एक्स्प्लोर

Beed Farmers News : बीडमध्ये अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर, पुन्हा एका संतप्त शेतकऱ्याने पेटवला ऊस

बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ऊस शेतात उभा आहे. साखर कारखाने ऊस घेऊन जात नाहीत म्हणून एका शेतकऱ्याने ऊस पेटवून दिला आहे.

Beed Farmers News : यावर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्यातील काही जिल्ह्यामध्ये अद्यापही ऊस कारखान्याला गेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. बीड जिल्ह्यात तर मोठ्या प्रमाणावर ऊस शेतात उभा आहे. साखर कारखाने ऊस घेऊन जात नाहीत म्हणून ऊसाचा फड पेटवून देऊन एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा दुसऱ्या शेतकऱ्याने कारखाना ऊस घेऊन जात नसल्याने उसाच्या फडाला आग लागून पेटवून दिला आहे.

वडवणी तालुक्यातील चिंचोटी अल्पभुधारक शेतकरी शिवाजी सुंदरराव गोंडे यांनी आपला ऊस फेटवून दिला आहे. मागील वर्षी तेलगाव येथील सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याला ऊस घातला होता. मात्र, यावर्षी अनेकवेळा कारखान्याला खेटा मारल्या, मात्र यावेळी सध्या टोळ्या नाहीत तुमचा ऊस मालकतोड करुन कारखान्याला आणा, असे सांगण्यात आले. मालकतोड करायची म्हणजे ऊस तोडणीदार 1000 रु ते 1200 रु प्रति टन तोडणीला द्या म्हणू लागले. ड्रायवर 1 हजार रुपयांच्या एंट्री फी ची मागणी करत आहेत. त्यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी अखेर उभ्या उसाला आग लावली आहे.


Beed Farmers News : बीडमध्ये अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर, पुन्हा एका संतप्त शेतकऱ्याने पेटवला ऊस

बीड जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न पेटला असून जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा पहिला बळी गेला आहे. तोडणीला आलेला ऊस कारखाना घेऊन जात नसल्याने 30 वर्षीय तरुण शेतकऱ्याने चक्क ऊस पेटवून देत ऊसातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटवना बुधुवारी (11 मे) घडली होती. बीडच्या गेवराई तालुक्यातील हिंगणगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. नामदेव आसाराम जाधव असे गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. नामदेव जाधव यांना एकूण दोन एकर शेती असून त्यांनी शेतामध्ये 265 जातीचा ऊस लागवड केला होता. त्यासाठी त्यांना एक लाख ते सव्वा लाख रुपये खर्च आला होता. मात्र हा ऊस आता तोडणीला येऊनदेखील रिसरातील एकही कारखाना तो ऊस घेऊन जात नव्हता. गेल्या अनेक दिवसांपासून ऊस  घेऊन जाण्यासाठी मदेव जाधव हे कारखान्याकडे चकरा मारत होते. मात्र त्यांना कारखान्याकडून निराशाच मिळाली. यामुळे नैश्यात आलेल्या आसाराम जाधव यांनी टोकाचं पाऊल उचललं होतं. त्यानंतर आता पुन्हा एका शेतकऱ्याने ऊस पेटवून दिला आहे.

या शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावरुन विविध शेतकरी नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. पिकवलेले विकण्यासाठी शेतकरी आत्महत्या करु लागला आहे. राज्यकर्त्यांनो तुम्हाला बळीराजाच्या मुडद्यावर राज्य करायच आहे काय? असा खडा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. तर हे ठाकरे सरकार नाही शेतकऱ्याला ठारं मारणारं सरकार असल्याचा आरोप रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत यांनी केला होता.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget