Kharif Marketing Season : 2022-23 मध्ये केंद्रीय साठ्यासाठी 5 कोटी 18 लाख मेट्रिक टन तांदळाच्या (धान) खरेदीचा अंदाज
2022-23 मधील खरीप पिकांपैकी केंद्रीय साठ्यासाठी 518 लाख मेट्रिक टन तांदूळ (धान) खरेदीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या खरीप विपणन हंगामात 509.82 लाख मेट्रिक टन तांदळाची खरेदी करण्यात आली होती.
![Kharif Marketing Season : 2022-23 मध्ये केंद्रीय साठ्यासाठी 5 कोटी 18 लाख मेट्रिक टन तांदळाच्या (धान) खरेदीचा अंदाज Kharif Marketing Season Estimated procurement of 518 lakh metric tonnes of rice (paddy) for central stock in 2022-23 Kharif Marketing Season : 2022-23 मध्ये केंद्रीय साठ्यासाठी 5 कोटी 18 लाख मेट्रिक टन तांदळाच्या (धान) खरेदीचा अंदाज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/25/3b047b1257f9fff3d104eccd088009e61658766949_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kharif Marketing Season : खरीप विपणन हंगाम (Kharif Marketing Season) 2022-23 मधील खरीप पिकांपैकी केंद्रीय साठ्यासाठी 518 लाख मेट्रिक टन तांदूळ (धान) खरेदीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या खरीप विपणन हंगाम (2021-22) प्रत्यक्षात 509.82 लाख मेट्रिक टन तांदळाची (Rice) खरेदी करण्यात आली होती. यंदा त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. 2022-23 च्या खरीप पिकांच्या खरेदी व्यवस्थेसंदर्भात चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीत ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालया अंतर्गत राज्यांचे अन्न सचिव आणि भारतीय अन्न महामंडळासोबत (एफसीआय) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये यावर्षीच्या तांदूळ खरेदीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या बैठकीला अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडे उपस्थित होते.
गेल्या खरीप विपणन हंगामात (2021-22) प्रत्यक्षात 509.82 लाख मेट्रिक टन तांदळाची खरेदी करण्यात आली होती. या तुलनेत आगामी खरीप विपणन हंगामात ( 2022-23) 518 लाख मेट्रिक टन धान खरेदीचा अंदाज आहे. दरम्यान, या बैठकीला आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, राजस्थान, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओदीशा, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे प्रधान सचिव तसेच त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हवामानातील बदलाचा गहू आणि धान या पिकांवर विपरीत परिणाम
या बैठकीत, यांत्रिक खरेदी कार्यान्वयन, कमी व्याज दराने कर्ज घेणे, खरेदी कार्यान्वयनाच्या खर्चात कपात, नाविन्यपूर्ण तंत्र आणि गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेचा अवलंब, भरड धान्यांचा प्रसार, गोणी पिशव्यांची आवश्यकता, अन्न अनुदानाच्या दाव्यांचा ऑनलाईन निपटारा इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अशा नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केवळ आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष -2023 मुळेच नव्हे तर हवामानातील बदलामुळे देखील भरड धान्यांच्या खरेदीवर भर द्यायला हवा असे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले. दरम्यान, हवामानातील बदलाचा गहू आणि धान या पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. उत्पादनात घट झाली आहे. आतापर्यंत 6.30 लाख मेट्रिक टन प्रत्यक्ष खरेदीच्या तुलनेत आगामी खरीप विपणन हंगाम 2022-23 दरम्यान 'सुपर फूड' म्हणजेच भरड धान्यासाठी 13.70 लाख मेट्रिक टन खरेदीसाठी राज्यांकडून प्रस्तावित करण्यात आले आहे. या बैठकीत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या सचिवांनी पॅकेजिंग साहित्याच्या कमतरतेच्या समस्येवर प्रकाश टाकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)