kharif sowing : राज्यात आत्तापर्यंत केवळ 13 टक्के क्षेत्रावरच पेरणी, आत्तापर्यंत फक्त 134 मिलिमीटर पाऊस
राज्यात अद्याप 87 टक्के क्षेत्रावर पेरणी बाकी आहे. राज्यात केवळ 13 टक्के क्षेत्रावरच खरीपाची पेरणी झाली आहे.
kharif sowing : राज्यातील शेतकरी सध्या पावसाची वाट बघत आहे. पावसान दडी मारल्यामुळं शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला नाही. काही ठिकाणी पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. मात्र, राज्यात अद्याप 87 टक्के क्षेत्रावर पेरणी बाकी आहे. राज्यात केवळ 13 टक्के क्षेत्रावरच खरीपाची पेरणी झाली आहे. पेरणीची स्थिती सध्या असमाधानकारक आहे. मागील वर्षी या काळात राज्यातील पेरणी 100 टक्के पूर्ण झाली होती. त्यामुळं यावेळी शेतकरी चिंतेत असल्याचं चित्र दिसत आहे.
मंत्रीमंडळाच्या बैठकीत खरीपाच्या पेरणीच्या संदर्भातील स्थितीचा आढावा घेण्यात आला. राज्यात आत्तापर्यंत केवळ 134 मिलिमीटर पाऊस झाला आहे. मागील वर्षी याचवेळेत 270 मिलिमीटर पाऊस पडला होता. गेल्या वर्षी राज्यातील खरिपाच्या पेरण्या याच तारखेला पूर्ण झाल्या होत्या. राज्यात आत्तापर्यंत केवळ 13 टक्केच म्हणजे 20.30 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अद्याप 87 टक्के क्षेत्रावर पेरणी बाकी आहे. पेरणी करण्यासाठी शेतकरी पावसाची वाट बघत आहेत.
महाराष्ट्र हे कापूस आणि सोयाबीनचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे उत्पादक राज्य आहे. पावसाच्या स्थितीवर कापूस आणि सोयाबीनच्या उत्पादन अवलंबून असते. त्यामुळं शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान, आज राज्य मंत्री मंडळाची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत शहरांच्या पाणी पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा देखील घेतला जाणार आहे. मुंबईने आधीच पाणीकपात सुरु केली आहे. राज्यात 27 जूनअखेर 610 गावे आणि 1 हजार 266 वाड्यांना 496 टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये शासकीय टँकर्सची संख्या 66 तर खासगी टँकर्सची संख्या 430 इतकी आहे.
दरम्यान, जमिनीत चांगली ओल झाल्यावर म्हणजे 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. प्रती हेक्टरी बियाणे प्रमाण 75 किलो ग्रॅमवरून 50 ते 55 किलोग्रॅमवर आणण्यासाठी टोकण पद्धतीने किंवा प्लँटरचा वापर करुन पेरणी करावी. सोयाबीनची उगवण क्षमता 70 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास उगवण क्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे असे आवाहन कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या: