(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प्राथमिक कृषी पत संस्थांच्या डिजिटायझेशनसाठी 2,516 कोटी रुपयांची तरतूद, 13 कोटी शेतकऱ्यांना फायदा
Primary Agriculture Credit Societies: देशातील एकूण 63,000 प्राथमिक कृषी पत संस्थांना या निर्णयाचा फायदा होणार असून त्यामुळे कारभार पारदर्शी होण्यास मदत होईल.
नवी दिल्ली: प्राथमिक कृषी पत संस्था (Primary Agriculture Credit Societies- PACS) आता डिजिटल आणि अत्याधुनिक होणार आहेत. केंद्र सरकारने प्राथमिक कृषी पत संस्थांच्या संगणकीकरणासाठी 2,516 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील 63 हजार प्राथमिक कृषी पत संस्थांचे डिजिटायझेशन होणार असून त्याचा 13 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याची माहिती आहे.
Cabinet approves computerization of Primary Agriculture Credit Societies(PACS); 63,000 functional PACS to be computerized with overall budget outlay of Rs 2516 crore
— DD News (@DDNewslive) June 29, 2022
Move to benefit 13 crore farmers #cabinetdecisions pic.twitter.com/ORwqyIHKL7
ग्रामीण भागाच्या विकासामध्ये प्राथमिक कृषी पत संस्थांचं महत्त्व मोठं आहे. त्या माध्यमातूनच अनेक शेतकऱ्यांना आर्थिक देवाण-घेवाण करता येते. त्यामुळे ग्रामीण भागाचा गाडाही चालत राहतो. आता याच प्राथमिक कृषी पत संस्थांचे डिजिटायझेशन करण्यात येणार असून त्यासाठी केंद्र सरकारने 2,516 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज दिली. केंद्राच्या या निर्णयाचा फायदा देशातील 13 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे असंही ते म्हणाले. तसेच केंद्राच्या या निर्णयामुळे प्राथमिक कृषी पत संस्थांच्या कारभारामध्ये पारदर्शकता येईल असं अनुराग ठाकूर म्हणाले.
#Cabinet approves Computerization of Primary Agriculture Credit Societies (PACS)
— PIB India (@PIB_India) June 29, 2022
💠63,000 functional PACS will be computerized with an overall budget outlay of Rs 2516 crore
Read here: https://t.co/IUwsdFvD1k #CabinetDecisions #DigitalPACS pic.twitter.com/i7izS9RPAd
महत्त्वाच्या बातम्या :
- Assam Flood: आसाममध्ये पुरामुळं शेतीचं मोठं नुकसान, 74 हजार 655 हेक्टरवरील पीक क्षेत्र अद्यापही पाण्याखाली
- Wheat News : भारताकडून इजिप्त करणार 1 लाख 80 हजार टन गव्हाची आयात
- kharif sowing : राज्यात आत्तापर्यंत केवळ 13 टक्के क्षेत्रावरच पेरणी, आत्तापर्यंत फक्त 134 मिलिमीटर पाऊस