एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

महाराष्ट्रात दुधाचे दर का पडतात? जाणून घ्या तज्ज्ञांकडून 'दुधाचं अर्थकारण'

महाराष्ट्र राज्य दूध उत्पादनात अग्रेसर आहे. मोठ्या प्रमाणात दुधाचं संकलन राज्यात होतं. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून दूध व्यवसायाकडं बघितलं जातं. मात्र, सध्या दुधाच्या दरात घसरण होत आहे.

Maharashtra Milk Price issue : महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात दूध व्यवसाय (Milk business) हा शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक प्रमुख जोडधंडा आहे. तर हा व्यवसाय अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. आपलं राज्य देशात दूध उत्पादनात अग्रेसर आहे. मोठ्या प्रमाणात दुधाचं संकलन राज्यात होतं. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा (Rural Economy) कणा म्हणून दूध व्यवसायाकडं बघितलं जातं. पण सध्याच्या काळात राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याचं चित्र दिसत आहे. कारण एकीकडं दिवसें दिवस दूध उत्पादनाचा खर्च वाढ आहे तर दुसरीकडं दुधाचे दर ( Milk Price) कमी होतायेत. याचा मोठ्या प्रमाणात फटका राज्यातील दूध उत्पादकांना बसतोय. दरम्यान, महाराष्ट्रात दुधाचे दर नेमके का पडतायेत? याला जबाबदार कोण आहे? याचाच आढावा आपण या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत. 

महाराष्ट्र राज्य अलीकडच्या काळात दूध उत्पादनात देशात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत दूध संकलनापासून ते दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यापर्यंत महाराष्ट्रानं या व्यवसायाच्या माध्यमातून प्रगतीचा नवा आयाम उभा केला. राज्यातून अनेक देशात दुग्ध उत्पादनांची निर्यात होते. पश्चिम महाराष्ट्र हा दूध पट्टा म्हणून ओळखला जातो. अनेक सहकारी आणि खासगी दूध संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत दूध व्यवसायाला प्रचंड उभारी आली आहे. या व्यवसायाने ग्रामीण भागात समृद्धीचे नवीन वारे वाहत असताना महिलाही आत्मनिर्भर झाल्याचे दिसत आहे. यामुळं महाराष्ट्रात धवलक्रांती झाली आहे. 


महाराष्ट्रात दुधाचे दर का पडतात? जाणून घ्या तज्ज्ञांकडून 'दुधाचं अर्थकारण

राज्यात 1 कोटी 30 लाख लिटर दुध संकलित 

राज्यात संघटीत क्षेत्रात 1 कोटी 30 लाख लिटर दुध संकलित होते. पैकी 90 लाख लिटर दुध पाऊच पॅकद्वारे घरगुती गरज भागवण्यासाठी रोज खर्च होते. महाराष्ट्रात ही गरज भागवून साधारणपणे 40 लाख लिटर दुधाची पावडर आणि बटर बनते. घरगुती गरजेपेक्षा 40 लाख लिटर दुध महाराष्ट्रात अतिरिक्त (सरप्लस)  निर्माण होते. हेच सरप्लस  दुध, दुध भावाच्या चढउताराचे कारण बनते. आंतराष्ट्रीय बाजारात पावडर बटरचे दर पडले की पावडर उद्योग दुधाचे दर तातडीने कमी करतो. अशी तत्परता दर वाढल्यावर मात्र दाखविली जात नाही. 

 दूध उत्पादक शेतकरी अडचणीत 

सध्या राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे. कारण दुधाचे दर सातत्यानं कमी होत आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. नियमितपणे चार सहा महिन्याने दुधाचे खरेदीदर पडतात. परिणामी अर्थकारण कोलमडल्याने शेतकरी हवालदिल होत आंदोलने करतात. सरकार या पार्श्वभूमीवर काही किरकोळ डागडुजी करते. दरम्यान, राज्यात दुधाचे दर नेमके का पडतात? याला जबाबदार नेमकं कोण आहे? यासंदर्भातील किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले  (DR. Ajit Nawale) यांच्याशी एबीपी माझाने संपर्क साधला. यावेळी नवलेंनी सविस्तर माहिती दिली आहे. 


महाराष्ट्रात दुधाचे दर का पडतात? जाणून घ्या तज्ज्ञांकडून 'दुधाचं अर्थकारण

दुधाच्या दरात नेमकी का घसरण होते?

दुध क्षेत्रात किमान स्थिरता नसल्याने महाराष्ट्रात दुध क्षेत्राच्या प्रगतीला मोठी बाधा निर्माण झाल्याचे अजित नवले म्हणाले. दुधाचे खरेदी आणि विक्रीचे दर किमान एका पातळीवर स्थिर झाल्यास गुंतवणुकीसाठी किमान पोषक वातावरण निर्माण होते. तरल दुध विक्रीबाबत अशी किमान स्थिरता पाऊच पॅक दुधाबाबत निर्माण झाली आहे. मात्र दुध पावडरचे दर आंतराष्ट्रीय बाजाराशी जोडले गेले असल्याने आंतराष्ट्रीय बाजारामध्ये होणाऱ्या चढउतारानुसार दुधाचे खरेदीदर वाढतात किंवा पडतात. शिवाय ‘फ्लश’ सीजनमध्ये ऑक्टोबर ते मार्च या काळात दुधाचा पुरवठा वाढल्यामुळेही दुधाचे दर पडतात. मात्र मुख्यता आंतराष्ट्रीय बाजारात पडलेले दुध पावडरचे दर हेच कारण दुध खरेदीदर कमी करण्यासाठी वारंवार वापरले जात असल्याचे नवले म्हणाले.   

शेतकऱ्यांच्या मागण्या काय? 

दुधाला उत्पादन खर्चावर आधारित किमान किफायतशीर दर मिळावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे. तसेच दुधाला किमान 34 रुपयांचा दर मिळावा अशी मागणी देखील शेतकऱ्यांना केली आहे. राज्य सरकारने ही मागणी लक्षात घेऊन एक समिती स्थापन केली. या समितीनं दुधाला 34 रुपयांचा दर देण्याचा निर्णय घेतला. सरकारनं तसा आदेशही काढला. मात्र, दूध संघानी हा आदेश धुडकावक दुधाला केवळ 27 रुपयांचा दर देत आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचे अजित नवले म्हणाले. 


महाराष्ट्रात दुधाचे दर का पडतात? जाणून घ्या तज्ज्ञांकडून 'दुधाचं अर्थकारण

दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ 

राज्यात दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ होते हेच दुधाच्या महापुरामागे मुख्य कारण आहे. एकूण दुधापैकी 30 टक्के दुध भेसळयुक्त असल्याचे अजित नवलेंनी सांगितले. शेतकऱ्यांच्या अर्थकारणाबरोबरच ग्राहकांच्या आरोग्याशी हा खेळ केवळ नफा कमाविण्यासाठी खेळला जात आहे. त्यामुळं दुधातील भेसळ रोखण्यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलणं गरजेचं असल्याचे अजित नवले म्हणाले.

दुधाचे दर का पडले? राजू शेट्टी म्हणाले...

दुधाच्या दराच्या संदर्भात एबीपी माझाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधला. यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, सध्या बटर आणि दूध पावडरचे दर पडले आहेत. सगळचे दूध काही पॅकिंगमध्ये जात नाही. बऱ्याच दुधाचे बटर आणि दूध पावडर केली जाते. याचे दर पडल्यामुळं दुधाचे दर कमी करण्यात आल्याचे राजू शेट्टी म्हणाले. 


महाराष्ट्रात दुधाचे दर का पडतात? जाणून घ्या तज्ज्ञांकडून 'दुधाचं अर्थकारण

फेब्रुवारीपासून राज्यात दुधाची टंचाई निर्माण होणार, दुधाचे दर वाढणार

अशा स्थितीत सरकारनं जे दूध संघ दूध पावडर तयार करतात त्यांना चार ते पाच रुपयांचे अनुदान दिले पाहिजे. ते अनुदान शेतकऱ्यांना देण्याच्या अटीवर अनुदान दिलं पाहिजे. शेतकऱ्यांना किमान 30 ते 32 रुपयांचा दर मिळाला पाहिजे असे राजू शेट्टी म्हणाले. हे अनुदान फक्त दोन महिने द्यावे. कारण फेब्रुवारीपासून दुधाच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळं दुधाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दुधाच्या दरात घसरण होण्याला खासगी दूध संघ कारणीभूत असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. तसेच दुधाच्या दरात घसरण होण्याचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे, दुधात होणारी भेसळ. दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ होते. यामुळं चांगल्या दर्जाच्या दुधाला योग्य असा प्रकारचा दर मिळत नाही. त्यामुळं दुधाचे दर पडतात असे राजू शेट्टी म्हणाले. 

दुधाला चांगला दर मिळण्यासाठी काय करावं लागेल, डॉ. चेतन नरकेंनी सांगितलं गणित

दुधाच्या दराच्या संदर्भात एबीपी माझाने गोकूळ दूध संघाचे विद्यमान संचालक तसेच इंडिअन डेयरी असोसिएशन नवी दिल्लीचे संचालक डॉ. चेतन नरके (DR. Chetan Narke) यांच्याशी देखील संपर्क साधला. त्यांनीदेखील सविस्तर माहिती दिली. पावसाळा संपला की आपल्याकडे चारा मुबलक प्रमाणात असतो. साधारणपणे ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत या काळात शेतकऱ्यांकडे चाऱ्याची उपलब्धता असते. त्यामुळं जनावरांना चांगला चारा मिळतो. मार्चनंतर जसाजसा उन्हाळा वाढत जातो, तसतसे जनावरांना लागणारा चारा कमी प्रमाणात उपलब्ध होतो. तसेच उष्णता मोठी असते. त्यामुळं जनावरांच्या दुधात 30 ते 35 टक्के दुधाचे उत्पादन कमी होत असल्याची माहिती डॉ. चेतन नरके यांनी दिली. दरम्यान, एप्रिल महिन्यात दुधाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याचे नरके म्हणाले. सध्या चाऱ्याची उपलब्धता भरपूर आहे. दुधाचे उत्पादन हे देखील मागणीपेक्षा जास्त आहे. त्यामुळं सध्या दुधाच्या दरात घसरण होत असल्याची माहिती चेतन नरके यांनी दिली. आपली गरज भागून राहिलेल्या दुधाची पावडर केली जाते आणि ज्यावेळी मार्च एप्रिलमध्ये दुधाचे उत्पादन कमी होते, त्यावेळी ती पावडर वापरली जात असल्याचे नरके म्हणाले. राज्यात दररोज 600 टन दूध पावडर तयार होते. तर 300 टन बटर तयार केले जात असल्याचे नरके म्हटले. 


महाराष्ट्रात दुधाचे दर का पडतात? जाणून घ्या तज्ज्ञांकडून 'दुधाचं अर्थकारण

ग्राहकांमध्ये जागरुकता निर्माण करणं गरजेचं

दरम्यान, सध्या दुधाचं उत्पादन वाढत आहे. एकीकडं दुधाचं उत्पादन वाढत असताना दुसरीकडे मागणी मात्र, त्याप्रमाणात वाढत नसल्याचे डॉ. चेतन नरके म्हणाले. दुधापासून बनवलेले पदार्थ खाण्याकडे लोकांचा कल कमी होताना दिसत आहे. त्यामुळं दुधाचे दर पडण्याचे हेदेखील एक कारण आहे. त्यामुळं ग्राहकांमध्ये दुग्धजन्य पदार्थांबाबत जागरूकता वाढवणं गरजेचं असल्याचे चेतन नरके म्हणाले. दुसरी गोष्ट म्हणजे जे अधिकचं दूध आहे, त्यापासून उपपदार्थांची निर्मीती करणे आणि त्याला योग्य बाजारपेठ मिळणे याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असे चेतन नरके म्हणाले. दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन वाढलं. ते उत्पादन जर ग्राहकांना आवडलं तर त्याची मागणी वाढून दूध संघांना नफा जास्त मिळेल, त्यामुळं शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील असे डॉ. चेतन नरके म्हणाले. दुधापासून तयार केलेल्या पदार्थ खाल्यावर तुमचे आरोग्य कसे चांगले राहील याबाबतची जागरुकता ग्राहकांमध्ये होणं गरजेचं असल्याचे नरके म्हणाले.

एक गाव एक गोठा ही काळाची गरज 

पशुपालनाच्या संदर्भात योग्य शिक्षण महत्वाचं आहे. लोकांमध्ये जागरुकता असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जर एक किंवा दोन जनावरे असतील तर तुम्हाला दुधाचा धंदा परवडणार नसल्याची माहिती डॉ. चेतन नरके यांनी दिली. व्यावसायिक पद्धतीनं गोठ्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तुम्हाला गट पुशसंवर्धन करावं लागेल. एक गाव एक गोठा ही काळाची गरज असल्याची माहिती चेतन नरके यांनी दिली. गावाचा विकास करायचा असेल त्यातून नोकऱ्या तयार करायचा असेल तर हे गरजेचं असल्याचे नरके म्हणाले. व्यवसायिक पद्धतीनं दुधाचं व्यवस्थापन केलं तरच दुधाचा धंदा परवडेल असे नरके म्हणाले. म्हैशींचा गायींचा पूर्ण अभ्यास असेल तरच दुधाचा व्यवसाय करावा. सूक्ष्म माहिती असणं गरजेचं आहे. यासाठी शेतकरी प्रशिक्षीत होणं गरजेचं असल्याचे डॉ. चेतन नरके म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

भारतात सर्वाधिक दूध देणारी म्हैस कोणती? दररोज होणार एवढ्या रुपयांची दररोज उलाढाल

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Karad : अजित पवारांची यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतींना आदरांजलीABP Majha Headlines :  9 AM : 25 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSharad Pawar Pritisangam : प्रितीसंगम येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना शरद पवारांकडून अभिवादनTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 25 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Embed widget