Buldhana Rain : बुलडाणा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा शेती पिकांना फटका, शेतकरी चिंतेत, सोयाबीनचं नुकसान
बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यात काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली असून, सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. कारण या पावसामुळं सोयाबीन पिकाचं नुकसान झालं आहे.
Buldhana Rain : राज्याच्या विविध भागात परतीचा पाऊस (Rain) कोसळत आहे. या पावसामुळं राज्यातील शेतकरी (Farmers) मात्र, चिंतेत आहेत. कारण या परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसत आहे, सध्या पिकांच्या काढणीचा हंगाम सुरु आहे, अशातच पावसानं हजेरी लावण्यानं पिकांचे नुकसान होत आहे. बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यात काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली असून, सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. कारण शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेलं सोयाबीन या पावसामुळं पूर्णतः भिजलं असून, याचा मोठा शेतकऱ्यांना बसला आहे. तसेच वाशिम जिल्ह्यातही या पावसाचा शेती पिकांना फटका बसला आहे.
सोयाबीनसह कापसाला फटका
बुलढाणा जिल्ह्यात रात्रभर पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. शेगाव, संग्रामपूर, नांदुरा, मलकापूर, बुलडाणा आणि चिखली या तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. यापवासमुळं शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेलं सोयाबीन पूर्णतः भिजलं आहे. यामुळं शेतकऱ्यांचे मोठं नुकलसान झालं आहे. या पावसानं शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत असून, बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शेतातील पिकं काढणीच्या वेळेसच पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळं हाताशी आलेली पिकं वाया जात आहेत. सध्या सोयाबीन आणि कापसाची काढणी सुरु आहे. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी केली आहे. अशातच पावसानं हजेरी लावल्यानं शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नांदेड (Nanded) आणि परभणी (Parbhani) जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे.
आजही राज्यात पावसाचा यलो अलर्ट
राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं असून, पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. अशातच राज्यातील काही ठिकाणी परतीच्या पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबईसह परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसानं हजेरी लावली आहे. तसेच राज्यातील पुणे, नाशिक, सोलापूरसह मराठवाड्यातील काही भागात देखील पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, आजही हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पावसाची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया आणि नागपूर आणि वर्धा हे जिल्हे वगळता आज संपूर्ण राज्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: