Hingoli News : पपई पिक संकटात, रोगांचा प्रादुर्भाव; औषधांचाही उपयोग होईना, बळीराजा चिंतेत
Hingoli News : पपईवर पडलेल्या बुरशीजन्य आणि इतर रोगांमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. तसेच झाडांची पानं पिवळी होऊन जमिनीवर गळून पडत आहेत.
![Hingoli News : पपई पिक संकटात, रोगांचा प्रादुर्भाव; औषधांचाही उपयोग होईना, बळीराजा चिंतेत Hingoli Agriculture News Papaya crop crisis disease outbreak Even the medicines were not used farmers was worried Hingoli News : पपई पिक संकटात, रोगांचा प्रादुर्भाव; औषधांचाही उपयोग होईना, बळीराजा चिंतेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/07/cb08fd8a8372d82469d5f4533a0f08d0_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hingoli News : यावर्षी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि वातावरणाच्या बदलामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. पपई पिकांवर बुरशीजन्य तसेच इतर रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचं दिसून येत आहे. परिणामी झाडांची पानं पिवळी होऊन जमिनीवर पडत आहेत. याचा थेट परिणाम हा फळांच्या वाढीवर होत असल्यानं पिकांसाठी केलेला लाख रुपयांचा खर्च या रोगांच्या प्रादुर्भावामुळे वाया जातो की, काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी करून सुद्धा पाहिली. परंतु त्याचा उपयोग होत नसल्यानं पपई उत्पादक शेतकरी संकटात आले आहेत.
राज्यातील बदलत्या हवामानामुळे फळबागा आणि रब्बी पिकांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. पपईवर पडलेल्या बुरशीजन्य आणि इतर रोगांमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. तसेच झाडांची पानं पिवळी होऊन जमिनीवर गळून पडत आहेत. याचा थेट परिणाम हा फळांच्या वाढीवर होतोय. त्यामुळे हिंगोलीतील शेतकरी चिंतेत आहे.
नंदुरबारमधील पपई उत्पादक शेतकरी अडचणीत
राज्यातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार (Nandurbar district) जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात सात हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पपई पिकाची लागवड करण्यात आली आहे. परंतु, उत्तर भारतात पपईला मागणी नसल्याचे कारण देत व्यापारी पपई खरेदी करण्यास तयार नाहीत. तर दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळे पपईची फळे झाडावरच पिकत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
जिल्ह्यात पपईच्या बागा बहरल्या आहेत. फळे खराब होऊ नये म्हणून कटिंग बॅग लावण्यात आल्या आहेत. सर्व काळजी घेऊन पपई आता तोडणीसाठी तयार झाली आहे. परंतु, पपई खरेदीसाठी व्यापारी येत नाहीत. शेतकरी तीन रुपये प्रति किलो दराने पपई द्यायला तयार असले तरी खरेदीसाठी कोणी नसल्याने पपईची फळे झाडावरच पिकत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- मातीमोल दर आणि व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार; नंदुरबारमधील पपई उत्पादक शेतकरी अडचणीत
- डाळिंब बागा वाचविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली कृषीमंत्र्यांची भेट
- चार दिवस आंदोलन करुनही दखल घेतली नाही, वीज वितरण कंपनीच्या विरोधातील आंदोलन स्थगित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)