पवार सोबत आल्यास गणित कसं बदलणार?
Vijay Hazare Trophy Schedule : विजय हजारे ट्रॉफीचा रणसंग्राम आजपासून! पहिल्याच दिवशी 19 सामने, दिग्गजांच्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष, रोहित-विराटचा सामना किती वाजता?
विजय हजारे ट्रॉफीचा रणसंग्राम आजपासून! पहिल्याच दिवशी 19 सामने, दिग्गजांच्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष, रोहित-विराटचा सामना किती वाजता?
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur News: विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर; पुढील वर्षीच्या विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 26 डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी होणार सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर; पुढील वर्षीच्या विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 26 डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी होणार सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव जागावाटपाचा फॉर्म्युला, ठाकरे गट 140-150, मनसे 60-70, पण शरद पवार सोबत आल्यास गणित कसं बदलणार?
राज-उद्धव जागावाटपाचा फॉर्म्युला, ठाकरे गट 140-150, मनसे 60-70, पण शरद पवार सोबत आल्यास गणित कसं बदलणार?
Vijay Hazare Trophy Schedule : विजय हजारे ट्रॉफीचा रणसंग्राम आजपासून! पहिल्याच दिवशी 19 सामने, दिग्गजांच्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष, रोहित-विराटचा सामना किती वाजता?
विजय हजारे ट्रॉफीचा रणसंग्राम आजपासून! पहिल्याच दिवशी 19 सामने, दिग्गजांच्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष, रोहित-विराटचा सामना किती वाजता?
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
Embed widget