एक्स्प्लोर
India vs Australia : ऑस्ट्रेलियानं सहाव्यांदा पटकवले वनडे विश्वचषक, भारतावर सहा विकेट्सनी मात
ऑस्ट्रेलियानं विश्वचषक फायनलच्या रणांगणात खरोखरच कमाल केली. रोहित शर्माचा भारतीय संघ विश्वचषकाच्या या फायनलवर निर्विवाद वर्चस्व गाजवेल, असा अंदाज होता. कारण भारतीय संघानं पहिल्या दहाही सामन्यांवर निर्विवाद वर्चस्व गाजवून रुबाबात विजय साजरा केला होता. पण ऑस्ट्रेलियानं निर्णायक लढाईत बाजी उलटवली आणि भारताचा सहा विकेट्स आणि सात षटकं राखून पराभव केला. भारताच्या या पराभवाची नेमकी कारणं कोणती आणि या अपयशानंतरही भारतीय शिलेदारांच्या पाठीवर शाबासकीची थाप का द्यायला हवी, जाणून घेऊयात माजी कसोटीवीर राजू कुलकर्णी यांच्याकडून.
आणखी पाहा























