Farming Success Story: उच्चशिक्षित तरुणानं फुलवली दीड एकरात तैवान पेरूची बाग, पहिल्याच वर्षी कमावले 24 लाख!
सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या उच्चशिक्षीत दांपत्यानं फळबाग लागवडीतून आर्थिक प्रगती साधली आहे.
Maharashtra success story: महाराष्ट्रात उच्चशिक्षित तरुण आता नोकरीच्या मागे न लागता शेती करता दिसून येत आहेत. पारंपरिक पिकांना फाटा मारत आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करत अनेक जण ड्रॅगन फ्रूट, पेरूसह अनेक फळपिकांतून चांगली कमाई करताना दिसत आहेत. करमाळा तालुक्यातील अशाच एका उच्चशिक्षीत जगदाळे दांपत्यानं शेतकऱ्यानं शिक्षण असूनही नोकरीच्या मागे न धावता शेतीची कास धरली आहे. अवघ्या दीड एकरावर तैवान पेरूची लागवड करत पहिल्याच वर्षी त्यांनी 24 लाखाहून अधिक रुपयांची कमाई केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या उच्चशिक्षीत दांपत्यानं फळबाग लागवडीतून आर्थिक प्रगती साधली आहे. उच्च शिक्षित तरुण तरुणींसाठी या दांपत्यानं कमीत कमी क्षेत्रात पेरूतून लाखोंची कमाई करण्याची किमया करून दाखवली आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत लाखोंचे उत्पन्न
फळबाग लागवडीतून आर्थिक प्रगती साधली आहे. पारंपरिक पिकांना फाटा देत तैवान पेरूचे अवघ्या दीड एकरात 1550 रोपं लावत वर्षाकाठी २४ लाखांहून अधिक उत्पन्न कमावलं आहे. दीड एकरातून ३६ टन उत्पादन मिळाले असून त्यांना पेरूच्या लागवडीपासून तर विक्रीपर्यंत संपूर्ण खर्च पाच लाख पन्नास हजार रुपये इतका आला. जगदाळे यांना दीड एकर क्षेत्रातून तब्बल 36 टन पेरूचे उत्पादन मिळाले व त्यातून 24 लाख 20 हजार रुपयांचा आर्थिक फायदा त्यांना झाला.
तैवान पेरूला ठिबक सिंचनातून पुरवलं पाणी
करमाळ्यातील वाशिंबे गावचं हे दाम्पत्य आहे. उच्चशिक्षित शेतकरी विजय जगदाळे आणि त्यांची पत्नी प्रियंका जगदाळे यांनी पारंपरिक शेतीऐवजी पेरू लागवड करण्याचा निर्णय घेतला. मार्च 2023 मध्ये 1550 तैवान पिंक पेरूच्या जातीच्या रोपांची लागवड दीड एकर क्षेत्रामध्ये केली. तैवान पेरूचं उत्पादन घेत त्यांनी पेरू उत्पादनात वाढ करण्याचाही प्रयत्न केला आहे. देशी गायीच्या शेणासह सेंद्रिय खतांचा वापर करत ठिबकच्या सहाय्याने पाणीपुरवठा करत पेरूतून उत्पन्न काढलं आहे.