Farming success story: इंजिनिअर म्हणून 30 वर्षे केलं काम, आता घरातल्या छोट्या खोलीत केशरशेती करून महिन्याला कमवतात 3.5 लाखांचा नफा
एखाद्याला फक्त वीज बिल भरावे लागते, ज्याचा खर्च महिन्याला सुमारे 4,500 रुपये असतो आणि मजुरीचा खर्च, वर्षाला 8,000 रुपये असतो.
Farming Success: केशर म्हटलं की आपल्यासमोर काश्मीर किंवा उत्तरेतला कुठलातरी भाग येतो. पण आता तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं देशात अनेक शेतकरी एखाद्या खोलीत केशराचं उत्पादन घेऊन चांगली कमाई करतायत. इंजिनिअर म्हणून 30 वर्ष काम केल्यानंतर नॉयडाच्या रमेश गेरा यांनी घरातील 100 स्वेअरफटाच्या एका खोलीत केशराची शेती सुरु केली. आता महिन्याकाठी 3.5 लाखांचा नफा कमवत त्यांनी केशर शेतीचा वर्क फ्रॉम होम पॅटर्न करत हटके प्रयोग करून दाखवलाय. भारतात 70 टक्के केशर हा इराणमधून आयात करतात. उरलेला 30 टक्के काश्मीरमध्ये पिकतो. केशरातून चांगली कमाई करता येऊ शकते याची रमेश गेरांना खात्री वाटली. मग नोएडामधील आपल्या घरातच एका खोलीत सुरु झाली केशराची शेती!
इंजिनिअरनं केली वर्क फ्रॉम होम केशर शेती
नोएडामध्ये राहणारे रमेश गेरा हे पेशानं इंजिनिअर आहेत. 1980 ला MNC कंपन्यांमध्ये 30 वर्षे काम केल्यानंतर त्यांना परदेशी जाण्याची संधी मिळाली. साऊथ कोरियात त्यांनी हायड्रोपोनिक शेती, मायक्रोग्रिन आणि इनडोअर केशर शेतीबद्दल माहिती घेतली. मग 4 लाखांची गुंतवणूक करत एक घरातच सेटअप तयार केला. 2 लाख रुपयांचे बियाणे काश्मीरवरून मागवले आणि खोलीतच सुरु केला केशर उत्पादनाचा प्रयोग.
कसा मिळतो नफा?
केशराच्या बीयाण्यातून फुल तयार होण्यास तीन महिने लागतात. चौथ्या महिन्यात फुलापासून केशर वेगळे करतात. त्यांना होलसेल मार्केटमध्ये २.४० लाख रुपयांचा भाव मिळतो. तर रिटेल मार्केटमध्ये ३.५० लाख रुपये किलोमागे भाव मिळतो. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार केशर उत्पादनासाठी त्यांना ४५०० रुपयांचं लाईटबील येतं. त्यांनी केशर शेतीतून स्वत:ची प्रगती तर साधली आहेच, पण १२००हून अधिक जणांना त्यांनी केशर शेतीचं ट्रेनिंगही दिलं आहे. त्यामुळे ६५ वर्षीय अभियंत्याने निवृत्तीनंतर केशर लागवड करण्याचा निर्णय घेतला. 2017 मध्ये, त्याने नोएडाच्या सेक्टर 63 मध्ये 100 स्क्वेअर फूट खोलीत केशर पिकवण्यास सुरुवात केली.
युवकांना देतात ट्रेनिंग
आज, ते नोएडामध्ये 'आकर्षक केशर संस्था' चालवतात, जिथे त्यांनी आजपर्यंत 370 हून अधिक लोकांना यशस्वीरित्या प्रशिक्षण दिले आहे. 12,000 रुपये किमतीचा त्यांचा दोन दिवसांचा ऑनलाइन प्रशिक्षण अभ्यासक्रम इच्छुक विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शन आणि मार्गदर्शन प्रदान करतो. या प्रयत्नामुळे त्याला 3.5 लाख रुपयांचे मासिक उत्पन्न मिळते.