एक्स्प्लोर

Benjamin Netanyahu: इराण-इस्रायल युद्धाच्या धामधुमीत वेगळीच चर्चा, बेंजामिन नेत्यानाहू गेले कोणीकडे? उलटसुलट चर्चांना उधाण

बेंजामिन नेतान्याहू, त्यांचे बंधू इडो नेतान्याहू आणि राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इतामार बेन-ग्वीर हे इस्रायली हवाई हल्ल्यात जखमी किंवा ठार झाल्याचा दावा केला जात होता.

Benjamin Netanyahu: पश्चिम आशियामध्ये गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण युद्धाने आता निर्णायक वळण घेतले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या मृत्यूची चर्चा रंगली आहे. इराणच्या सोशल मीडियावरून बेंजामिन नेतान्याहू, त्यांचे बंधू इडो नेतान्याहू आणि राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इतामार बेन-ग्वीर हे इस्रायली हवाई हल्ल्यात जखमी किंवा ठार झाल्याचा दावा केला जात होता. मात्र, इस्रायली प्रशासनाने हे वृत्त 'फेक न्यूज' असल्याचे सांगत फेटाळले आहे.

'ऑपरेशन रोअरिंग लायन' आणि अमेरिकेची साथ

दरम्यान, 10 मार्च 2026 रोजी नेतान्याहू यांनी टीव्हीवरून देशाला संबोधित केलं आहे. 9 मार्च रोजी त्यांनी राष्ट्रीय आरोग्य कमांड सेंटरला भेट दिली, ज्याचा व्हिडिओ त्यांच्या 'X' (ट्विटर) अकाऊंटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. 28 फेब्रुवारी रोजी इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या हत्येनंतर हे युद्ध पेटले. इस्रायलने 'ऑपरेशन रोअरिंग लायन' तर अमेरिकेने 'ऑपरेशन एपिक फ्युरी' अंतर्गत इराणवर संयुक्त हल्ले चढवले आहेत. अमेरिकेच्या दाव्यानुसार, इराणची क्षेपणास्त्र क्षमता 90 टक्के नष्ट करण्यात आली आहे. इराणमधील अणुकेंद्र, लष्करी तळ आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जात आहे.

इराणचा पलटवार, जागतिक तेल पुरवठ्यावर संकट

इराणने प्रत्युत्तर म्हणून इस्रायल, आखाती देश आणि इराक मधील अमेरिकन तळांवर आतापर्यंतचा सर्वात मोठा क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला चढवला आहे. जगाच्या 20 टक्के तेल पुरवठ्याचा मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणने सुरुंग पेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमेरिकन नौदलाने इराणच्या सुरुंग पेरणाऱ्या नौका उद्ध्वस्त केल्याचे बोलले जात आहे.  इराणमध्ये आतापर्यंत 1300 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून 10 हजारहून अधिक ठिकाणांचे नुकसान झाले आहे.

प्रादेशिक तणाव आणि हिजबुल्लाचा सहभाग

इराणच्या मदतीसाठी लेबनॉनमधील हिजबुल्ला संघटनेने इस्रायलवर रॉकेट हल्ला चढवला आहे, ज्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने बैरुतवर बॉम्बहल्ला केला. दुसरीकडे, इराक मधील इराण समर्थक गटांनी अमेरिकन तळांवर डझनभर हल्ले केले आहेत, ज्यामध्ये 140 अमेरिकन सैनिक जखमी झाले आहेत.

युद्ध कधी थांबणार?

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध "खूप लवकर" संपू शकते अशी आशा व्यक्त केली असली, तरी नेतान्याहू यांनी मात्र इराणमधील राजवट उलथवून टाकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी हे जखमी असूनही सुरक्षित असल्याचे समजते.  

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Embed widget