एक्स्प्लोर

Apple Price Hike : सफरचंदाच्या किंमतीत वाढ, पावसामुळं हिमाचलमधील पुरवठा साखळी विस्कळीत, अनेक ठिकाणी रस्ते बंद 

हिमाचल प्रदेशमध्ये सफरचंदाच्या पुरवठा साखळीवर झाला आहे. त्यामुळं टोमॅटोनंतर आता सफरचंदाच्या किंमतीत देखील मोठी वाढ (Apple Price Hike) होताना दिसत आहे.

Apple Price Hike : सध्या देशाच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. याचा शेती पिकांवर (Agriculture crop) मोठा परिणाम होताना दिसत आहे. पिकांचं नुकसान होत असल्यानं बळीराजा चिंतेत आहे. दरम्यान, उत्तर भारतात सध्या मुसळधार पावसानं हाहाकार घातला आहे. या पावसामुळं हिमाचल प्रदेशमध्ये सफरचंदाच्या पुरवठा साखळीवर झाला आहे. त्यामुळं टोमॅटोनंतर आता सफरचंदाच्या किंमतीत देखील मोठी वाढ (Apple Price Hike) होताना दिसत आहे. हिमाचल प्रदेशात पावसामुळं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.   

उत्तर भारतात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मोठ्या प्रमाणात शेतीला पावसाचा फटका बसला आहे.  अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलन यामुळे हिमाचल प्रदेशातील सफरचंदाच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. त्यामुळं टोमॅटोनंतर आता सफरचंद भाव खाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीच्या बाजारात सफरचंदाचा तुटवडा भासत असल्याचे चित्र आहे. हिमाचल प्रदेशात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं दिल्लीच्या घाऊक बाजाराच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये नेहमीच पावसामुळं शेती पिकांना बसतो. यावर्षी तर खूप मोठं नुकसान झालं आहे.  

महामार्गाच्या दुरवस्थेमुळं फळांची नासाडी

सफरचंदाच्या एका बॉक्सची किंमत एक हजार रुपये असणे अपेक्षित आहे. मात्र पावसामुळं पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यानं एका बॉक्सची किंमत ही 2000 रुपयांवरून 3 हजार 500 रुपयांपर्यंत वाढली आहे. दुसरीकडे, हिमाचल प्रदेशातील महामार्गाच्या दुरवस्थेमुळे शेतकरी एकाच ट्रकमध्ये फळे भरत असल्याने ही फळे लवकर सडत आहेत. त्यामुळे फळांच्या पुरवठ्यावर परिणाम होत असून मागणीही वाढत आहे. दिल्लीतील आझादपूर मंडईतील एका दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार, सफरचंदाचा केलेला पुरवठा संपला आहे. सध्या महामार्गावर दरड कोसळल्याने नवीन सफरचंदाचा पुरवठा होत नाही. मात्र, हिमाचल प्रदेशमधील व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत .

पावसामुळं हिमाचल प्रदेशचं मोठं नुकसान 

मुसळधार पावसाचा मोठा फटका हिमाचल प्रदेशला बसला आहे. राज्याचे आत्तापर्यंत 7 हजार 480 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे हिमाचल प्रदेशात यंदाच्या मान्सूनच्या 54 दिवसांत 742 मिमी पाऊस झाला आहे. हा 50 वर्षांचा नवा विक्रम असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या पावसामुळं 1 हजार 200 रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Nashik Tomato Price : सफरचंद, पेट्रोल मागे पडलं, 'अब की बार' टोमॅटो पोहोचले प्रतिकिलो 'दीडशे पार', नाशिकमध्ये आजचा दर काय? 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget