CNG Bike Launch : बजाज फ्रिडम 125 लवकरच बाजारात, सीएनजीची बाईकचा लूक पाहिलात का?
बाइकच्या दुनियामध्ये पहिल्यांदाच ऐतिहासिक अशी घटना घडली आहे. भारतीय कंपनी बजाज ऑटोने जगातली पहिली अशी सीएनजी बाइक अखेर लाँच केली आहे. बजाजने एकूण 3 मॉडेल लाँच केले आहे. हे तिन्ही मॉडेल हे बजेटमध्ये बसणार आहे. यामध्ये सर्वात कमी ही 95 हजार रुपये किंमत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ज्या बाइकची चर्चा सुरू होती अखेरीस बजाज ऑटो ही कंपनी जगातली पहिली सीएनजी बाइक लाँच केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या गाडीचं लाँचिंग करण्यात आलं आहे. बजाज फ्रीडम सीएनजी असं या बाइकचं नाव आहे. या बाइकची किंमत 95,000 (Ex-sh) असणार आहे. एकूण अशी 3 मॉडेल आहे. यामध्ये फ्रीडम 125 NG04, फ्रीडम 125 NG04 ड्रम एलईडी, फ्रीडम 125 NG04 ड्रम अशी मॉडेल आहे. फ्रीडम 125 NG04 ची किंमतही 1 लाख 10 हजार असणार आहे. तर फ्रीडम 125 NG04 ड्रम एलईडी ची किंमत १ लाख ५ हजार असणार आहे. तर फ्रीडम 125 NG04 ड्रमची किंमत ९५ हजार असणार आहे.