एक्स्प्लोर

Sadabhau Khot :  शेतकऱ्यांना उसाची FRP एकरकमीच देण्याचा निर्णय घ्यावा, सदाभाऊ खोतांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना एकरकमी FRP मिळावी, अशी मागणी केली आहे.

Sadabhau Khot : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन टप्प्यात एफआरपी (FRP) देण्याच्या मुद्यावरुन विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली जाणारी FRP ही एका टप्प्यातच देण्यात यावी अशी भूमिका मांडली आहे. तत्कालीन महाविकस आघाडी सरकारच्या काळात दोन टप्प्यात एफआरपी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, याबाबत बदल करुन शेतकऱ्यांना 14 दिवसात उसाची FRP मिळावी, यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी शेतकऱ्यांना एकरकमी FRP मिळावी, अशी मागणी केली आहे.

दोन टप्प्यात FRP हा निर्णय शेतकऱ्यांची घडी विस्कटून टाकणारा
 
केंद्र सरकारच्या 1966 च्या शुगर केन कंट्रोलनुसार महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाचे बील एकरकमी 14 दिवसांच्या आत मिळते. मात्र, तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारनं यामध्ये बदल होता. या सरकारनं दोन टप्प्यात FRP द्यावी असा निर्णय घेतला होता. हा निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणार असल्याचे मत सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहलेल्या पत्रात व्यक्त केलं आहे. हा निर्णय शेतकऱ्यांची घडी विस्कटून टाकणारा आहे. एकरकमी उसाचे बील मिळाल्यास शेतकऱ्यांना सोसायटी आणि बँकांचे कर्ज फेडूननवीन उचल ताबडतोब मिळते. जोन टप्प्यात बिल मिळाल्यास शेतकऱ्यांची कर्जफेड लांबणीवर पडून त्याचा नवीन लागवडीवर गंभीर परिणाम होणार आहे. रयत क्रांती संघटनेनं एकरकमी FRP बाबत कायमच आग्रह धरला असल्याचे खोत यांनी म्हटलं आहे.

शेतकरी संघटनांनी दिला होता इशारा

दरम्यान, केंद्र सरकारनं केलेल्या 1966 च्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना एकरकमी FRP देण्याचा निर्णय कायम ठेवावा अशी विनंती सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. त्यामुळं आता देवेंद्र फडणवीस याबाबत काय निर्णय घेणार हे पाहमं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, तत्कालीन सरकारनं दोन टप्प्यात FRP देण्याचा निर्णय घेतल्यानंतर विविध शेतकरी संघटनांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. हा निर्णय एक प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. ज्यांचा उतारा चांगला त्यांना चांगला दर हा मिळायलाच हवा. FRP वसुलीचं धोरण हे मोठे आहे. एफआरपीचे तुकडे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा असून याविरोधात लढा उभारणार असल्याचा इशारा विविध शेतकरी संघटनांनी दिला होता.  

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar Onion Farmers Protest: निवडणुकीपूर्वी 24 रुपये, आता 12 रुपये, सरकार उपकार करतंय का? रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघात; लासलगावात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार
निवडणुकीपूर्वी 24 रुपये, आता 12 रुपये, सरकार उपकार करतंय का? रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघात; लासलगावात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार
Onion Price Drop: केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही कांदा उत्पादकांचा रोष कायम; लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांचा एल्गार, नेमक्या मागण्या काय?
केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही कांदा उत्पादकांचा रोष कायम; लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांचा एल्गार, नेमक्या मागण्या काय?
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, अन्यथा महागात पडेल, रोहित पवारांचा इशारा, लासलगावमध्ये करणार एल्गार
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, अन्यथा महागात पडेल, रोहित पवारांचा इशारा, लासलगावमध्ये करणार एल्गार
मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली होती, आंबा आणि काजू उत्पादकांना योग्य भावाचं आश्वासनही मिळालं होतं : सुनील तटकरे
मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली होती, आंबा आणि काजू उत्पादकांना योग्य भावाचं आश्वासनही मिळालं होतं : सुनील तटकरे

व्हिडीओ

Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण!
अशोक खरात अन् नामकर्ण आवारे एकाच गाडीतून कोर्टात; 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, खरातला ईडी ताब्यात घेणार
अशोक खरात अन् नामकर्ण आवारे एकाच गाडीतून कोर्टात; 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, खरातला ईडी ताब्यात घेणार
Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनने रजनीकांत-कमल हसन तब्बल 47 वर्षांनी एकत्र येत असतानाही तगडा निर्णय घेत झटका दिला!
त्रिशा कृष्णनने रजनीकांत-कमल हसन तब्बल 47 वर्षांनी एकत्र येत असतानाही तगडा निर्णय घेत झटका दिला!
'जामीन हा हक्क, तुरुंगवास हा अपवाद, उमर खालिदला जामीन मंजूर करता आला असता' सर्वोच्च न्यायालयाचा स्वत:च्या निर्णयावर आक्षेप
'जामीन हा हक्क, तुरुंगवास हा अपवाद, उमर खालिदला जामीन मंजूर करता आला असता' सर्वोच्च न्यायालयाचा स्वत:च्या निर्णयावर आक्षेप
व्ही. डी. सतीशन केरळचे मुख्यमंत्री होताच अवघ्या काही तासात 5 धडाकेबाज निर्णय; 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यासह कॅबिनेटची सुद्धा शपथ, राहुल अन् प्रियांका गांधी साक्षीदार
व्ही. डी. सतीशन केरळचे मुख्यमंत्री होताच अवघ्या काही तासात 5 धडाकेबाज निर्णय; 64 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यासह कॅबिनेटची सुद्धा शपथ, राहुल अन् प्रियांका गांधी साक्षीदार
रोहित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील; काँग्रेस प्रवक्त्यांचा गौप्यस्फोट, काय म्हणाले अतुल लोंढे
रोहित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील; काँग्रेस प्रवक्त्यांचा गौप्यस्फोट, काय म्हणाले अतुल लोंढे
Vidhan Parishad MLA Attandance: विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
Embed widget