एक्स्प्लोर

Maharashtra Board Result 2023 LIVE Updates : ऑल द बेस्ट!!! बारावीचा निकाल जाहीर; दुपारी 2 वाजता निकाल ऑनलाईन पाहता येणार

Maharashtra HSC Result 2023 Live Updates: अवघ्या काही तासांत बारावीच्या परीक्षेचा निकाल, एबीपी माझाच्या mh12.abpmajha.com बेवसाईटवर निकाल पाहण्याची सुविधा

LIVE

Key Events
Maharashtra Board Result 2023 LIVE Updates : ऑल द बेस्ट!!! बारावीचा निकाल जाहीर; दुपारी 2 वाजता निकाल ऑनलाईन पाहता येणार

Background

Maharashtra HSC Result 2023 Live Updates: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Result News) कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाकडून  लवकरच अधिकृतपणे निकालाबाबत माहिती दिली जाणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. 

Maharashtra HSC Result 2023 Date : गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतिक्षा होती. अखेर प्रतीक्षा संपली आहे.  उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे. 

Maharashtra HSC Result 2023 Date : बारावीचा निकाल एबीपी माझावर

आज दुपारी दोन वाजल्यानंतर हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. तसंच 'एबीपी माझा'च्या संकेतस्थळावरही बारावीचा निकाल पाहता येणार आहे. यंदा 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती  यंदा तुम्हाला एबीपी माझाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. 

14 लाख 57 हजार 293 विद्यार्थ्यांनी दिली बारावीची परीक्षा 

राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या काळात आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण राज्यातून 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, अशी माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. राज्यभरात 3 हजार 195 केंद्रावर ही परीक्षा पार पडली.

कुठे पाहाल निकाल? 

बारावीच्या निकालासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून विविध तारखा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहान बोर्डाकडून केलं गेलं.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com  वर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. 

11:39 AM (IST)  •  25 May 2023

HSC Result 2023 LIVE Updates: महाराष्ट्रात बारावीचा निकाल 91.25 टक्के; पाहा विभागनिहाय टक्केवारी

  • महाराष्ट्रात बारावीचा निकाल 91.25 टक्के.
  • मुलींचा निकाल 93.73 टक्के
  • मुलांचा निकाल 89.14 टक्के निकाल
  • कोकण विभागाचा 96.1 तर मुंबईचा निकाल सगळ्यात कमी म्हणजे 88.13 टक्के.
  • गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल घटला.

11:33 AM (IST)  •  25 May 2023

HSC Result 2023 LIVE Updates : 1416371 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली, त्यापैकी 1292468 विद्यार्थ्यी उत्तीर्ण, राज्याचा निकाल 91.25 टक्के

HSC Result 2023 LIVE Updates : 1416371 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली, त्यापैकी 1292468 विद्यार्थ्यी उत्तीर्ण, म्हणजेच, राज्याचा निकाल 91.25 टक्के
पुनर्परिक्षार्थि ( रिपीटर ) निकालाची टक्केवारी : 44.33 टक्के
खाजगी विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी : 82.39 टक्के
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी : 93.43 टक्के

11:30 AM (IST)  •  25 May 2023

HSC Result 2023 LIVE Updates: बारावीचा निकाल जाहीर; जाणून घ्या विभागनिहाय आकडेवारी

Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. दुपारी दोन वाजता विद्यार्थी ऑनलाईन निकाल पाहू शकणार आहेत. अशातच पत्रकार परिषदेत बोलताना बोर्डाकडून विभागनिहाय आकडेवारी जाहीर करण्यात आली. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा मुंबईचा लागला आहे. 

बारावी निकालाची विभागनिहाय आकडेवारी : 

पुणे : 93.34 टक्के 
नागपूर : 90.35 टक्के 
औरंगाबाद : 91.85 टक्के 
मुंबई : 88.13 टक्के  
कोल्हापूर : 93.28 टक्के 
अमरावती : 92.75 टक्के 
नाशिक : 91.66 टक्के 
लातूर : 90.37 टक्के 
कोकण : 96.25 टक्के 

कोकण सर्वाधिक
मुंबई सर्वात कमी

11:18 AM (IST)  •  25 May 2023

Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: बारावीचा निकाल जाहीर, राज्याच्या यंदाच्या निकालाची टक्केवारी 91.25

Maharashtra Board HSC Result 2023 LIVE: बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. दुपारी 2 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. राज्याच्या यंदाच्या निकालाची टक्केवारी 91.25 इतकी आहे. 

11:08 AM (IST)  •  25 May 2023

HSC Exam 2023 LIVE : शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद सुरू

HSC Exam 2023 LIVE : शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद सुरू झाली आहे. थोड्याच वेळात बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना बारावी परीक्षांच्या निकालाबाबत माहिती दिली. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : दिवसभरातील टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 July 2024 : ABP MajhaRahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Embed widget