(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hingoli : शेतकरी महिलेने तीन एकरात फुलवली द्राक्षाची बाग, मिळवतायेत 10 लाखाहून अधिक उत्पन्न
महिला शेतकरी मीना पाठक यांनी स्वतः शेतात द्राक्षाची बाग फुलवली
Hingoli : हिंगोली (Hingoli) जिल्हा तसा शेतीच्या बाबतीत जास्त प्रगत नसलेला जिल्हा आहे. सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य पिके आणि सर्वसामान्य शेती असच काय या जिल्ह्याच्या शेतीचे गणित आहे. परंतु औंढा नागनाथ येथील महिला शेतकरी मीना पाठक यांनी स्वतः शेतात द्राक्षाची (Grapes) बाग फुलवली आणि थोडाथोडका नव्हे तर दरवर्षी मीना पाठक या बागेतून दहा लाख रुपयांचे उत्पादन काढत आहेत.
तीन वर्षांपूर्वी ही बाग लावण्याचे स्वप्न मिना पाठक यांनी पाहिलं कारण त्यांचं माहेर नाशिक कडील असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात द्राक्षाची शेती कशी केली जाते हे त्यांना बऱ्यापैकी माहीत होतं. पश्चिम महाराष्ट्रात घेतली जाणारी पिके हिंगोली जिल्ह्यात का केली जाऊ शकत नाही असा विचार मनाशी धरून तीन वर्षांपूर्वी औंढा नागनाथ शहरालगत असलेल्या त्यांच्या तीन एकर शेत जमिनीवर त्यांनी द्राक्षाच्या बागेची लागवड केली. सुरुवातीला अनेक शेतकरी या प्रयत्नाकडे बघून हसत होते कारण द्राक्षाचे उत्पादन आपल्या जिल्ह्यात शक्य नाही आणि या द्राक्ष उत्पादन घेण्यासाठी मिना पाठक अहोरात्र मेहनत करत होत्या. घरातील दोन मुलं पतीसह स्वतः दिवस-रात्र राहून तीन वर्षांपूर्वी लावलेले ही द्राक्षाची बाग आणि बागेत दिसत असलेले हे उत्पन्न निश्चितच त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणायला हरकत नाही विशेष म्हणजे या बागेतील फवारणी त्याचबरोबर सर्व नियोजन मीना पाठक स्वतः करतात सकाळी लवकरच ट्रॅक्टर घेऊन मीना पाठक बागेतील प्रत्येक झाडाची फवारणी करून गुणवत्ता कशा पद्धतीने वाढवता येईल त्यासाठी प्रयत्न करतात.
एवढ्या प्रयत्नातून दहा लाख रुपयांहून अधिक उत्पादन या द्राक्षाच्या च्या बागेतून घेतले जातात गेल्या दोन वर्षापासून या बागेतून उत्पादन मिळायला सुरुवात झाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Valentine day 2022 : कोरोनामुळे गुलाब उत्पादक शेतकरी मालामाल! आले 'अच्छे दिन'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha