Ind Beat Pak T20 World Cup : महाशिवरात्रीला टीम इंडियाचा विजयाचा अभिषेक; पाकिस्तानवर दणदणीत विजयईशान किशनचे वादळसलामीच्या ईशान किशनची खेळी भारताच्या या विजयात निर्णायक ठरली. त्यानं 40 चेंडूत 10 चौकार आणि तीन षटकारांसह 77 धावांची खेळी करून भारताच्या डावाचा पाय रचला.सूर्यकुमार यादवची संयमी पण मोलाची खेळी कर्णधार सूर्यकुमार यादव या सामन्यात भारताकडून दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. ईशान बाद झाल्यानंतर मधल्या षटकांत त्याने शांत, संयमी आणि शहाणपणाची फलंदाजी करत संघाला 170 धावांच्या पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सूर्यकुमारने 29 चेंडूत 32 धावा केल्या, ज्यात तीन चौकारांचा समावेश होता.