onion News : येत्या 2 जुलैपासून बांगलादेशकडून कांद्याची आयात सुरु होणार, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची माहिती
बांगलादेशकडून कांद्याची आयात सुरु होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे प्रमुख भारत दिघोले यांनी दिली आहे.
![onion News : येत्या 2 जुलैपासून बांगलादेशकडून कांद्याची आयात सुरु होणार, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची माहिती Onion imports from Bangladesh will start from July 2 onion News : येत्या 2 जुलैपासून बांगलादेशकडून कांद्याची आयात सुरु होणार, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/03/3ba3105ab15e385892d985458428e27a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Onion News : येत्या 2 जुलैपासून बांगलादेशकडून कांद्याची आयात सुरु होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे प्रमुख भारत दिघोले यांनी दिली आहे. या कांदा निर्यातीमुळं बाजारभाव वाढण्यास मदत होणार आहे. कांदा निर्यातीबाबत इतर देशांच्या तुलनेत भारतीय कांदा चवदार आणि टिकावू असल्यानं भारतीय कांद्याला परदेशात मोठी मागणी असते. बांगलादेशनं भारतीय कांद्याची आयात थांबवली होती. त्यामुळं कांद्याच्या दरात घसरण झाली होती.
दरम्यान, बांगलादेशनं आता कांदा आयात करण्यास परवानगी दिली आहे. गेल्या 3 महिन्यांपासून बांगलादेशमध्ये भारतीय कांदा पाठवणे बंद होते. मात्र, 2 जुलै 2022 पासून बांगलादेशमध्ये भारतीय कांदा निर्यात सुरळीतपणे सुरु होणार आहे. निर्यात सुरु झाल्यानंतर कांद्याच्या दरात साधारण 15 दिवसांनी परिणाम दिसणार आहे. एकूणच निर्यात सुरु झाली तर बाजारपेठेत कांद्याला भाव मिळून त्याचा प्रत्यक्ष लाभ कांदा उत्पादकांना मिळू शकेल. केंद्र सरकारनं देखील कांदा निर्यातीला चालना द्यावी. जास्तीत जास्त कांदा निर्यात झाला पाहिजे यासाठी निर्यातीसाठी येणारे अडथळे, निर्यात शुल्क दूर करणे गरजेचे आहे. कांदा बाजारभावासाठी कांदा उत्पादक संघटनेचे भारत दिघोळे यांनीही वेळोवेळी सरकारचे लक्ष वेधले होते. साहजिकच त्याचा थेट परिणाम आता कांदा निर्यात होण्यावर होवू लागल्यानं भारतातून होणार्या कांद्याची निर्यात ही शेतकर्यांसाठी समाधानाची बाब म्हणावी लागेल.
भारतातून होणाऱ्या कांदा निर्यातीत बांगलादेशचा मोठा वाटा आहे. मात्र, मागच्या तीन महिन्यांपासून बांगलादेशने भारतीय कांद्याची आयात रोखली होती. त्यामुळं अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, पुन्हा कांद्याची निर्यात सुरु झाल्यास कांद्याच्या दरात वाढ होण्यास मतद होणार आहे. भारतीय कांदा निर्यातदारांसाठी बांगलादेश ही मोठा बाजारपेठ असल्यानं पुरवठा साखळी प्रभावित होत होती. मात्र, आता पुन्हा कांद्याचे दर सुधारण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातून दररोज बाजारात 80 ते 90 हजार क्विंटल कांद्याची विक्री होते. शिवाय बांग्लादेशात नाशिकमधून सर्वाधिक कांद्याची निर्यात केली जाते.
महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)