एक्स्प्लोर

ह्रदयद्रावक... हिंगोलीच्या शेतकऱ्यानं स्वत:ला शेतातच घेतलं जाळून, भावानं सांगितली कर्जबाजारीपणाची व्यथा

Hingoli Crime News : आज हिंगोली जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं स्वत:ला संपवलं आहे. हिंगोली जिल्ह्यातील साळवा गावातील शेतकरी दत्तराव माखणे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे.

Hingoli Crime News : राज्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरुच आहे. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटालून शेतकरी आत्महत्या करत आहेत. आज हिंगोली जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं स्वत:ला संपवलं आहे. हिंगोली जिल्ह्यातील साळवा गावातील शेतकरी दत्तराव माखणे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे.  शेतातील कापसाच्या पराठ्यावर स्वतःला पेटवून घेत  त्यांनी आत्महत्या केली आहे 

कापसाच्या पराठ्यांवर बसून स्वतःला पेटवून घेतलं

कळमनुरी तालुक्यातील साळावा येथील अल्पभूधारक  शेतकरी दत्तराव माखणे यांच्याकडे राष्ट्रीयकृत बँक आणि खाजगी सावकाराचे कर्ज होते या कर्जाला दत्तराव माखणे त्रासले होते. दिवसें दिवस कर्ज वाढत होते. परंतू, शेतातून उत्पन्न मात्र एकही रुपया होत नव्हता. या विवंचनेतून दत्तराव माखणे सतत कुटुंबियांना या कर्जाबाबत चर्चा करायचे. याच कर्जाच्या  विवंचनेतून काल सायंकाळच्या सुमारास त्यांनी  स्वतःच्या शेतात जात कापसाच्या पराठ्यांवर बसून स्वतःला पेटवून घेतलं आहे. या घटनेमध्ये शेतकरी दत्तात्रय माखणे पूर्णपणे जळाले गेले होते या घटनेची नोंद कळमनुरी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

आई-वडील रागविल्याने एकुलत्या एका मुलानं संपवलं जीवन

आई-वडील रागविल्याने एकुलत्या एक मुलाने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. विराज हरिदास भगत असे 21 वर्षीय आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. घटना आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण या गावात घडली आहे. घरातील कामाकडे दुर्लक्ष करत असल्याच्या कारणावरून विराजचे आई-वडील त्याच्यावर रागावले होते. याच रागातून विराजने शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतात गेलेल्या बहिणीला ही बाब निदर्शनास आल्यानंतर सदरील घटना समोर आली. घटनेची माहिती मिळताच आई-वडील त्या ठिकाणी दाखल झाले. गळफास घेतलेली दोरी कापून विराजला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. शुल्लक कारणावरून विराजने आपले जीवन संपविल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक माहिती घेतली जात आहे.

प्रियकराने चरित्र्यावर संशय घेतल्यानं तरुणीनं गळफास लावून संपवलं जीवन

मुंबईत एका तरुणीने आपल्या प्रियकराने चरित्र्यावर घेतलेल्या संशयावरून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. स्तुती सोनावणे असे या मुलीचे नाव असून ती डाॅक्टरकीचे शिक्षण घेत होती. या प्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी डॉ. स्तुती बजरंग सोनावणे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फजल मोहम्मद खान (31) याला अटक केली. न्यायालयाने फजल मोहम्मद खान याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
Embed widget