Rabi Crop : रब्बी पिकांच्या पेरणीत मोठी वाढ, केंद्र सरकारकडून अंतिम आकडेवारी जाहीर, वाचा सविस्तर
Rabi Crop Sowing: सरकारनं रब्बी हंगामातील (Rabi Season) पिकांच्या पेरणीची अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे.

Rabi Crop Sowing: यावर्षी देशात शेती पिकांची (Agriculture Crop) मोठ्या प्रमाणावर पेरणी (Sowing) झाली आहे. अद्यापही काही ठिकाणी पेरणी सुरूच आहे. त्यामुळं देशात आगामी काळात तांदूळ (Rice), गहू (Wheat) यासह इतर धान्यांचा तुटवडा भासणार नसल्याचे केंद्र सरकारनं सांगितले आहे. सरकारनं रब्बी हंगामातील (Rabi Season) पिकांच्या पेरणीची अंतिम आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये आत्तापर्यंत रब्बी पिकांची 720 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
रब्बी हंगामाच्या पेरणीत 3.25 टक्क्यांची वाढ
देशात आत्तापर्यंत 720 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी झाली आहे. गहू, तांदूळ, कडधान्ये, तेलबिया आणि भरड तृणधान्याखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीच्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. देशाच्या काही भागात रब्बी हंगामाच्या पेरण्या अजूनही सुरू आहेत. रब्बी पिकाखालील एकूण पेरणी क्षेत्र 2021-22 मधील 697.98 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली होती. यावर्षी म्हणजे 2022-23 ही पेरणी 720.68 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. यावर्षी 3.25 टक्क्यांनी रब्बी हंगामात पेरणी वाढली आहे. यावर्षी 2021-22 वर्षाच्या कालावधीपेक्षा यावर्षी बियाणांची पेरणी ही 22.71 लाख हेक्टरने अधिक आहे.
भात पिकासह गव्हाच्या पेरणीत मोठी वाढ
2021-22 मध्ये 35.05 लाख हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची पेरणी करण्यात आली होती. 2022-23 मध्ये 46.25 लाख हेक्टरवर भात पिकाची पेरणी करण्यात आली आहे. भाताच्या लागवडीखालील क्षेत्र 11.20 लाख हेक्टरने वाढले आहे. मात्र, मागील वर्षांतील सरासरी 47.71 लाख हेक्टर पेरणी क्षेत्रापेक्षा हे प्रमाण थोडे कमी आहे. तेलंगणा आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये तांदळाखालील क्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. त्याचबरोबर गव्हाच्या पेरणीखालील क्षेत्र 300 लाख हेक्टरपेक्षा जास्त झाले आहे.
देशात तेलबियांच्या क्षेत्रातही वाढ
खाद्यतेलावरील आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकार तेलबिया उत्पादनाला चालना देत आहे. कमी उत्पादनामुळं, देशाला 2021-22 मध्ये 1.41 लाख कोटी रुपये खर्चून 142 लाख टन खाद्यतेल आयात करावे लागले. देशात तेलबियांची पेरणी 2021-22 मध्ये 102.36 लाख हेक्टरवरून 7.31 टक्क्यांनी वाढली आहे. यंदा 109.84 लाख हेक्टर झाली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तेलबियांखालील सर्वाधिक क्षेत्र वाढले आहे. दुसरीकडे, तेलबियांमध्ये मोहरीचे क्षेत्र 2021-22 मधील 91.25 लाख हेक्टरवरून 2022-23 मध्ये 6.77 लाख हेक्टरने वाढून 98.02 लाख हेक्टर झाले आहे.
कडधान्याखालील क्षेत्रही वाढलं
केंद्र सरकारने देशातील 370 जिल्ह्यांमध्ये डाळींचे उत्पादन वाढवण्याचे काम सुरू केले आहे. देशात कडधान्याखालील क्षेत्र 167.31 लाख हेक्टरवरून 167.86 लाख हेक्टरवर गेले आहे. 0.56 लाख हेक्टरची वाढ झालीआहे. मूग आणि मसूर डाळींच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान आणि कर्नाटकमध्ये कडधान्य पेरणीत वाढ झाली आहे.
भरडधान्यात 2 लाख हेक्टरची वाढ
केंद्र सरकार भरड धान्य आणि त्याचे उत्पादन वाढवण्यावर भर देत आहे. देशात भरड धान्याच्या क्षेत्रात 2.08 लाख हेक्टरची वाढ नोंदवण्यात आली आहे. 2021-22 मध्ये 51.42 लाख हेक्टरची पेरणी झाली आहे. 2022-23 मध्ये 53.49 लाख हेक्टर क्षेत्रावर परेणी झाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Nandurbar Weather : नंदूरबारमध्ये या वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद, रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
