एक्स्प्लोर

Hingoli Rain : हिंगोली जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी, सोयाबीनसह कापसाचं मोठं नुकसान

Hingoli Rain : परतीच्या पावसाचा हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे.

Hingoli Rain : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मात्र, काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यांमध्ये रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळी देखील मोठा पाऊस झाला. या परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. सोयाबीनसह कापसाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
   
सोयाबीनसह कापसाला मोठा फटका

अनेक ठिकाणी शेतामध्ये कापून टाकलेल्या सोयाबीनच्या सुड्या भिजल्या आहेत. तर ज्या ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे अशा ठिकाणी तर संपूर्ण कापसाची झाडे खाली पडली आहेत. अनेक ठिकाणी काढलेला कापूस सुद्धा भिजला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या हातात आलेला घास या पावसानं हिरावून घेतला आहे. सध्या राज्यात परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. अशा स्थितीत परतीचा पाऊस काही ठिकाणी जोरदार हजेरी लावत आहे. याचा शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे.

नांदेड आणि परभणी जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी

 नांदेड (Nanded) आणि परभणी (Parbhani) जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या परतीच्या पावसानं हजेरी लावल्यामुळं शेतकरी मात्र चिंतेत आहेत. कारण या पावसामुळं हाताशी आलेली पिकं वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, सध्या पिकांच्या काढणीचा हंगाम सुरु आहे, अशातच पावसानं हजेरी लावल्यानं शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस झाला आहे. तर सकाळपासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. दरम्यान, कालपासून सुरु असलेल्या या जोरदार पावसामुळं शेतकरी मात्र, चिंतेत आहेत. कारण या पावसामुळं हाताशी आलेली पिकं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोयाबीन, उडीद, मूग ही पिकं मातीमोल होण्याच्या मार्गावर आहेत. कालपासून सुरु असलेल्या या पावसामुळे शेतांना तळ्याचे रुप आलं आहे. शेतातील पिकात पाणीच पाणी झालं आहे. तर सुरुवातीला अवकाळीनंतर अतिवृष्टी त्यानंतर आता परतीच्या पावसाच्या तडाख्यामुळं शेतकऱ्यांच्या हातात यावर्षी पीक म्हणून काही तरी पडेल की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

परतीच्या पावसाने परभणीला झोडपलं

परतीच्या पावसाने परभणीला अक्षरश झोडपून काढले आहे. रात्रभर शहर आणि परिसरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला आहे. तर पहाटेपासून पुन्हा पावसाची रिपीरिप सुरू झाली आहे. सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम सुरु असताना झालेल्या या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी काढलेल्या आणि काढणी सुरू असलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Rain : नांदेडसह परभणीला जिल्ह्याला परतीच्या पावसानं झोडपलं, शेती पिकं मातीमोल होण्याची शक्यता, शेतकरी संकटात

महत्त्वाच्या बातम्या

साखरेच्या दरानं चिंता वाढवली! 10 वर्षानंतर प्रथमच भारत सरकार घेणार मोठा निर्णय, देशात सध्या किती साखर शिल्लक? 
साखरेच्या दरानं चिंता वाढवली! 10 वर्षानंतर प्रथमच भारत सरकार घेणार मोठा निर्णय, देशात सध्या किती साखर शिल्लक? 
शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग! विदर्भासाठी पुढील 15 दिवस महत्वाचे, नेमकी कशी असणार पावसाची स्थिती? हवामान विभागाचा अंदाज काय?
शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग! विदर्भासाठी पुढील 15 दिवस महत्वाचे, नेमकी कशी असणार पावसाची स्थिती? हवामान विभागाचा अंदाज काय?
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget