एक्स्प्लोर

अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर

अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन होऊन दीड महिना होत आला असला तरी, हा अपघात कशामुळे घडला आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची होती हे अद्याप कोणत्याही यंत्रणेने पुढे येऊन सांगितलेले नाही.

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या अपघाती निधनाची सखोल चौकशी व्हावी, सीबीआयसारख्या संस्थेमार्फत तपास व्हावा, अशी मागणी केली जात आहे. तसेच, विधिमंडळ आणि संसदेतही यासंदर्भात आमदार-खासदारांनी आवाज उठवावा अशी मागणी आमदार रोहित पवार यांच्याकडून केली जात आहे. त्यासंदर्भाने, ते दिल्लीत जाऊन बड्या नेत्यांच्या, खासदारांच्या भेटीही घेत आहेत. त्यातच, आमदार अमित देशमुख (Amit deshmukh) यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करत सरकारला सवाल केला आहे. तर, रोहित पवार यांनी अमित देशमुख यांचे आभार मानत सरकार ठोस भूमिका मांडेल, अशी अपेक्षा उपस्थित केली. 

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन होऊन दीड महिना होत आला असला तरी, हा अपघात कशामुळे घडला आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची होती हे अद्याप कोणत्याही यंत्रणेने पुढे येऊन सांगितलेले नाही. त्यामुळे, उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर या राज्यात कोणीच सुरक्षित नाही, अशी भावना आता राज्यातील सामान्य जनतेची झाली असल्याचे काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे. अमित देशमुख यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होऊन बोलताना अजित पवारांच्या अपघातासंदर्भाने प्रश्न उपस्थित केला. 

अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत राज्याचा गृह विभाग किंवा राज्य शिष्टाचार विभाग यांच्या सचिवाकडूनही अद्याप अधिकृतरित्या काहीही सांगितले गेलेले नाही. राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यांच्या सुरक्षितेच्या संदर्भात नक्कीच नियमावली आहे. मात्र, राज्यातील सुरक्षा यंत्रणा असोत किंवा ज्या विभागामार्फत  बारामती विमानतळाचे संचालन होते त्या  #MIDC आणि #MADC हे कोणतेच विभाग या संदर्भाने पुढे येऊन काहीच भाष्य करत नाहीत ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे अमित देशमुख यांनी म्हटले. महाराष्ट्र शासनाने या संदर्भात सविस्तर निवेदन करावे, अशी मागणीही त्यांनी विधानसभेत केली. त्यामुळे, अजित पवारांच्या अपघाती निधनाबद्दल आता विधानसभेतही प्रश्न उपस्थित झाल्यां दिसून आलं.  

आमदार शशिकांत शिंदेंचाही सवाल

अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाची चर्चाच सभागृहात होऊ देत नाहीत. मी स्थगन प्रस्ताव आणला होता मात्र त्याला परवानगी दिली नाही. अल्पकालीन चर्चेला परवानगी दिली. मागील 5 दिवस झालं, याबाबतची चर्चा स्वीकारली मात्र अद्याप सभागृहात चर्चा होऊ दिली नाही. विधानसभा, विधानपरिषदेप्रमाणे लोकसभेत देखील बोलू देत नाहीत. त्यांच काय झालं हे आम्हाला कळायला हवं? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे. 

रोहित पवारांकडून अमित देशमुखांचे आभार

अमित देशमुख यांनी अजित दादांच्या अपघाताचा मुद्दा सभागृहात उपस्थित करून सरकारने स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. त्यांनी तांत्रिक बाबी उपस्थित करत सरकारला जाब विचारला आहे. या अधिवेशनातच याविषयी चर्चा घेऊन सरकार ठोस भूमिका मांडेल ही अपेक्षा आहे, असे रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. 

हेही वाचा

माढ्यातील युवकाने विधानभवनबाहेर अंगावत ओतलं केरोसीन; पोलिसांनी घेतलं ताब्यात, धाराशिवमध्येही तीच घटना

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget