एक्स्प्लोर

Wheat Production : गव्हाचं उत्पादन तीन टक्क्यांनी घटणार, तर कडधान्यासह ऊस, मका, हरभऱ्याचं उत्पादन वाढणार 

2021-22 या पीक वर्षात भारताचे गव्हाचे उत्पादन हे सुमारे 3 टक्क्यांनी घसरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गव्हाचे उत्पादन हे 106.84 दशलक्ष टनांवर पोहोचण्याचा अंदाज आहे.

Wheat Production : 2021-22 या पीक वर्षात गव्हाच्या उत्पादनात (Wheat Production) घट होण्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयानं (Ministry of Agriculture) वर्तवला आहे. भारताचे गव्हाचे उत्पादन हे सुमारे 3 टक्क्यांनी घसरुन 106.84 दशलक्ष टनांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. तर 2021-22 या पीक वर्षात एकूण अन्नधान्य उत्पादन 315.72 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज कृषी मंत्रालयानं वर्तवला आहे. पंजाब आणि हरियाणासह  उत्तरेकडील राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा गव्हाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळं गव्हाच्या उत्पादनात घट झाल्याचा अंदाज आहे.

तांदूळ, मका, हरभरा, कडधान्ये, ऊस या पिकांचे उत्पादन वाढण्याचा अंदाज

2021-22 पीक वर्षासाठी चौथा आगाऊ अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने बुधवारी (17 ऑगस्ट) जाहीर केला. यामध्ये तांदूळ, मका, हरभरा, कडधान्ये, मोहरी, तेलबिया आणि ऊसासाठी देखील विक्रमी उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आहे. या पिकांचे विक्रमी उत्पादन हे सरकारच्या शेतकरी हिताचे धोरण तसेच शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमाचे आणि शास्त्रज्ञांच्या परिश्रमाचे परिणाम असल्याचे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले. 2020-21 या पीक वर्षात, गहू, तांदूळ, कडधान्ये आणि भरड तृणधान्यांचा समावेश असलेले देशाचे अन्नधान्य उत्पादन 310.74 दशलक्ष टन विक्रमी होते. आकडेवारीनुसार, 2021-22 पीक वर्षात गव्हाचे उत्पादन 106.84 दशलक्ष टन इतके कमी आहे. जे मागील वर्षी 109.59 दशलक्ष टन होते. तसेच पीक वर्षात तांदूळ उत्पादन विक्रमी 130.29 दशलक्ष टन राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जे मागील वर्षीच्या कालावधीत 124.37 दशलक्ष टन होते.

भरड धान्याचे उत्पादन घटण्याची शक्यता

भरड धान्याचे उत्पादन 51.32 दशलक्ष टनांवरुन 50.90 दशलक्ष टनांपर्यंत घसरण्याची शक्यता कृषी मंत्रालयानं वर्तवली आहे. तर कडधान्यांच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. यावर्षी कडधान्याचे उत्पादन हे विक्रमी 27.69 दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी कडधान्याचे उत्पादन हे 25.46 दशलक्ष टन होते. 2021-22 पीक वर्षात तेलबियांचे उत्पादन हे विक्रमी 37.69 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. जे मागील वर्षी 35.94 दशलक्ष टन होते. 2021-22 पीक वर्षासाठी मोहरी बियाण्यांचे उत्पादन 17.74 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

सत्तेसाठी संवैधानिक तत्त्वांना तिलांजली, कोरड्या गप्पा ते शेतकऱ्यांची थट्टा, दुष्काळी परिस्थितीवरुन रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल 
सत्तेसाठी संवैधानिक तत्त्वांना तिलांजली, कोरड्या गप्पा ते शेतकऱ्यांची थट्टा, दुष्काळी परिस्थितीवरुन रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल 
Babasaheb Patil: दुष्काळाची दाहकता! पावसाअभावी बळीराजा मोठ्या संकटात; राज्य सरकारकडून परिस्थितीचा आढावा, सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचा शेतकऱ्यांना शब्द, म्हणाले...
दुष्काळाची दाहकता! पावसाअभावी बळीराजा मोठ्या संकटात; राज्य सरकारकडून परिस्थितीचा आढावा, सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचा शेतकऱ्यांना शब्द, म्हणाले...
Ayam Cemani Chicken : सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?
सोन्यापेक्षाही महागडी कोंबडी! एका अंड्याची किंमत 3 हजार; काय आहे या काळ्या कोंबडीचे वैशिष्ट्य?
दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 1 लाख मदत द्या, अन्यथा सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करुन सोडणार, रविकांत तुपकरांचा इशारा
दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 1 लाख मदत द्या, अन्यथा सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करुन सोडणार, रविकांत तुपकरांचा इशारा

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil in Beed: मुंगी शिरायलाही जागा उरली नाही, बीडमध्ये रात्री 2 वाजताही मनोज जरांगेंच्या सभेसाठी चौक खचाखच भरला, मराठा बांधवांची गर्दी
मुंगी शिरायलाही जागा उरली नाही, बीडमध्ये रात्री 2 वाजताही मनोज जरांगेंनी चौक खचाखच भरुन टाकला, मराठा बांधवांची गर्दी
Manoj Jarange Patil: उपोषणात दौरा चांगला नाही, त्रास होत असल्याने दौरा रद्द करू शकतो, मनोज जरांगे यांचं सूतोवाच, बीडच्या पाटोदा येथे रात्री दोन वाजता सभा
उपोषणात दौरा चांगला नाही, त्रास होत असल्याने दौरा रद्द करू शकतो, मनोज जरांगे यांचं सूतोवाच, बीडच्या पाटोदा येथे रात्री दोन वाजता सभा
UPI Charge Rules : UPI द्वारे पेट्रोल, डिझेल आणि CNG भरणे महाग होणार, UPI पेमेंटच्या नव्या नियमाने काय बदलणार? वाचा सविस्तर
UPI द्वारे पेट्रोल, डिझेल आणि CNG भरणे महाग होणार, UPI पेमेंटच्या नव्या नियमाने काय बदलणार? वाचा सविस्तर
Sunil Lodhi : आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
Manoj Jarange : जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
Narendra Mehta and Asgar ali vora: भाजपच्या नरेंद्र मेहतांनी अखेर पंतप्रधान मोदींच्या वर्गमित्राची जमीन परत केली, पोलीस तक्रारही मागे घेतली, मीरा भाईंदरमध्ये नेमकं काय घडलं?
भाजपच्या नरेंद्र मेहतांनी अखेर पंतप्रधान मोदींच्या वर्गमित्राची जमीन परत केली, पोलीस तक्रारही मागे घेतली, मीरा भाईंदरमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget