PM Kisan : पीएम किसानच्या 18 व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, 2000 रुपये मिळवण्यासाठी करावं लागणार महत्त्वाचं काम, अन्यथा...
PM Kisan Scheme : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये केंद्र सरकारकतर्फे दिले जातात.
नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांना एका आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आतापर्यंत 17 हप्त्यांमध्ये 34 हजार रुपये देण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याचे 2 हजार रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांना पीएम किसानचा पुढील हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये मिळण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांना दोन गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्या गोष्टी कोणत्या हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
पीएम किसान सन्मान योजनेच्या पुढील हप्त्यांद्वारे 2 हजार रुपयांची रक्कम नियमितपणे मिळवायची असल्यास शेतकऱ्यांना ई केवायसी आणि जमीन पडताळणी करावी लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल त्याच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो.
शेतकऱ्यांना काय करावं लागेल?
पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांना मिळतो त्यांना ई केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. यासह शेतकऱ्याच्या नावावर जमीन देखील असणं आवश्यक आहे. जे शेतकरी या दोन्ही प्रक्रिया पूर्ण करतील त्यांना पीएम किसान सन्मान योजनेच्या 18 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळतील.
पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन केवायसी करावी लागेल. यासाठी तु्म्हाला प्रथम पीएम किसानच्या pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट द्या. यानंतर फार्मर कॉर्नरवर ई केवायसी पर्याय निवडा. तिथं तुमच 12 अंकी आधार कार्ड नोंदवा. यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करा. तिथं तुमचा मोबाईल नंबर नोदवा.यानंतर तुम्हाला ओटीपी मिळेल. तो ओटीपी क्रमांक नोंदवल्यानंतर तुमची ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. यासंदर्भातील मेसेज मोबाईल वर प्राप्त होईल.
पीएम किसान सन्मान योजना 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरु करण्यात आली होती. आतापर्यंत केंद्र सरकारनं 17 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यात आलेले आहेत. आता शेतकरी अठराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं नमो शेतकरी महासन्मान योजना देखील सुरु आहे. पीएम किसान प्रमाणं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंत नमो शेतकरी महासन्मान योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात चार हप्त्यांचे 8 हजार रुपये पाठवले आहेत.
इतर बातम्या :
शेतकरी बांधवांनो वर्षाखेरीस शेतमालाचे भाव काय असणार? हमीभाव तरी मिळणार का? कृषी विभागाने सांगितलं...