एक्स्प्लोर

Nandurbar : कोकणसह नंदूरबार जिल्ह्यात भात कापणीला सुरुवात, काही ठिकाणी पारंपारिक पद्धतीनं तर कुठे ट्रॅक्टरनं मळणी सुरू

कोकणसह नंदूरबार जिल्ह्यात भात कापणीला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी पारंपारिक पद्धतीनं तर कुठे ट्रॅक्टरनं कापणी सुरु आहे.

Agriculture News in Nandurbar : नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा, धडगाव तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाताची लागवड (Cultivation of rice) केली जात असते. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात भाताची लागवड केली आहे.  सध्या या भात कापणीला सुरुवात झाली  आहे. आदिवासी भागातील वाड्या पाड्यांवर भात कापण्यासाठी धावपळ दिसून येत आहे. तर काही ठिकाणी भात कापून गंजी लावल्या जात आहे. तसेच कोकणातही भात काढणीला सुरुवात झाली आहे. यावर्षी परतीचा पाऊस (Rain) आणि अतिवृष्टीमुळे नवापूर तालुक्यात भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून उत्पादनात घट येणार आहे.

परतीच्या पावसाचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं या पावसामुळं वाया गेली आहे. तर काही ठिकाणी अशा स्थितीतून देखील शेतकऱ्यांची पिकं वाचली आहेत. अशा वाचलेल्या पिकांची सध्या काढणी सुरु आहे. नंदूबार जिल्ह्याला देखील परतीच्या पावासाचा मोठा फटका बसला आहे. सोयाबीनसह, कापूस, भात पिकांचं मोठं नुकसान या पावसामुळं झालं आहे. यावर्षी भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यामुळं भाताचे एकरी उत्पादन घटले असून, उत्पादन खर्चही निघणार नसल्याने भात उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

पारंपारिक पद्धतीनं भाताची मळणी सुरु

दरम्यान, भात उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. काही ठिकाणी पारंपारिक पद्धतीनं भाताची मळणी सुरू झाली आहे. तर काही ठिकाणी मळणीसाठी बैलाऐवजी ट्रॅक्टरचाही उपयोग केला जात आहे. नवापूर तालुक्यात सेंद्रिय पद्धतीनं लागवड केलेला सुगंधी तांदुळाला देशभरात मोठी मागणी असल्याने यावर्षी तांदुळाला दर काय मिळतात? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कोकणातही भात कापणीला सुरुवात

कोकणात मोठ्या प्रमाणावर भाताची लागवड केली जाते. त्या ठिकाणी भात लागवडीसाठी पोषक वातावर आहे. तिथे देखील  यावर्षी परतीच्या पावसाचा मोठा फटका भाताच्या पिकाला बसला आहे. त्यामुळं तिथेही उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या कोकणात सर्वत्रच भात कापणी सुरु आहे. चिपळूणमध्यला खेंड जाखमाता परिसरातील शेतातील भात कापणी करत असताना शेतातील चिखलात मगर आढलून आली. ही मगर पाहिल्यावर शेतकरी घाबरला होता. सर्व काम सोडून शेताबाहेर आला. लगेच सहकाऱ्यांच्या वतीनं वनविभागाला कळवण्यात आलं. वनविभागाचे अधिकारी तिथे पोहोचल्यावर मगरीला जवळपास दोन तास रेस्कू करुन पिंजऱ्यात पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या:

Nashik News : नाशिक जिल्ह्यांत भात पिकाच्या कापणीला जोर, अशी केली जाते भाताची सोंगणी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Numerology : प्रचंड श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट
प्रचंड श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट
Vande Bharat Sleeper पुणेकरांसाठी गुडन्यूज; पहिली वंदे भारत स्लीपर पुणे ते दिल्ली, मंत्रीमहोदयांचे संकेत
पुणेकरांसाठी गुडन्यूज; पहिली वंदे भारत स्लीपर पुणे ते दिल्ली, मंत्रीमहोदयांचे संकेत
Maratha Reservation पुण्यातील मराठा आंदोलक मुंबईत दाखल, पोलिसांचा फौजफाटा; मंत्रालयाला घेराव घालणार
पुण्यातील मराठा आंदोलक मुंबईत दाखल, पोलिसांचा फौजफाटा; मंत्रालयाला घेराव घालणार
Sharad Pawar विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

रात्री ९ च्या हेडलाईन्स : ABP Majha Marathi News : Headlines 09 PM TOP Headlines : 9 PM 21 September 2024Sachin Khilari Majha Katta : हात गमावला पण धैर्य कमावलं! रौप्यपदक विजेता सचिन खिलारी 'माझा कट्टा'वरPrataprao Jadhav On Electricity : 'माझ्या आजोबांनी, वडिलांनी आणि मी कधीच वीज बिल भरलं नाही'- जाधवPrakash Ambedkar On Vidhansabha Seats : प्रकाश आंबेडकरांकडून विधानसभेसाठी ११ उमेदवार जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Numerology : प्रचंड श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट
प्रचंड श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट
Vande Bharat Sleeper पुणेकरांसाठी गुडन्यूज; पहिली वंदे भारत स्लीपर पुणे ते दिल्ली, मंत्रीमहोदयांचे संकेत
पुणेकरांसाठी गुडन्यूज; पहिली वंदे भारत स्लीपर पुणे ते दिल्ली, मंत्रीमहोदयांचे संकेत
Maratha Reservation पुण्यातील मराठा आंदोलक मुंबईत दाखल, पोलिसांचा फौजफाटा; मंत्रालयाला घेराव घालणार
पुण्यातील मराठा आंदोलक मुंबईत दाखल, पोलिसांचा फौजफाटा; मंत्रालयाला घेराव घालणार
Sharad Pawar विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
विधानसभेसाठी गोविंदबागेत गर्दी; 4 मतदारसंघातील चार इच्छुकांनी घेतली शरद पवारांची भेट
जमिनीवर बांधता येईना अन् समुद्रात महाराजांचा पुतळा बांधायला निघाले; राज ठाकरेंनी सांगितला खर्च
जमिनीवर बांधता येईना अन् समुद्रात महाराजांचा पुतळा बांधायला निघाले; राज ठाकरेंनी सांगितला खर्च
Success Story: सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
सेंद्रीय भाज्या पिकवून MBA पूर्वा दिवसाला 7 हजार रुपये कमावते, युट्यूबवर अभ्यास करत केली शेती
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरपंचांचे कान टोचले
भाषणासाठी सरपंचांऐवजी त्यांचा पती दिसला, शरद पवार संतापले; महिला सरपंचांचे कान टोचले
Bank Jobs : अहमदनगर जिल्हा बँकेत क्लार्क, चालक अन् सुरक्षारक्षक पदांची भरती,  696 जागांसाठी प्रक्रिया सुरु
सुवर्णसंधी, अहमदनगर जिल्हा बँकेनं भरतीसाठी अर्ज मागवले, क्लार्क, वाहनचालक अन् सुरक्षारक्षक पदं भरणार
Embed widget