एक्स्प्लोर

Geranium farming : कशी कराल जिरेनियमची शेती, जिरेनियम लागवडीचे तंत्र नेमकं काय?

अलीकडच्या काळात काही ठिकाणी जिरेनियमच्या शेतीचा प्रयोग केला जातोय. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील या प्रयोग यशस्वी केलाय. पण ही लागवड नेमकी करायची कशी, त्याचे तंत्र काय याची माहिती घेऊयात.

Geranium farming : अहमदनगर जिल्ह्यातील माजी सैनिक असलेल्या दोन शेतकऱ्यांनी जिरेनियमची शेती यशस्वी केली आहे. पारंपरिक पिकांना बगल देत मेहेकरी  येथील शेतकऱ्यांनी जिरेनियम शेती केल आहे. या पिकामुळे त्यांना वर्षाकाठी लाखोंचा नफा मिळत आहे. मात्र, जिरेनियम लागवडीचे तंत्र नेमके काय आहे. जिरेनियम लागवड कशी केली जाते? त्यासाठी जमिन कशी लागते? जिरेनियम शेतीसाठी वातावरण कसे लागते, यासंदर्भातील माहिती आपण घेऊयात...

जिरेनियम ही एक सुगंधी व औषधी वनस्पती आहे. जिरेनियमची लागवड मध्यम प्रतीच्या जमिनीवर आणि  माळरानावरही करता येते. सर्वसाधारण 20 अंश सेल्सिअस ते 34 अंश सेल्सिअस तापमानात हे पीक चांगले येते. 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी किंवा  34 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात पिकांची वाढ खुंटते. त्यामुळे पाहिजे तसे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही. या पिकासाठी आद्रता 75 टक्के ते 80 टक्के लागते.

Geranium farming : कशी कराल जिरेनियमची शेती, जिरेनियम लागवडीचे तंत्र नेमकं काय?

एका वर्षत तीन वेळा कापणी

तीन वर्ष हे पीक शेतात राहणार असल्याने शेतीची योग्य प्रकारे नांगरणी व मशागत करून घेणे खूप गरजेचे असते. मशागत केल्यानंतर बेड व्यवस्थित तयार करून घ्यावी. त्यावर ठिबक टाकावे आणि चार बाय दीड फुटावर त्याची लागवड करावी. एका एकरमध्ये  10 हजार रोपे लागतात. लागवडीनंतर पहिल्यांदा हे पीक चार महिन्यानंतर कापणीला येते व त्यानंतर प्रत्येक तीन महिन्याला कापणीला येते. हे पीक एका वर्षात तीनवेळा कापणीला येते.

Geranium farming : कशी कराल जिरेनियमची शेती, जिरेनियम लागवडीचे तंत्र नेमकं काय?

सुरूवातीला एकरी 70 ते 80 हजार खर्च येतो. इतर पिकाच्या तुलनेत फवारणी व खते यामध्ये  75 टक्के खर्च कमी  लागतो. एका एकरात तीस ते चाळीस किलो ऑईल वर्षाला मिळू शकते. एक लिटर ऑईलला किंमत जाग्यावर 12 हजार ते  12 हजार 500 हजार रुपये मिळू शकतात. एक एकरमध्ये एका वर्षात चार ते पाच लाखांचे उत्पन्न मिळू शकते.  

जिरेनियमला भारतात मोठी मागणी

जिरेनियम तेलाला भारतात मोठी मागणी आहे. दर वर्षाला 200 ते  300 टनाची मागणी आहे. पण सध्यस्थिती पाहता भारतात वर्षाला 10 ते 20 टन पण ऑईल निर्मिती होत नाही. त्यामुळे या अशा सुगंधी औषधी वनस्पतीची लागवड करणे अधिक फायदेशीर ठरते. अशा या औषधी वनस्पतीची भारतात लाखो एकर शेती केली तरी कमीच आहे.

Geranium farming : कशी कराल जिरेनियमची शेती, जिरेनियम लागवडीचे तंत्र नेमकं काय?

पारंपरिक पिकापेक्षा दुप्पट उत्पन्न

पारंपरिक पिकापेक्षा जिरेनियम हे पीक दुप्पट नफा देणारे आहे. या वनस्पतीवर फारसे किड रोग येत नाहीत. त्यामुळे खर्च कमी येतो आणि उत्पन्न जास्त आहे. कोणतेही जनावरं जिरेनियमचा पाला खात नाही. निरोगी आणि 100 टक्के उत्पन्न देणारे पीक आहे. तसेच जिरेनियम वनस्पतीच्या तेलाला शाश्वत बाजापेठ उपलब्ध आहे. बाजारामध्ये या पिकाला हमीभाव देखील मिळतो .

अशी घ्यावी काळजी

जिरेनियमच्या फांद्याची तोडणी करून त्यापासून तेल बनवले जाते. ज्या भागात जास्त पाऊस पडतो तेथे फक्त या पिकाची पावसाळ्यात जास्त काळजी घावी लागते. कारण जास्त पावसामुळे पिकाच्या खालच्या भागातील फांद्या खराब होऊ शकतात. उर्वरित ऋतूमध्ये या पिकावर काहीही परिणाम पडत नाही.

Geranium farming : कशी कराल जिरेनियमची शेती, जिरेनियम लागवडीचे तंत्र नेमकं काय?

जिरेनियमपासून सुगंधी पदार्थांची निर्मिती

जिरेनियमच्या तेलापासून अनेक सुगंधी पदार्थ बनवले जातात. औषधे, कॉस्मेटिक्स साबण आणि डिटर्जंट शाम्पू , सेंट , अगरबत्ती पावडर या वस्तू तयार केल्या जातात. या वस्तुंना बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कापणीनंतर उरलेल्या पालापाचोळ्यापासून खत निर्मिती करता येते.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Embed widget